अशी खात्रीशीर बातमी मिळाल्याने पोलीस निरीक्षक अरूण फुगे यांनी लागलीच मिळालेल्या बातमीचा आशय सहाय्यक पोलीस निरीक्षक बालाजी कांबळे, पोलीस हवालदार एस.एन. नाडेकर व मंचर पोलीस स्टेशन स्टेशनचे गुन्हे शोध पथकाचे, पोलीस अंमलदार अविनाश दळवी, पोलीस अंमलदार अजित पवार, पोलीस अंमलदार योगेश रोडे यांना सांगितल्याने सहा पोलीस निरीक्षक कांबळे व सोबतचे पोलीस स्टाफने लक्ष्मी रोड येथे जावुन सापळा लावुन थांबलेले असताना रात्रौ ९.३० च्या सुमारास शुभम तोत्रे हा लक्ष्मी रोड येथे मिरवणुकीच्या गर्दीत दिसला. शुभम तोत्रे याला पोलीसांची चाहुल लागताच तो पळुन गेला; परंतु तो पळून जात असताना सहा पोलीस निरीक्षक कांबळे व त्यांचे सोबतचे पोलीस स्टाफने आरोपी शुभम तोत्रे याचा मंचर एस टी स्टँड पर्यंत पाठलाग करून त्याला पकडले असुन आरोपीस शिताफीने पकडले असुन आरोपीस ताब्यात घेवुन अटक केली आहे. आरोपी शुभम सुभाष तोत्रे हा सराईत गुन्हेगार असुन त्याचेवर मंचर पोलीस स्टेशनला एकुण तीन गंभीर स्वरूपाचे गुन्हे दाखल असुन खेड येथे खुनाचा प्रयत्न असा गंभीर स्वरूपाचा गुन्हा दाखल आहे. आरोपीवर एकुण चार गुन्हे दाखल आहे सध्या आरोपी पोलीस कस्टडी रिमांडमध्ये आहे.
सदरची कामगिरी पोलीस अधिक्षक पंकज देशमुख, अपर पोलीस अधिक्षक रमेश चोपडे, सुदर्शन पाटील उप विभागीय पोलीस अधिकारी खेड विभाग खेड, पुणे ग्रामीण, मा पोलीस निरीक्षक अरूण फुगे, यांचे मार्गदर्शनाखाली सहा पोलीस निरीक्षक बालाजी कांबळे, पोलीस हवालदार एस एन नाडेकर, व मंचर पोलीस स्टेशन स्टेशनचे गुन्हे शोध पथकाचे, पोलीस अंमलदार अविनाश दळवी, पोलीस अंमलदार अजित पवार, पोलीस अंमलदार योगेश रोडे यांनी केली आहे.