समर्थ भारत वृत्तसेवा मंचर ता. २८ : राज्याचे सहकार मंत्री दिलीप वळसे पाटील काल संध्याकाळी आपल्या राहत्या घरातच पाय घसरून पडल्याने त्यांच्या हाताला आणि पायाला गंभीर स्वरूपाची दुखापत झाली आहे! त्यांच्यावर रुग्णालयात प्राथमिक उपचार केले असून आता त्यांची प्रकृती स्थिर आहे. मात्र गरज पडल्यास त्यांच्यावर शस्त्रक्रिया केली जाऊ शकते असं म्हणत डॉक्टरांनी त्यांना पुढील काही दिवस विश्रांतीचा सल्ला दिलाय. लोकसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर सहकार मंत्री दिलीप वळसे पाटील यांच्यावर अजित पवार गटाने मोठी जबाबदारी सोपवली होती मात्र वळसे पाटील यांना विश्रांती घ्यावी लागणार असल्याने नुकतेच राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात दाखल झालेले माजी खासदार शिवाजीराव आढळराव पाटील यांचे टेन्शन वाढले आहे. वीस वर्षांपूर्वी दिलीप वळसे पाटलांची साथ सोडत शिवसेनेत दाखल झालेले शिवाजीराव आढळराव पाटील यांनी राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार, सहकार मंत्री दिलीप वळसे पाटील, प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे, महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर, आ. दिलीप मोहिते, आ. अतुल बेनके, मा. आ. पोपटराव गावडे आदी मान्यवरांच्या उपस्थितीत राष्ट्रवादी...
समर्थ भारत माध्यम समूह