समर्थ भारत वृत्तसेवा
आदर्श माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय जांबूत येथील बारावी वाणिज्य विभागाचा निरोप समारंभ कार्यक्रम आयोजित केला होता.आयुष्यात सतत नवनवीन शिकत रहा आणि स्वतःच्या आत ज्ञान रूजवत रहा, मग तुम्हाला कुणीही हरवू शकत नाही,बारावीचे वर्षाचा विद्यार्थ्यांच्या जीवनातील महत्त्वाचा टप्पा असतो. मेहनत करा. अपयशाला न घाबरता विद्यार्थ्यांनी ध्येय ठरवून उद्दिष्ट गाठण्यासाठी प्रयत्न करावेत, ग्रामीण भागातील मुलांना दर्जेदार आणि माफक शिक्षण घेता यावे या उद्देशाने विद्यालयाची उभारणी करण्यात आली.
असल्याचे कार्यक्रमाचे अध्यक्ष संस्थेचे संस्थापक अध्यक्ष डॉ.शिवाजी जगताप यांनी सांगितले.या वेळी,जांबूत गावच्या मा. सरपंच जयश्री जगताप.सोमनाथ शिकदाळे.मिलिंद कांबळे, प्राध्यापिका पाबळे मॅडम यांनी मनोगत व्यक्त केले.याशिवाय दीपक भालेराव,सुभाष खांडगे.आणी ग्रामस्थ आदी मान्यवर उपस्थित होते.विद्यार्थ्यांना बोर्ड परीक्षे विषयी मार्गदर्शन परीक्षा विभाग प्रमुख उल्हास खांडगे सर यांनी केले तर कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. मनीषा शिस्तार यांनी केले आणि आभार प्रा.संदीप डेरे सर यांनी मानले.
जिद्द, मेहनत आणि ज्ञान यांचा त्रिवेणी संगम झाल्यानंतर यश कोणीही रोखवू शकत नाही.असे मत कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे बोरी ज्युनियर कॉलेज चे प्राचार्य गणेश शिंदे सर यांनी व्यक्त केले.