समर्थ भारत वृत्तसेवा: लाखणगाव
आंबेगाव तालुक्यातील लाखणगाव या ठिकाणी श्री हनुमान व विठ्ठल रुख्मिणी अपूर्ण बांधकाम असलेल्या मंदिरात दारूची पार्टी करून दारूच्या रिकाम्या पिशव्या मंदिरात टाकण्यात आल्या असल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे.
लाखणगाव गावामध्ये दारूबंदी असून ही दारू येते कु ठून असा सवाल आता ग्रामस्थ करत आहेत. गावातील हनुमान मंदिर व विठ्ठल रुक्मिणी मंदिरात काही समाजकं टक मुद्दाम दारू पिऊन फु गे मंदिरातच ठेवून मंदिराचे पावित्र्य भंग करत असल्याचे निदर्शनास आले आहे.
असा प्रकार करणाऱ्यावर कठोर कारवाई व्हावी अशी अपेक्षा शिरीष कुमार रोडे पाटील यांनी व्यक्त के ली आहे. या मंदिराच्या जीर्णोद्धाराचे काम चालू असल्याने भाविक भक्ताची वर्दळ कमी असल्याचा फायदा घेऊन तळीराम मंदिरात मद्यपान करून रिकाम्या पिशव्या तिथेच टाकून निघून जातात.