समर्थ भारत वृत्तसेवा : लाखनगाव, विजय कानसकर,
आंबेगाव तालुक्यातील रोडेवाडी फाटा ( पोंदेवाडी ) 18 फेब्रुवारी रोजी सकल मराठा बांधव आणि महिलांच्या वतीने बेल्हा जेजुरी, अष्टविनायक मुख्य महामार्गावर ट्रक आडवा लावला.
या आंदोलनाची प्रमुख मागणी होती जरांगे पाटील
यांच्या मागण्या सरकारने मान्य कराव्या व तात्काळ मराठा
आरक्षणाचा अध्यादेश काढावा, तसेच राज्यातील जे मराठा आमदार, खासदार आहेत त्यांनी जरांगे पाटील यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहत मराठा आरक्षणाला जाहीर पाठिंबा द्यावा. यासारख्या विविध मागण्या घेऊन मराठा आंदोलकांनी हे आंदोलन रोडेवाडी फाटा ( पोंदेवाडी ) येथे केले आहे, याप्रसंगी प्रशासनाच्या वतीने आंदोलकांना समजावण्याचा प्रयत्न करत महामार्ग सुरळीत सुरू करण्याचा प्रयत्न करण्यात आला मात्र आंदोलनकर्ते ऐकण्याच्या मनस्थितीत नव्हते, अष्टविनायक तसेच बेल्हा जेजुरी या मुख्य महामार्गावर वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या होत्या. आता शासन जरांगे पाटील यांच्या अटी पूर्ण करणार का पुन्हा एकदा महाराष्ट्र राज्यात ठिकठिकाणी रास्ता रोको मराठा आंदोलनकर्ते करणार का? कारण जरांगे पाटील यांची तब्येत दिवसेंदिवस आमरण उपोषणामुळे खालावत चालली आहे. याची चिंता राज्यातील कोट्यवधी मराठा समाजाला लागून राहिली आहे.
त्यामुळे मराठा समाज आक्रमक होत ठीक ठिकाणी रास्ता रोको आंदोलन करत आहे.
शासनाने त्यांच्या मागण्या मान्य करून मराठा
समाजाला न्याय द्यावा हीच या आंदोलनकर्त्यांची मागणी आहे. यावेळी आंदोलकांनी मराठा आरक्षण विषय तात्काळ निकाली काढून जरांगे पाटील यांचं उपोषण सोडवण्याची मागणी केली.
आंदोलना दरम्यान कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी पारगाव का. पोलिस स्टेशनच्या वतीने बंदोबस्त ठेवला होता.