समर्थ भारत वृत्तसेवा: लाखणगाव
पोंदेवाडी गावच्या हद्दीतून टेम्पो, बुलेट, स्प्लेंडर, व इतर साहित्य मिळून २ लाख ३१ हजार रुपये किमतीचे साहित्य अज्ञात चोरट्याने चोरून नेल्याची घटना दि. २६/१/२०२४ ते २७/१/२०२४ चे दरम्यान घडली असून या बाबत अन्सार गफुर चौघुले रा. लाखनगाव ता. आंबेगाव यांनी पारगाव पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की फिर्यादी अन्सार चौगुले यांचा शेती व वखार व्यवसाय असून त्यांनी वखार व्यवसायासाठी पाच वर्षांपूर्वी एम. एच ०४ एस १३४८ टाटा कंपनीचा टेम्पो, तीन वर्षांपूर्वी घेतलेली एम. एच १२ एम. टी २५४१ बुलेट गाडी, दोन वर्षांपूर्वी घेतलेली एम. एच १४ एच.एक्स ५११९ स्प्लेंडर मोटरसायकल हि वाहने आहेत. फिर्यादी यांनी पोंदेवाडी गावच्या हद्दीत रोडेवाडी फाटा येथे वखारीचे साहित्य, टेम्पो, दुचाकी व इतर साहित्य ठेवण्यासाठी कंपाउंड तयार केले असून ओपन शेडमध्ये वखार तयार केली आहे. दिनांक २६ रोजी नेहमीप्रमाणे त्यांनी त्यांच्या गाड्या शेडमध्ये ठेवल्या होत्या रात्री दहा वाजता शेताला पाणी भरून ते ओपन शेड व वखारीचे शेडला कुलुप लावून तेथेच एका रूम मध्ये झोपले होते. दि. २७ रोजी सकाळी सात वाजता ते उठले असता त्यांना कंपाउंड चे बाहेर रस्त्यावर लावलेला टेम्पो दिसला नाही त्यावेळी त्यांनी कंपाउंड शेडमध्ये पहानी केली असता कंपाउंड शेडचे कुलूप तुटलेले होते व कंपाउंड मधील लावलेली बुलेट, स्प्लेंडर, लाकडे कापण्याचा चार मशीन, दोन चार चाकी गाड्यांच्या बॅटरी, तीन कोयते, चार चाकी गाड्यांचे तीन जॅक, पहान्याची पिशवी असे साहित्य चोरीला गेले होते. त्यांनी आजूबाजूच्या परिसरात वाहने व साहित्यांचा शोध घेतला असता ते मिळून आले नाही. अन्सार चौगुले यांच्या ९० हजार रुपये किमतीचा टेम्पो, ४० हजार रुपये किमतीची बुलेट, ३० हजार रुपये किमतीची स्प्लेंडर, ६० हजार रुपये किमतीच्या लाकडे कापण्याच्या चार मशीन, १० हजार रुपये किमतीच्या दोन बॅटऱ्या, ५०० रुपये किमतीचे लोखंडी कोयते व १ हजार रुपये किमतीची पान्हाची पिशवी असा एकूण २ लाख ३१ हजार रूपयांचा ऐवज चोरी गेला आहे. याबाबत त्यांनी पारगाव पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली आहे. पुढील तपास पारगाव पोलीस करत आहे.