Skip to main content

Posts

Showing posts from February, 2024

मुख्यमंत्री, मा. खा. आढळराव पाटील आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांची मुंबईत भेट?

समर्थ भारत वृत्तसेवा: शिरुर लोकसभा मतदारसंघात महायुतीचा उमेदवार निवडीचा गोंधळ कायम असून ही जागा अजित पवारांच्या राष्ट्रवादीकडे जाणार हे आता नक्की झालंय. त्यामुळे महाविकास आघाडीचे उमेदवार डॉ. अमोल कोल्हे यांच्या विरोधात तुल्यबळ ठरू शकणारे उमेदवार मा. खा. शिवाजीराव आढळराव यांना राष्ट्रवादी काँग्रेस शिवाय आता कुठलाही पर्याय नाही. दुसरीकडे अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसकडेही सक्षम उमेदवार नाही, त्यामुळे राष्ट्रवादीच्या घड्याळ चिन्हावर मा. खा. आढळराव पाटील लढू शकतात असे बोलले जात आहे. यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, मा. खा. आढळराव पाटील आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यात चर्चा असल्याचे बोलले जात आहे. मात्र उपमुख्यमंत्री अजित पवारांसह अनेक नेत्यांचा आढळराव पाटील यांनी राष्ट्रवादी काँग्रेस मध्ये घेण्यास विरोध असल्याचेही चित्र आहे. या मतदार संघात महाविकास आघाडीकडून डॉ. अमोल कोल्हेंनाच उमेदवारी मिळणार यावर आता शिक्कमोर्तब झाले असून त्यांच्याविरोधात मा. खासदार शिवाजी आढळराव पाटील उमेदवार असतील तरच ही लढत तुल्यबळ होईल असे राजकीय जाणकार सांगतात.  मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री ...

आ. रोहित पवारांच्या एन्ट्रीने वळसे पाटलांचे टेन्शन वाढले?

समर्थ भारत वृत्तसेवा:  राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये उभी फूट पडल्यानंतर उपमुख्यमंत्री अजित पवारांनी वेगळी भूमिका घेत महायुती सरकारमध्ये सहभागी होण्याचा निर्णय घेतला. अजित पवारांच्या या निर्णयाला राष्ट्रवादी काँग्रेसमधील अनेक नेत्यांनी पाठिंबा दिला. शरद पवार यांचे विश्वासू सहकारी आणि मानसपुत्र अशी ओळख असलेले आंबेगाव विधानसभेचे आमदार आणि सहकारमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी देखील अनपेक्षितपणे अजित पवारांसोबत जाऊन शरद पवारांना मोठा धक्का दिला. मंत्री वळसे पाटलांच्या मतदार संघात शरद पवारांची उद्या (दि. २१) जाहीर सभा होणार आहे. या सभेकडे सबंध राज्याचे लक्ष लागले आहे. दरम्यान राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाचे आमदार रोहित पवार यांच्या बॅनर्समुळे पुणे जिल्ह्यात मोठी खळबळ उडाली आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार पुण्याचे पालकमंत्री आहेत. पुणे, पिंपरी-चिंचवड महापालिकेसह ग्रामीण परिसर राष्ट्रवादीचा बालेकिल्ला समजला जातो. पुणे, पिंपरी चिंचवडसह पुणे जिल्ह्यात फक्त अजित पवारांची दादागिरी! चालत असून; राष्ट्रवादी काँग्रेसच्या प्रत्येक कार्यकर्त्यांसाठी अजित पवार हेच दादा आहेत. मात्र, राष्ट्रवादी काँग्रेसम...

जांबुत येथे बारावीच्या विद्यार्थ्यांचा निरोप समारंभ संपन्न

  समर्थ भारत वृत्तसेवा आदर्श माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय जांबूत येथील बारावी  वाणिज्य विभागाचा निरोप समारंभ कार्यक्रम आयोजित केला होता.आयुष्यात सतत नवनवीन शिकत रहा आणि स्वतःच्या आत ज्ञान रूजवत रहा, मग तुम्हाला कुणीही हरवू शकत नाही,बारावीचे वर्षाचा विद्यार्थ्यांच्या‎ जीवनातील महत्त्वाचा टप्पा असतो. मेहनत करा.‎ अपयशाला न घाबरता विद्यार्थ्यांनी ध्येय ठरवून उद्दिष्ट‎ गाठण्यासाठी प्रयत्न करावेत, ग्रामीण भागातील मुलांना दर्जेदार आणि माफक शिक्षण घेता यावे या उद्देशाने विद्यालयाची उभारणी करण्यात आली. असल्याचे कार्यक्रमाचे अध्यक्ष संस्थेचे संस्थापक अध्यक्ष डॉ.शिवाजी जगताप यांनी सांगितले.या वेळी,जांबूत गावच्या मा. सरपंच जयश्री जगताप.सोमनाथ शिकदाळे.मिलिंद कांबळे, प्राध्यापिका पाबळे मॅडम यांनी मनोगत व्यक्त केले.याशिवाय दीपक भालेराव,सुभाष खांडगे.आणी ग्रामस्थ आदी मान्यवर उपस्थित होते.विद्यार्थ्यांना बोर्ड परीक्षे विषयी मार्गदर्शन परीक्षा विभाग प्रमुख उल्हास खांडगे सर यांनी केले तर कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. मनीषा शिस्तार यांनी केले आणि आभार प्रा.संदीप डेरे सर यांनी मानले. जिद्द, म...

मराठा समाज्याच्या वतीने रस्ता रोको

समर्थ भारत वृत्तसेवा : लाखनगाव, विजय कानसकर, आंबेगाव तालुक्यातील रोडेवाडी फाटा ( पोंदेवाडी ) 18 फेब्रुवारी रोजी सकल मराठा बांधव आणि महिलांच्या वतीने बेल्हा जेजुरी, अष्टविनायक मुख्य महामार्गावर ट्रक आडवा लावला. या आंदोलनाची प्रमुख मागणी होती जरांगे पाटील यांच्या मागण्या सरकारने मान्य कराव्या व तात्काळ मराठा आरक्षणाचा अध्यादेश काढावा, तसेच राज्यातील जे मराठा  आमदार, खासदार आहेत त्यांनी जरांगे पाटील यांच्या  पाठीशी खंबीरपणे उभे राहत मराठा आरक्षणाला जाहीर  पाठिंबा द्यावा. यासारख्या विविध मागण्या घेऊन मराठा  आंदोलकांनी हे आंदोलन रोडेवाडी फाटा ( पोंदेवाडी ) येथे केले आहे, याप्रसंगी प्रशासनाच्या वतीने आंदोलकांना समजावण्याचा प्रयत्न करत महामार्ग सुरळीत सुरू करण्याचा प्रयत्न करण्यात आला मात्र आंदोलनकर्ते ऐकण्याच्या मनस्थितीत नव्हते, अष्टविनायक तसेच बेल्हा जेजुरी या मुख्य महामार्गावर वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या होत्या. आता शासन जरांगे पाटील यांच्या अटी पूर्ण करणार का पुन्हा एकदा महाराष्ट्र राज्यात ठिकठिकाणी रास्ता रोको मराठा आंदोलनकर्ते करणार का? कारण जरांगे पाटील यांच...

महाराष्ट्र ही शौर्य आणि पराक्रमाची भूमी : योगी आदित्यनाथ

  समर्थ भारत वृत्तसेवा आळंदी ता. ११ : महाराष्ट्रात एकाच कुटुंबात चार संत होऊन गेले. त्यांचा आशीर्वाद आपल्याला शेकडो वर्षांपासून मिळतो आहे. याच महाराष्ट्रात छत्रपती शिवाजी महाराज यांना रामदास स्वामी यांनी घडवलं. त्यांनी औरंगजेबच्या सत्तेला आव्हान दिले. औरंगजेबला असे मारले की आजपर्यंत औरंगजेबला कोणी विचारलं नाही. महाराष्ट्र ही शौर्य आणि पराक्रमाची भूमी आहे. कारण इथं संतांचं सान्निध्य आहे असे गौरवोद्गार उत्तर प्रदेश राज्याचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी आळंदी येथे बोलताना केले. गीता भक्ती अमृत महोत्सवाच्या निमित्ताने स्वामी गोविंदगिरी महाराज यांच्या अमृतमहोत्सवानिमित्त आनंदसोहळ्याला उत्तर प्रदेश राज्याचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी यावेळी उपस्थित राहुन शुभेच्छा दिल्या. या कार्यक्रमाला शंकराचार्य स्वामी जयेंद्र सरस्वती महाराज, बाबा रामदेव, हभप शांतीब्रम्ह मारुती महाराज कुऱ्हेकर, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, मंत्री चंद्रकांत पाटील, दिलीप वळसे पाटील, आमदार दिलीप मोहिते पाटील, उमा खापरे, संजय भेगडे, मुरलीधर मोहोळ, लीलाधर काळे, संजय मालपाणी आदी उपस्थित होते. यावेळी योगी आदि...

लाखणगाव, पोंदेवाडी गावच्या हद्दीतून वाहने व इतर साहित्यांची चोरी

समर्थ भारत वृत्तसेवा: लाखणगाव पोंदेवाडी गावच्या हद्दीतून टेम्पो, बुलेट, स्प्लेंडर, व इतर साहित्य मिळून २ लाख ३१ हजार रुपये किमतीचे साहित्य अज्ञात चोरट्याने चोरून नेल्याची घटना दि. २६/१/२०२४ ते २७/१/२०२४ चे दरम्यान घडली असून या बाबत अन्सार गफुर चौघुले रा. लाखनगाव ता. आंबेगाव यांनी पारगाव पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली आहे.  याबाबत अधिक माहिती अशी की फिर्यादी अन्सार चौगुले यांचा शेती व वखार व्यवसाय असून त्यांनी वखार व्यवसायासाठी पाच वर्षांपूर्वी एम. एच ०४ एस १३४८ टाटा कंपनीचा टेम्पो, तीन वर्षांपूर्वी घेतलेली एम. एच १२ एम. टी २५४१ बुलेट गाडी, दोन वर्षांपूर्वी घेतलेली एम. एच १४ एच.एक्स ५११९ स्प्लेंडर मोटरसायकल हि वाहने आहेत. फिर्यादी यांनी पोंदेवाडी गावच्या हद्दीत रोडेवाडी फाटा येथे वखारीचे साहित्य, टेम्पो, दुचाकी व इतर साहित्य ठेवण्यासाठी कंपाउंड तयार केले असून ओपन शेडमध्ये वखार तयार केली आहे. दिनांक २६ रोजी नेहमीप्रमाणे त्यांनी त्यांच्या गाड्या शेडमध्ये ठेवल्या होत्या रात्री दहा वाजता शेताला पाणी भरून ते ओपन शेड व वखारीचे शेडला कुलुप लावून तेथेच एका रूम मध्ये झोपले होते. दि. २७ रोजी...

लाखणगाव तळीरामांचा मोर्चा श्री हनुमान मंदिराकडे

समर्थ भारत वृत्तसेवा: लाखणगाव आंबेगाव तालुक्यातील लाखणगाव या ठिकाणी श्री हनुमान व विठ्ठल रुख्मिणी अपूर्ण बांधकाम असलेल्या मंदिरात दारूची पार्टी करून दारूच्या रिकाम्या पिशव्या मंदिरात टाकण्यात आल्या असल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. लाखणगाव गावामध्ये दारूबंदी असून ही दारू येते कु ठून असा सवाल आता ग्रामस्थ करत आहेत. गावातील हनुमान मंदिर व विठ्ठल  रुक्मिणी मंदिरात काही समाजकं टक मुद्दाम दारू पिऊन फु गे मंदिरातच ठेवून मंदिराचे पावित्र्य भंग करत असल्याचे निदर्शनास आले आहे.  असा प्रकार करणाऱ्यावर कठोर कारवाई व्हावी अशी अपेक्षा शिरीष कुमार रोडे पाटील यांनी व्यक्त के ली आहे. या मंदिराच्या जीर्णोद्धाराचे काम चालू असल्याने भाविक भक्ताची वर्दळ कमी असल्याचा फायदा घेऊन तळीराम मंदिरात मद्यपान करून रिकाम्या पिशव्या तिथेच टाकून निघून जातात.

शरद पवारांची मंचरमध्ये सभा, निकम समर्थकांमध्ये उत्साह

समर्थ भारत वृत्तसेवा मंचर ता. ५ : सात महिन्यांपूर्वी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये उभी फूट पडल्यानंतर, शरद पवारांचे अत्यंत विश्वासू सहकारी असलेल्या दिलीपराव वळसे पाटील यांनी शरद पवारांची साथ सोडत अजित पवारांसोबत घरोबा केला होता. ही बाब शरद पवारांच्या जिव्हारी लागली होती. त्यानंतर शरद पवारांनी राष्ट्रवादी सोडून भाजप सोबत गेलेल्या नेत्यांच्या मतदारसंघात जाऊन त्यांची पोलखोल करण्याचे जाहीर केले होते. या पोलखोल मोहिमेची सुरुवात विद्यमान सहकार मंत्री दिलीपराव वळसे पाटील यांच्या मतदारसंघातून करणार असल्याचेही त्यांनी जाहीर केले होते. मात्र राज्यातील अनेक राजकीय, सांस्कृतिक आणि सामाजिक घडामोडींमुळे या मोहिमेला ब्रेक लागला होता.  या पोल खोल मोहिमेमध्ये अन्न आणि नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांचा येवला मतदार संघ आणि धनंजय मुंडे यांच्या बीड मधील सभा वगळता अन्य ठिकाणी सभा झाल्या नव्हत्या. आता लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी पुन्हा या मोहिमेला मंचर मधून सुरुवात करण्याचे ठरवले असून. मंचर मध्ये होणाऱ्या सभेत ते सहकार मंत्री दिलीपराव वळसे पाटील यांच्यावर...