समर्थ भारत वृत्तसेवा:
आज भाजपा आंबेगाव तालुका च्या वतीने मंचर नगरपंचायत मुख्याधिकारी गोविंद जाधव यांना नव्याने होऊ घातलेल्या भाजी मंडईस मंचर मधील एकमेव स्वातंत्र्यसैनिक कैलासवासी बापूशेठ महाजन हे नाव देण्यात यावे म्हणून निवेदन देण्यात आले.मंचरच्या इतिहासात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या व्यक्तीमत्त्वांमध्ये कै बापूशेठ (विश्वनाथ) महाजन हे आहेत. देशाला स्वातंत्र्य मिळवून देण्यासाठी त्यांनी पुण्याच्या येरवडा जेलमध्ये तुरुंगवास भोगला. त्यांच्या कार्याचा गौरव करत तत्कालीन मुख्यमंत्री मा. वसंत नाईक यांनी दिलेले गौरव पत्र आज ही महाजन परिवाराकडे आहे .
देशाला स्वातंत्र्य मिळवून आज 75 वर्षे पूर्ण झाले. परंतु तरीदेखील मंचरच्या भूमीमध्ये स्वातंत्र्यासाठी तुरुंगवास भोगणाऱ्या कै. बापूशेठ महाजन यांच्या स्मृतींना, कार्याला जागृत ठेवणारे एकही स्मृतीस्थान नाही.त्यामुळे येणाऱ्या पिढीला त्यांच्या कार्याचे स्मरण राहावे व त्यांच्या कार्याचा मंचर करांकडून होणारा गौरव म्हणून मंचर येथील नव्याने होऊ घातलेल्या भाजी मंडईस स्वातंत्र्य सैनिक कै.बापूशेठ उर्फ विश्वनाथ महाजन भाजी मंडई असे नामकरण करण्यात यावे असे या आशयाचे निवेदन भाजपा तालुका अध्यक्ष संदीप भाऊ बानखेले, भाजपा महिला मोर्चा तालुका सरचिटणीस जागृती महाजन, मंचर शहर अध्यक्ष योगेश बोराडे, विकास बाणखेले, महिला मोर्चा शहर अध्यक्षा छाया थोरात, पल्लवी थोरात यांनी दिले.