समर्थ भारत वृत्तसेवा:
मंचर ता. ८ : सहकार मंत्री दिलीपराव वळसे पाटील यांच्या विशेष प्रयत्नांतून तांबडेमळा (अवसरी, ता. आंबेगाव) येथे एसटी आगार सुरू झाले. त्याचा मोठा गाजावाजा देखील करण्यात आला, मात्र याच एसटीमुळे तालुक्यातील विद्यार्थी, चाकरमाने आणि वृद्ध अक्षरशः वैतागून गेले आहेत. वेळेत एसटी बस न सुटने, अचानक रद्द होणे,
नादुरुस्त होणे आदी कारणांमुळे तालुक्यातील प्रवाशी महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाच्या कारभारावर प्रचंड नाराज असून संबंधित अधिकारी आणि फक्त श्रेय घ्यायला पुढे येणाऱ्या नेत्यांना शिव्यांची लाखोली वाहत आहेत. आंबेगाव तालुक्यात हजारो विद्यार्थी; शाळा,
महाविद्यालयात जाण्यासाठी, चाकरमाने कामावर जाण्यासाठी, वृद्ध उपचारांसाठी आणि असंख्य नागरिक कुठल्या ना कुठल्या कारणाने एसटीने प्रवास करतात. मात्र हा एसटीचा प्रवास आता बिनाभरवशाचा झाला आहे. वेळेत न सुटणाऱ्या एसटीमुळे विद्यार्थ्यांना शाळा आणि महाविद्यालयांमध्ये जायला उशीर होतो, तर हातावर पोट असणाऱ्या चाकरमान्यांना उशिरा गेल्यामुळे मोठ्या आर्थिक नुकसानीला सामोरे जावे लागत आहे. वारंवार नादुरुस्त होणाऱ्या जुन्या खटारा गाड्यांमधून प्रवास करताना तालुक्यातील नागरिकांना जीव मुठीत धरून प्रवास करावा लागतो.
विद्यार्थ्यांना बिबट्याच्या हल्ल्याची भीती
मंचर आणि घोडेगाव येथे महाविद्यालयामध्ये ये-जा करणाऱ्या विद्यार्थ्यांना घरी जाण्यासाठी वेळे त बस मिळत नाहीत, बऱ्याचदा मुक्कामी बस उशिरा येतात किंवा नादुरुस्त/ु रद्द होतात. उशिरा निघाले ल्या बस रात्री उशिरा पोहोचतात. या बसमधून प्रवास करणाऱ्या विद्यार्थ्यांना रात्री अंधारात वाट शोधत आपले घर गाठावे लागते. आंबेगाव तालुका हे मोठे बिबट प्रमाण क्षेत्र असून रात्रीच्या अंधाराचा फायदा घेऊन बिबट्या विद्यार्थ्यांना आपले भक्ष्य बनवू शकतो. या दर्घ ु टनांची जबाबदारी महाराष्ट्रराज्य मार्ग परिवहन महामंडळ घेणार का? असा सवाल संतप्त पालक करत आहेत.
मंचर (तांबडेमळा) आगाराकडे फक्त १७ बस उपलब्ध आहेत. अनेक मुक्कामी बस या नारायणगाव आणि खेड आगाराकडू न संचलित होतात. मंचर आगारामध्येप्रत्यक्षात २९ बसेसची आवश्यकता आहे. मंचर आगाराला महामंडळाकडू न जर अधिक बसेस मिळाल्या तर प्रवाशांच्या सर्व समस्या दूर होऊ शकतील. - बालाजी सूर्यवंशी, आगार प्रमुख, मंचर