समर्थ भारत वृत्तसेवा :
पारगाव लोणी रस्त्यावर मोटार आणि दुचाकी मध्ये झालेल्या
अपघातात (ता. आंबेगाव) दुचाकीवरील सुरेश महादू भोजने यांचा
मृत्यू झाला असूण जयश्री भोजने या सदर अपघातात जखमी
झाल्या आहेत. हा अपघात शनिवार (ता. ६) दुपारी
एकच्या सुमारास घडला.
पारगाव पोलीस ठाण्याचे हद्दीत पारगाव लोणी रस्त्यावर मोटार आणि दुचाकीच्या
अपघातात दुचाकी चालक सुरेश महादु भोजणे (वय ५५
रा. जारकरवाडी भोजनदरा ता. आंबेगाव) यांचा मृत्यू झाला असून त्यांच्या
मागे बसलेली त्यांची पत्नी जयश्री भोजणे
(वय ५०) या गंभीर जखमी झाल्या आहेत. याबाबत अजय
सुरेश भोजने यांनी पारगाव पोलीस ठाण्यात
खबर दिली असून वॅगनार चालक निलेश कैलास सुक्रे (रा.
खडकवाडी, ता. आंबेगाव, जि. पुणे) याच्यावर पारगाव पोलीस ठाण्यात
गुन्हा दाखल करण्यात आला आहे. शनिवारी
(दि. ६) १ च्या सुमारास पारगाव लोणी रोडवर सुरेश
भोजने त्यांचे ताब्यातील दुचाकीवर (एम एच १४ डी व्हीं ९३७१)
त्यांची पत्नी राजश्री भोजणे हिला घेऊन
जाकरवाडी येथे येत असताना लोणी बाजुकडून येणाऱ्या वॅग्नर
गाडीचे (एम एच १४ जे एक्स २८३७) चालक
निलेश कैलास सूक्रे याने नियमांकडे दुर्लक्ष करून चुकीचे
बाजूने येत भोजणे यांच्या मोटरसायकलला धडक
दिली.
या अपघातात सुरेश महादु भोजणे व जयश्री सुरेश
भोजणे यांच्या डोक्याला, हातापायाला
गंभीर जखमा झाल्याने अजय भोजने यांचे वडील
सुरेश भोजणे हे मयत झाले आहेत; तर जयश्री भोजने
या गंभीर जखमी झाल्या आहेत. दरम्यान वॅगनार
चालक अपघाताची खबर न देता व वैद्यकीय मदत
न करता तसेच पोलीसाना माहीती न देता पळुन गेला असल्याचा आरोप
भोजने कुटुंबीयांनी केला आहे. पारगाव पोलीस ठाण्याचे सहाय्यक
पोलीस निरीक्षक लहू थाटे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस नाईक
सांगडे पुढील तपास आहेत.