महाराष्ट्र स्टुडंट इनोव्हेशन चॅलेंजमध्ये सिद्दार्थ टाव्हरेचा जिल्हाधिकारी राजेश देशमुख यांच्या हस्ते सत्कार
समर्थ भारत वृत्तसेवा: लाखणगाव
महाराष्ट्र स्टुडंट इनोव्हेशन चॅलेंज उपक्रमाच्या जिल्हास्तरीय विजेत्यांची घोषणा करण्यात आली. यामध्ये आंबेगाव तालुक्यातील सिद्दार्थ किसन टाव्हरे या विद्यार्थ्यांचा जिल्हा अधिकारी यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. 1 लाख रु धनादेश व प्रमाणपत्र देण्यात आले. लाखणगाव ग्रामस्थांकडून सत्कार करण्यात आला.
राज्यातील
विद्यार्थ्यांच्या नवसंकल्पनांना मूर्त स्वरूप देण्यासाठी महाराष्ट्र राज्य
नाविन्यता सोसायटीमार्फत
महाराष्ट्र स्टुडंट इनोव्हेशन चॅलेंजचे आयोजन करण्यात आले आहे. राज्यातील विद्यार्थ्यांच्या नवसंकल्पनांचा शोध घेणे व त्यांचे नवउद्योजकतेचे स्वप्न साकार करण्यासाठी योग्य ते पाठबळ पुरवणे हे या उपक्रमाचे मुख्य उद्दिष्ट आहे.
या उपक्रमाचे अनावरण दि. १५ जुलै २०२३ रोजी मा. मंत्री कौशल्य, रोजगार, उद्योजकता व नाविन्यता, महाराष्ट्र राज्य यांच्या हस्ते करण्यात आले होते. सदर उपक्रमास भरगोस प्रतिसाद भेटला. राज्यातील शासकीय विद्यापीठांच्या अधिपत्याखाली असलेल्या शैक्षणिक संस्था तसेच औद्योगिक प्रशिक्षण संस्थांना अशा एकूण २१७२ संस्थानी सहभाग घेतला.
ज्याअतंर्गत ९२२७ नवउद्योजकांनी आपला सहभाग नोंदवला. राज्यातील सर्व जिल्ह्यात जिल्हास्तरावर सादरीकरण सत्र दि २३ नोव्हेंबर ते २२ डिसेंबर २०२३ दरम्यान घेण्यात आले.
जिल्हानिहाय ज्यूरींनी केलेल्या मूल्यांकनानुसार व मार्गदर्शक तत्वांतील निकषांद्वारे जिल्हास्तरीय विजेते घोषित करण्यात आले. सदर विजेत्यांना महाराष्ट्र राज्य नाविन्यता सोसायटीमार्फत प्रत्येकी रु.१ लाख बीजभांडवल, प्रमाणपत्र देण्यात आले.