समर्थ भारत वृत्तसेवा मंचर :
आंबेगांव तालुक्यात वाढत असलेली शेतजमिनीची व सदनिकांची विक्री, गहाणखते आदी कामांमुळे अलीकडील काळात घोडेगाव येथील दुय्यम निबंधक कार्यालयावर कामाचा तान वाढत आहे. आंबेगावच्या पूर्व भागातील विकासाचा आलेख पाहता पूर्व भागातील मंचर, पारगाव, अवसरी, कळंब इतर अनेक भागात राष्ट्रीय महामार्ग किंवा रस्ताची कामे झाल्याने शेतीला सोन्यापेक्षा जास्त दर प्राप्त झाल्याने शेतीचे हस्तातंरण वाढत आहे. तसेच मंचर सारख्या भागात ४५ पेक्षा जास्त पतसंस्था उपलब्ध असुन गहानखताचे प्रमाणे देखील वाढले असल्याने मंचर येथे स्वतंत्र दुय्यम निबंध कार्यालय व्हावे अशी मागणी भाजपाच्या लीगल सेलचे पुणे जिल्हा अध्यक्ष अॅड. श्रीराम बांगर यांनी केली आहे.
आंबेगावच्या पूर्व भागासाठी मंचर हे मध्यवर्ती ठिकाण असल्याने, मंचर शहरात हे कार्यालय सुरू झाल्याने; आजूबाजूच्या गावांना व त्यातील नागरीकांना त्याचा नक्कीच फायदा होईल; तसेच दस्त नोंदणी कामी होणारी नागरिकांची धावपळ कमी होऊन त्यांना आर्थिक भुर्दंड देतील बसणार नाही. या बाबत गरज लक्षात घेवुन भारतीय जनता पक्षाचे कायदा आघाडीचे जिल्हाध्यक्ष अॅड. श्रीराम बांगर पाटील यांनी दुय्यम निबंधक कार्यालय स्वतंत्र कार्यालय मंचर या ठिकाणी मिळण्याकामी सहाय्यक जिल्हा निबंधक प्र.श. देशपांडे यांना निवेदन देवुन सविस्त चर्चा केली आहे.
सहाय्यक निबंधक देशपांडे यांनी याबाबत सविस्तर माहिती घेऊन, संबंधित अधिकाऱ्यांशी चर्चा करून सकारात्मक प्रयत्न करू असा विश्वास व्यक्त केला आहे.