समर्थ भारत वृत्तसेवा:
महाळुंगे पडवळ(ता.आंबेगाव) येथे कृषीकन्या शेतकऱ्यांना शेतीविषयी माहिती देण्याचे काम करत आहेत.
बियाण्यांची बीजप्रक्रिया करणे खूप महत्त्वाचे असते. एखाद्या लहान बाळाचे लहाणपणीच लसीकरण केले जाते. त्यामुळे विविध आजारांपासून त्याचे संरक्षण केले जाते. त्याचप्रमाणे पिकावर येणारे रोग जे जमिनीच्या माध्यमातून, बियाण्यांपासून होतात, अशा रोगांपासून तसेच किडींपासून पिकाचे संरक्षण करण्यासाठी बीजप्रक्रिया महत्त्वाची असते. बीजप्रक्रियेमुळे जास्तीचा होणारा फवारणीचा खर्च कमी होऊ शकतो.
महात्मा फुले कृषी विद्यापीठ अंतर्गत पद्मभूषण वसंतदादा पाटील कृषी महाविद्यालय,आंबी (ता.मावळ) येथील विद्यार्थीनींनी बीजप्रक्रिया करण्याचे प्रात्याक्षिक शेतकरी बांधवाना करून दाखविले .
कृषी जागरूकता आणि कृषी औद्योगिक कार्यानुभव २०२३-२०२४ कार्यक्रमांतर्गत ह्या विद्यार्थीनी तीन महिने महाळुंगे पडवळ येथे मुक्कामी राहून शेतीबाबत मोफत प्रात्यक्षिक देणार आहेत, अशी माहिती महाविद्यालयाचे कार्यक्रम समन्वयक डॉ. अविनाश खरे व कार्यक्रम अधिकारी चेतना नायकरे यांनी दिली. कृषीकन्या स्नेहा पाटील,साक्षी गलांडे,विशाखा शिवले,वैष्णवी शिवले,अंजली माने,प्रेमज्योती ठोंगे यांनी शेतकऱ्यांना बीजप्रक्रिया करन्याचे आवाहन केले.