समर्थ भारत वृत्तसेवा:
महाराष्ट्राचे लाडके नेते हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे त्यांनी संपूर्ण महाराष्ट्राचे हृदय जिंकले होते, त्यांनी मराठी बाणा कायम ठेवला होता, आपल्या भाषणांतून त्यांनी मराठी माणसांना प्रभावित केलं होतं. तसेच कायम मराठी माणसाच्या न्याय हक्कासाठी लढले
बाळासाहेब ठाकरे याचं स्वप्न होत की, आयोध्येमध्ये भव्य दिव्य प्रभू श्रीराम मंदीर उभारण्याच त्यांचे स्वप्न भारताचे पंतप्रधान नरेंद मोदी यांच्या रूपाने साकार झाले आणि देशातच नव्हे तर संपूर्ण जगभरात भारतीयांनी आनंदोत्सव साजरा केला आणि खऱ्या अर्थाने भारतात रामराज्य आले.
महाराष्ट्राचे लाडके नेते हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांनी संपूर्ण महाराष्ट्राचे हृदय जिंकले होते, त्यांनी मराठी बाणा कायम ठेवला होता, आपल्या भाषणांतून त्यांनी मराठी माणसांना प्रभावित केलं होतं.
स्वातंत्र्यसेनानी नेताजी सुभाषचंद्र बोस यांची आज जयंती आहे. नेताजींनी स्वातंत्र्य चळवळीत मोलाचा वाटा निभावला. त्याच्या स्मरणार्थ कृतज्ञता म्हणून हा दिवस दरवर्षी 'पराक्रम दिवस' म्हणून साजरा केला जातो.
यावेळी सरपंच श्चेता ढोबळे, शाखाप्रमुख श्रीकांत लोंखंडे, ग्रामपंचायत सदस्य किरण ढोबळे, रोहिणी देवडे, बजरंग देवडे, तेजस जगताप, साहिल लबडे, तुषार दातीर, प्रथमेश गावडे,ग्रामपंचायत कर्मचारी सुधिर ढोबळे, रवी ढोबळे, बाबु जाधव, विजया शेलार व शिवसैनिक व ग्रामस्थ उपस्थित होते.