समर्थ भारत वृत्तसेवा: घोडेगाव,
जमिनीच्या
वादाचा राग मनात धरून बांधावरील बाभळीची झाडे का तोडली म्हणत २९ वर्षीय तरुणाला
बेद्दम मारहाण करण्यात आली आहे.
याबाबत सविस्तर माहिती अशी की, १० जानेवारी २०२४ रोजी दुपारी १२.३० वा. सुमारास फिर्यादी किरण रामदास गावडे वय २९ वर्ष, रा. साल, ता. आंबेगाव हे गावरवाडी येथील त्यांच्या जमिनीच्या बांधावरील असलेली बाभळीची तोडली असता आरोपी उत्तम दगडू फदाले हे फिर्यादी गावडे यांच्या सोबत वाद घालू लागले तू ह्या बाभळी का तोडल्या ह्या बाभळी माझ्या हद्दीतल्या आहेत.
त्यावेळी फिर्यादी सांगत होते कि मी माझ्या
हद्दीतील बाभळी तोसल्या आहेत तुमच्या हद्दीतील बबली मी तोडल्या नाहीत तर आरोपी उत्तम
दगडू फदाले यांनी फिर्यादीस मारहाण सुरु केली आणि आरोपी यांनी त्यांचा मुलगा
अर्जुन उत्तम फदाले याला फोन करून बोलावून घेतले अर्जुन उत्तम फदाले याने शिविगाळ आणि
दमदाटी करत जबर मारहाण सुरु केली, बाजूलाच पडलेली काठी घेऊन फिर्यादी यांच्या
डोक्यात मारून फिर्यादी यास दुखापत केली असून घोडेगाव पोलिस स्टेशन गुन्हा दाखल
करण्यात आला असून पुढील तपास घोडेगाव पोलिस करत आहेत.