मंचर प्रतिनिधी:
आंबेगाव तालुक्यातील बेलसरवाडी येथील २५ वर्षीय विवाहितेला लग्नात हुंडा दिला नाही म्हणून सासरच्या लोकांनी मानसिक व शारीरिक त्रास देत घातपात केल्याचा संशय विवाहितेच्या आईने केला आहे.
याबाबत सविस्तर माहिती अशी कि,
मयत अनुष्का केतन गावडे वय २५ वर्ष रा. मंचर ता आंबेगाव जि पुणे. यांचा विवाह आरोपी 1)पती केतन गुलाब गावडे, यांच्याशी १ एप्रिल २०२१ रोजी झाला होता विवाह झालेनंतर सुमारे तीन ते चार महीन्यांनतर ते दिनांक २५ जानेवारी २०२४ रोजी पर्यंत वेळोवेळी मौजे मंचर येथे तिचे पति केतन गुलाब गावडे, आरोपी गुलाब सखाराम गावडे(सासरे), आरोपी कल्पना गुलाब गावडे(सासु), आरोपी कांचन गुलाब गावडे(भाया), आरोपी शुभांगी कांचन गावडे(जाऊ) सर्व रा. मंचर ता. आंबेगाव, जि. पुणे, मुळ यांनी मुलगी अनुष्का हिला तुझ्या घरातील लोकांनी लग्नात आमचा मानपान निट केला नाही, हुंडा दिला नाही. तुला घरात निट स्वयंपाक येत नाही. कपडे धुता येत नाही, घरात झाडुन घेता येत नाही, तुझ्या माहेरून फोर व्हीलर गाडी घ्यायला पैसे घेवुन ये नाहीतर आमचे येथे राहायचे नाही असे म्हणुन वारंवार त्रास देवुन मुलगी अनुष्का हिचा गर्भपात केला आहे. तसेच मुलगी अनुष्का हिचेशी भांडणतंटा करून तिला मारहाण व शिवीगाळ दमदाटी करून तिला क्रुर वागणुक देवुन तिचा शारीरीक व मानसिक छळ करून तिचे मृत्युस कारणीभुत ठरले आहेत.
२५ जानेवारी २०२४ रोजी सुमारे रात्री 10. 30 वाजताच्या सुमारास अनुष्का केतन गावडे हिचा मृत्यू झाला असून तिच्या सासरच्या लोकांना याबाबत विचारणा केली असता त्यांनी उडवा उडवीची उत्तर दिली आहे. म्हणुन फिर्यादी स्वाती अतुल बांगर यांनी मंचर पोलिस स्टेशन फिर्याद दाखल केली आहे.
या घटनेचा पुढील तपास मंचर पोलिस स्टेशनचे पोलीस निरीक्षक बळवंत मांडगे यांच्या मार्गदर्शनाखाली स.पो.नि कांबऴे हे करत आहेत.