Skip to main content

Posts

Showing posts from January, 2024

मंचर येथे दुय्यम निबंधक कार्यालय व्हावे : अॅड. बांगर

समर्थ भारत वृत्तसेवा मंचर :  आंबेगांव तालुक्यात वाढत असलेली शेतजमिनीची व सदनिकांची विक्री, गहाणखते आदी कामांमुळे अलीकडील काळात घोडेगाव येथील दुय्यम निबंधक कार्यालयावर कामाचा तान वाढत आहे. आंबेगावच्या पूर्व भागातील विकासाचा आलेख पाहता पूर्व भागातील मंचर, पारगाव, अवसरी, कळंब इतर अनेक भागात राष्ट्रीय महामार्ग किंवा रस्ताची कामे झाल्याने शेतीला सोन्यापेक्षा जास्त दर प्राप्त झाल्याने शेतीचे हस्तातंरण वाढत आहे. तसेच मंचर सारख्या भागात ४५ पेक्षा जास्त पतसंस्था उपलब्ध असुन गहानखताचे प्रमाणे देखील वाढले असल्याने मंचर येथे स्वतंत्र दुय्यम निबंध कार्यालय व्हावे अशी मागणी भाजपाच्या लीगल सेलचे पुणे जिल्हा अध्यक्ष अॅड. श्रीराम बांगर यांनी केली आहे. आंबेगावच्या पूर्व भागासाठी मंचर हे मध्यवर्ती ठिकाण असल्याने, मंचर शहरात हे कार्यालय सुरू झाल्याने; आजूबाजूच्या गावांना व त्यातील नागरीकांना त्याचा नक्कीच फायदा होईल; तसेच दस्त नोंदणी कामी होणारी नागरिकांची धावपळ कमी होऊन त्यांना आर्थिक भुर्दंड देतील बसणार नाही. या बाबत गरज लक्षात घेवुन भारतीय जनता पक्षाचे कायदा आघाडीचे जिल्हाध्यक्ष अॅड. श्रीराम बांगर ...

महाळुंगे पडवळ मध्ये कृषीकन्यांकडून बीजप्रक्रियेचे प्रात्याक्षिक

समर्थ भारत वृत्तसेवा: महाळुंगे पडवळ(ता.आंबेगाव) येथे कृषीकन्या शेतकऱ्यांना  शेतीविषयी माहिती देण्याचे काम करत आहेत. बियाण्यांची बीजप्रक्रिया करणे खूप महत्त्वाचे असते. एखाद्या लहान बाळाचे लहाणपणीच लसीकरण केले जाते. त्यामुळे विविध आजारांपासून त्याचे संरक्षण केले जाते. त्याचप्रमाणे पिकावर येणारे रोग जे जमिनीच्या माध्यमातून, बियाण्यांपासून होतात, अशा रोगांपासून तसेच किडींपासून पिकाचे संरक्षण करण्यासाठी बीजप्रक्रिया महत्त्वाची असते. बीजप्रक्रियेमुळे जास्तीचा होणारा फवारणीचा खर्च कमी होऊ शकतो. महात्मा फुले कृषी विद्यापीठ अंतर्गत पद्मभूषण वसंतदादा पाटील कृषी महाविद्यालय,आंबी (ता.मावळ) येथील विद्यार्थीनींनी बीजप्रक्रिया करण्याचे प्रात्याक्षिक शेतकरी बांधवाना करून दाखविले . कृषी जागरूकता आणि कृषी औद्योगिक कार्यानुभव २०२३-२०२४ कार्यक्रमांतर्गत ह्या विद्यार्थीनी तीन महिने महाळुंगे पडवळ येथे मुक्कामी राहून शेतीबाबत मोफत प्रात्यक्षिक देणार आहेत, अशी माहिती महाविद्यालयाचे कार्यक्रम समन्वयक डॉ. अविनाश खरे व कार्यक्रम अधिकारी चेतना नायकरे यांनी दिली. कृषीकन्या स्नेहा पाटील,साक्षी गलांडे,विशाखा शि...

२५ वर्षीय विवाहितेचा घातपात, नातेवाईकांचा आरोप

मंचर प्रतिनिधी: आंबेगाव तालुक्यातील बेलसरवाडी येथील २५ वर्षीय विवाहितेला लग्नात हुंडा दिला नाही म्हणून सासरच्या लोकांनी मानसिक व शारीरिक त्रास देत घातपात केल्याचा संशय विवाहितेच्या आईने केला आहे.  याबाबत सविस्तर माहिती अशी कि, मयत अनुष्का केतन गावडे वय २५ वर्ष रा. मंचर ता आंबेगाव जि पुणे. यांचा विवाह आरोपी 1)पती  केतन गुलाब गावडे, यांच्याशी १ एप्रिल २०२१ रोजी झाला होता विवाह झालेनंतर सुमारे तीन ते चार महीन्यांनतर ते दिनांक २५ जानेवारी २०२४ रोजी पर्यंत वेळोवेळी मौजे मंचर येथे तिचे पति केतन गुलाब गावडे, आरोपी गुलाब सखाराम गावडे(सासरे), आरोपी कल्पना गुलाब गावडे(सासु), आरोपी कांचन गुलाब गावडे(भाया), आरोपी शुभांगी कांचन गावडे(जाऊ) सर्व रा. मंचर ता. आंबेगाव, जि. पुणे, मुळ यांनी मुलगी अनुष्का हिला तुझ्या घरातील लोकांनी लग्नात आमचा मानपान निट केला नाही, हुंडा दिला नाही. तुला घरात निट स्वयंपाक येत नाही. कपडे धुता येत नाही, घरात झाडुन घेता येत नाही, तुझ्या माहेरून फोर व्हीलर गाडी घ्यायला पैसे घेवुन ये नाहीतर आमचे येथे राहायचे नाही असे म्हणुन वारंवार त्रास देवुन मुलगी अनुष्का हिचा गर्भपा...

महाराष्ट्र स्टुडंट इनोव्हेशन चॅलेंजमध्ये सिद्दार्थ टाव्हरेचा जिल्हाधिकारी राजेश देशमुख यांच्या हस्ते सत्कार

समर्थ भारत वृत्तसेवा: लाखणगाव महाराष्ट्र स्टुडंट इनोव्हेशन चॅलेंज उपक्रमाच्या जिल्हास्तरीय विजेत्यांची घोषणा करण्यात आली.  यामध्ये आंबेगाव तालुक्यातील सिद्दार्थ किसन टाव्हरे या विद्यार्थ्यांचा जिल्हा अधिकारी  यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. 1 लाख रु धनादेश व प्रमाणपत्र देण्यात आले. लाखणगाव ग्रामस्थांकडून सत्कार करण्यात आला. राज्यातील विद्यार्थ्यांच्या नवसंकल्पनांना मूर्त स्वरूप देण्यासाठी महाराष्ट्र राज्य नाविन्यता सोसायटीमार्फत महाराष्ट्र स्टुडंट इनोव्हेशन चॅलेंजचे आयोजन करण्यात आले आहे. राज्यातील विद्यार्थ्यांच्या नवसंकल्पनांचा शोध घेणे व  त्यांचे नवउद्योजकतेचे स्वप्न साकार करण्यासाठी योग्य ते पाठबळ पुरवणे हे या उपक्रमाचे मुख्य उद्दिष्ट आहे.  या  उपक्रमाचे अनावरण दि. १५ जुलै २०२३ रोजी मा. मंत्री कौशल्य , रोजगार , उद्योजकता व नाविन्यता , महाराष्ट्र राज्य  यांच्या हस्ते करण्यात आले होते. सदर उपक्रमास भरगोस प्रतिसाद भेटला. राज्यातील शासकीय विद्यापीठांच्या अधिपत्याखाली असलेल्या शैक्षणिक संस्था  तसेच औद्योगिक प्रशिक्षण संस्थांना अशा एकूण २...

घोडेगाव पोलीस ठाण्याच्या हद्दीत गांजा, जुगार, मटका अशा अवैध धंद्यांचा सुळसुळाट

समर्थ भारत वृत्तसेवा: घोडेगाव पोलीस स्टेशनच्या हद्दीत येणाऱ्या अनेक गावांमध्ये खुलेआम सुरू असलेला मटका बंद   होणार का ? असा प्रश्न सर्वसामान्य जनतेतून विचारला जात आहे. “ ओपन जेवू देईना ; क्लोज झोपू देईना ” अशी मटका शौकिनांची अवस्था झाल्याने अनेकांचे संसार उघड्यावर येऊ लागले आहेत. पोलिसांच्या “ तुंबड्या ” भरण्यासाठी? राजरोसपणे घोडेगाव पोलीस ठाण्याच्या हद्दीत अवैध मटका, जुगार, गांजा फोफावल्याचा आरोप सर्वसामान्य जनतेतून होत आहे. पोलीस अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या आशीर्वादाने सुरू असलेल्या मटक्याचा व्यवसाय थांबवण्यासाठी जिल्हा पोलीस प्रमुखांनी लक्ष घालावे अशी मागणी परिसरातील जनतेतून होत आहे. घोडेगाव पोलीस स्टेशनच्या हद्दीत मोठी बाजारपेठ व व्यापारी उलाढाल मोठी असलेली अनेक सधन गावे आहेत. या गावात व्यवसायिक उलाढाल मोठ्या प्रमाणावर सुरू असतात. गेल्या काही वर्षांपासून बंद झालेला मटका पुन्हा राजरोसपणे सुरु होऊन मटका घेणारे एजंट व खेळणाऱ्या मटका बहाद्दरांची संख्या दिवसागणिक वाढत आहे. नागरिकांच्या तक्रारीनुसार मटका राजरोसपणे सुरू असताना पोलीस किरकोळ कारवाई करत असतात व पुन्हा काही   दिवसां...

पारगाव येथे बाळासाहेब ठाकरे व नेताजी सुभाषचंद्र बोस यांना विनम्र अभिवादन

समर्थ भारत वृत्तसेवा: पारगाव शिंगवे(ता. आंबेगाव) येथे आज शिवसेनाप्रमुख स्व. बाळासाहेब ठाकरे यांना ९७ व्या जयंती निमित्त शिवसैनिकांनी पुष्पहार अर्पण करून नारळ फोडून आदरांजली वाहिली  महाराष्ट्राचे लाडके नेते हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे त्यांनी  संपूर्ण महाराष्ट्राचे हृदय जिंकले होते, त्यांनी मराठी बाणा कायम ठेवला होता, आपल्या भाषणांतून त्यांनी मराठी माणसांना  प्रभावित केलं होतं. तसेच कायम मराठी माणसाच्या न्याय हक्कासाठी लढले बाळासाहेब ठाकरे याचं स्वप्न होत की, आयोध्येमध्ये  भव्य दिव्य प्रभू श्रीराम मंदीर उभारण्याच त्यांचे स्वप्न भारताचे पंतप्रधान नरेंद मोदी यांच्या रूपाने साकार झाले आणि देशातच नव्हे तर संपूर्ण जगभरात भारतीयांनी आनंदोत्सव साजरा केला आणि खऱ्या अर्थाने भारतात रामराज्य आले.  महाराष्ट्राचे लाडके नेते हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांनी  संपूर्ण महाराष्ट्राचे हृदय जिंकले होते, त्यांनी मराठी बाणा कायम ठेवला होता, आपल्या भाषणांतून त्यांनी मराठी माणसांना  प्रभावित केलं होतं. स्वातंत्र्यसेनानी नेताजी सुभाषचंद्र बोस यांची आज जयंती आहे. नेताजी...

बांधावरील झाडे का तोडली म्हणत २९ वर्षीय तरुणाला बेद्दम मारहाण

 समर्थ भारत वृत्तसेवा: घोडेगाव, जमिनीच्या वादाचा राग मनात धरून बांधावरील बाभळीची झाडे का तोडली म्हणत २९ वर्षीय तरुणाला बेद्दम मारहाण करण्यात आली आहे. याबाबत सविस्तर माहिती अशी की, १० जानेवारी २०२४ रोजी दुपारी १२.३० वा. सुमारास फिर्यादी किरण रामदास गावडे वय २९ वर्ष, रा. साल, ता. आंबेगाव हे गावरवाडी येथील त्यांच्या जमिनीच्या बांधावरील असलेली बाभळीची तोडली असता आरोपी उत्तम दगडू फदाले हे फिर्यादी गावडे यांच्या सोबत वाद घालू लागले तू ह्या बाभळी का तोडल्या ह्या बाभळी माझ्या हद्दीतल्या आहेत.  त्यावेळी फिर्यादी सांगत होते कि मी माझ्या हद्दीतील बाभळी तोसल्या आहेत तुमच्या हद्दीतील बबली मी तोडल्या नाहीत तर आरोपी उत्तम दगडू फदाले यांनी फिर्यादीस मारहाण सुरु केली आणि आरोपी यांनी त्यांचा मुलगा अर्जुन उत्तम फदाले याला फोन करून बोलावून घेतले अर्जुन उत्तम फदाले याने शिविगाळ आणि दमदाटी करत जबर मारहाण सुरु केली, बाजूलाच पडलेली काठी घेऊन फिर्यादी यांच्या डोक्यात मारून फिर्यादी यास दुखापत केली असून घोडेगाव पोलिस स्टेशन गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास घोडेगाव पोलिस करत आहेत.

आंबेगाव तालुक्यात एसटी सेवेचा बोजवारा

समर्थ भारत वृत्तसेवा:  मंचर ता . ८ : सहकार मंत्री दिलीपराव वळसे पाटील यांच्या विशेष प्रयत्नांतून तांबडेमळा ( अवसरी , ता . आंबेगाव ) येथे एसटी आगार सुरू झाले . त्याचा मोठा गाजावाजा देखील करण्यात आला , मात्र याच एसटीमुळे तालुक्यातील विद्यार्थी , चाकरमाने आणि वृद्ध अक्षरशः वैतागून गेले आहेत . वेळेत एसटी बस न सुटने , अचानक रद्द होणे , नादुरुस्त होणे आदी कारणांमुळे तालुक्यातील प्रवाशी महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाच्या कारभारावर प्रचंड नाराज असून संबंधित अधिकारी आणि फक्त श्रेय घ्यायला पुढे येणाऱ्या नेत्यांना शिव्यांची लाखोली वाहत आहेत . आंबेगाव तालुक्यात हजारो विद्यार्थी ; शाळा , महाविद्यालयात जाण्यासाठी , चाकरमाने कामावर जाण्यासाठी , वृद्ध उपचारांसाठी आणि असंख्य नागरिक कुठल्या ना कुठल्या कारणाने एसटीने प्रवास करतात . मात्र हा एसटीचा प्रवास आता बिनाभरवशाचा झाला आहे . वेळेत न सुटणाऱ्या एसटीमुळे विद्यार्थ्यांना शाळा आणि महाविद्यालयांमध्ये जायला उशीर होतो , तर हातावर पोट असणाऱ्या चाकरम...

स्वातंत्र्यसैनिक कै. बापूशेठ महाजन यांचं नावं मंचरच्या भाजी मंडईला द्या भाजपची मागणी

समर्थ भारत वृत्तसेवा: आज भाजपा आंबेगाव तालुका च्या वतीने मंचर नगरपंचायत मुख्याधिकारी गोविंद जाधव यांना नव्याने होऊ घातलेल्या भाजी मंडईस मंचर मधील एकमेव स्वातंत्र्यसैनिक कैलासवासी बापूशेठ महाजन हे नाव देण्यात यावे म्हणून निवेदन देण्यात आले.मंचरच्या इतिहासात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या व्यक्तीमत्त्वांमध्ये कै बापूशेठ (विश्वनाथ) महाजन हे आहेत. देशाला स्वातंत्र्य मिळवून देण्यासाठी त्यांनी पुण्याच्या येरवडा जेलमध्ये तुरुंगवास भोगला. त्यांच्या कार्याचा गौरव करत तत्कालीन मुख्यमंत्री मा. वसंत नाईक यांनी दिलेले गौरव पत्र आज ही महाजन परिवाराकडे आहे .  देशाला स्वातंत्र्य मिळवून आज 75 वर्षे पूर्ण  झाले. परंतु तरीदेखील मंचरच्या भूमीमध्ये स्वातंत्र्यासाठी तुरुंगवास भोगणाऱ्या कै. बापूशेठ महाजन यांच्या स्मृतींना, कार्याला जागृत ठेवणारे  एकही स्मृतीस्थान नाही.त्यामुळे येणाऱ्या पिढीला त्यांच्या कार्याचे स्मरण राहावे  व त्यांच्या कार्याचा मंचर करांकडून होणारा गौरव म्हणून मंचर येथील नव्याने होऊ घातलेल्या भाजी मंडईस  स्वातंत्र्य सैनिक कै.बापूशेठ उर्फ विश्वनाथ महाजन भाजी मंडई असे नामकरण...

मागासवर्गीय कुटुंबाला मंचर पोलिसांकडून हीन वागणूक!

समर्थ भारत वृत्तसेवा मंचर ता. ६ : लांडेवाडी (ता. आंबेगाव) प्राथमिक आरोग्य केंद्रामध्ये प्रसुती दरम्यान डॉक्टरांच्या व कर्मचाऱ्यांच्या हलगर्जीपणामुळे लांडेवाडी येथील शिवाजी दादू लवांडे यांची मुलगी अश्विनी बाळू केसकर यांचा प्रसूती दरम्यान मृत्यू झाल्याचा आरोप लवांडे कुटुंबीयांनी केला होता. याबाबत त्यांनी मंचर पोलिस ठाण्यात तक्रार दिली होती. मात्र मंचर पोलिसांकडून याबात हलगर्जीपणा होत असल्याचे चित्र आहे. या प्रकरणात निष्पक्ष तपास केला जात नसून यातील दोषींना पोलिस पाठीशी घालत असल्याचा आरोप वंचित बहुजन आघाडीकडून केला गेला असून पोलिसांनी निष्पक्षपणे जबाबदाऱ्या पार न पाडल्यास आंदोलन करण्यात येईल असे वंचित बहुजन आघाडीच्या वतीने सांगण्यात आले आहे. शिवाजी लवांडे यांची मुलगी अश्विनी लवांडे केसकरला प्रसूतीसाठी लांडेवाडी येथील शासकीय आरोग्य केंद्रात भरती करण्यात आले होते. मात्र या आरोग्य केंद्रात तज्ञ डॉक्टर उपस्थित नसताना येथील परिचारिकेने सदर प्रसूती केली. त्या नंतर मोठ्या प्रमाणात रक्तस्राव सुरु झाला. यावेळी सदर आरोग्य केंद्रात कुठलेही डॉक्टर, परिचारिका, आरोग्य कर्मचारी उपस्थित नव्हते. रुग्णाची ...

बत्तीस वर्षीय महिला चार वर्षाच्या मुलीसह बेपत्ता

समर्थ भारत वृत्तसेवा: विजय कानसकर पारगाव  कारखाना.( ता आंबेगाव ) मुळ रा रोकडेतांडा ता चाळिसगाव जि जळगाव, येथील बत्तीस वर्षीय विवाहित महिला आपल्या चार वर्षाच्या मुलीसह बेपत्ता झाल्याची घटना रविवारी सकाळी सहा वाजता उघडकीस आली. या प्रकरणी पतीने दिलेल्या तक्रारीवरून पारगाव कारखाना पोलीस स्टेशन मध्ये हरवल्याची नोंद करण्यात आली आहे.  पारगाव कारखाना येथील राहते झोपडीतून सुरेखा सुरेश जाधव बत्तीस वर्षीय विवाहित महिला चार वर्षीय मुलगी सलोनी सुरेश जाधव या चिमकुलीसह कोणाला काही न सांगता अचानक घरातून निघून गेली. आजूबाजूच्या परिसरामध्ये व नातेवाईकांकडे शोध घेण्यात आला. परंतु ती कोठेच आढळून आली नाहीं. या प्रकरणी महिलेचा पती सुरेश मोरसिंग जाधव यांनी आपली पत्नी व मुलगी हरवल्याची तक्रार दाखल केली आहे. पारगाव पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक यांच्या  मार्गदर्शनाखाली पोलीस हवालदार किर्वे पुढील तपास करत आहे.

जन्मदात्यानेच मुलांना विष पाजत, पत्नीसह स्वतः घेतला गळफास

समर्थ भारत वृत्तसेवा: पारनेर तालुक्यातील वारणवाडीत एक धक्कादायक घटना घडली आहे. आपल्या पोटच्या लेकरांना विष पाजून एका बापाने त्यांची हत्या केल्याची घटना समोर आली आहे. सुदैवाने यात मुलगी वाचली आहे. मात्र यात मुलाचा मृत्यू झाला आहे. त्यानंतर पत्नीला गळफास देत , स्वतः गळफास घेऊन आत्महत्या केली. या घटनेनं पारनेर तालुक्यात व परिसरात खळबळ उडाली आहे. या घटनेबाबत मिळालेल्या माहितीनुसार , गजानन रोकडेने आपल्या मुलांना विषारी औषध पाजून व पत्नीला गळफास देऊन स्वतः ही आत्महत्या केल्याची घटना शुक्रवारी (दि.५) दुपारी उघडकीस आली आहे. या घटनेत नऊ वर्षांची मुलगी बचावली असून सहा वर्षांचा मुलगा आणि पती पत्नीचा मृत्यू झाला आहे. गजानन रोकडे , पौर्णिमा रोकडे , दुर्वेश रोकडे मृत झाले   असून नऊ वर्षाची चैताली रोकडे ही बचावली आहे. चैताली रोकडे हिच्यावर नगरच्या जिल्हा रुग्णालयात उपचार सुरू आहेत. गजानन रोकडे , पत्नी पौर्णिमा रोकडे हे जुन्नर तालुक्यातील रहिवासी असून पारनेर तालुक्यातील एका पतसंस्थेमध्ये नोकरी करत होते. याबाबत मयत गजानन रोकडे याचा भाऊ विजय भगवान रोकडे (रा. उदापूर ...

मोटारसायकलचा आणि चारचाकीचा अपघात; एक ठार, एक जखमी

समर्थ भारत वृत्तसेवा : पारगाव लोणी रस्त्यावर मोटार आणि दुचाकी मध्ये झालेल्या अपघातात (ता. आंबेगाव) दुचाकीवरील सुरेश महादू भोजने यांचा मृत्यू झाला असूण जयश्री भोजने या सदर अपघातात जखमी झाल्या आहेत. हा अपघात शनिवार (ता. ६) दुपारी एकच्या सुमारास घडला. पारगाव पोलीस ठाण्याचे हद्दीत पारगाव लोणी रस्त्यावर मोटार आणि दुचाकीच्या अपघातात दुचाकी चालक सुरेश महादु भोजणे (वय ५५ रा. जारकरवाडी भोजनदरा ता. आंबेगाव) यांचा मृत्यू झाला असून त्यांच्या मागे बसलेली त्यांची पत्नी जयश्री भोजणे (वय ५०) या गंभीर जखमी झाल्या आहेत. याबाबत अजय सुरेश भोजने यांनी पारगाव पोलीस ठाण्यात खबर दिली असून वॅगनार चालक निलेश कैलास सुक्रे ( रा. खडकवाडी , ता. आंबेगाव , जि. पुणे) याच्यावर पारगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. शनिवारी (दि. ६) १ च्या सुमारास पारगाव लोणी रोडवर सुरेश भोजने त्यांचे ताब्यातील दुचाकीवर (एम एच १४ डी व्हीं ९३७१) त्यांची पत्नी राजश्री भोजणे हिला घेऊन जाकरवाडी येथे येत असताना लोणी बाजुकडून येणाऱ्या वॅग्नर गाडीचे (एम एच १४ जे एक्स २८३७) चालक निलेश कैलास सूक्रे याने ...