समर्थ भारत वृत्तसेवा: पुणे
A case has been registered against three bribe-taking education officials
तुकाराम सुपे याने 3 कोटी 59 लाख रुपये, विष्णू कांबळे यांनी ८२ लाख रुपये, तर किरण लोहारने 5 कोटी 85 लाख रुपयांची बेकायदा संपत्ती जमवल्याचा आरोप आहे. यापैकी तुकाराम सुपेला अटक देखील झाली होती, सध्या तो सेवानिवृत्त आहे. सर्वांविरुद्ध कायदेशीर प्रक्रिया सुरू आहे.
आरोपी लोकसेवक :
1. तुकाराम नामदेव सुपे, वय - 59 वर्षे, तत्कालीन शिक्षणाधिकारी माध्यमिक जि प पुणे. (सध्या सेवा निवृत्त) रा. कल्पतरू, गांगर्डेर नगर, सुदर्शन हॉस्पिटल समोर, पिंपळे गुरव, पुणे.
1. विष्णू मारुतीराव कांबळे वय 59 वर्ष, सेवानिवृत्त शिक्षणाधिकारी, माध्यमिक शिक्षण विभाग, जिल्हा परिषद सांगली,
2. पत्नी जयश्री विष्णू कांबळे सर्व राहणार शिवशक्ती मैदानाचे पाठीमागे, बारबोले प्लॉट शिवाजीनगर, बार्शी जिल्हा सोलापूर
1. किरण आनंद लोहार, वय 50 वर्ष, शिक्षणाधिकारी, प्राथमिक शिक्षण विभाग, जिल्हा परिषद सोलापूर,
2. पत्नी सौ. सुजाता किरण लोहार, वय 44 वर्ष,
3. मुलगा निखिल किरण लोहार, वय 25 वर्ष, सर्व राहणार प्लॉट नं. सी. 2, आकांक्षा शिक्षक कॉलनी, पाचगाव, ता. करवीर, जि. कोल्हापूर
या सर्वांविरुद्ध पुणे लाचलुचपत विभागाने गुन्हे दाखल केले आहेत.