समर्थ भारत वृत्तसेवा:
आंबेगाव तालुक्यातील घोडेगावमध्ये दत्तजयंतीनिमित्त सद्गुरू सेवा मंडळामार्फत ४५ वर्ष यात्रा भरवत असुन आयोजित भव्य बैलगाडा शर्यतीस ३६० बैलगाडा मालक सहभागी झाले होते. २६ व २७ डिसेंबर रोजी स्पर्धा पार पडल्या. प्रेषकांच्या डोळ्यांची प्रारणे फेडण्यासाठी चित्तथरारक बैलगाडा शर्यत पहाण्यासाठी, आणि पहाडी आवाजाने स्पर्धेतील बैल आणि प्रेक्षकांच्या कानांवर धावते समालोचन करणारे समालोचक, हजारो बैलगाडाशौकीन आणि व्यावसायिकांनी यात्रेत शोभा आणली. पहिल्या दिवशी घाटाचा राजा अप्पासाहेब साकोरे फुलगाव ११.१९ सेकंद तर
तर दुसऱ्या दिवशी घाटाचा राजा राजुशेठ जवळेकर वाफगाव यांचा मन्या बैल ११.१८ सेकंदासह ठरला.
यात्रेस शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे महिला आघाडी आंबेगाव तालुकाप्रमुख सुरेखाताई निघोट, प्रा. अनिल निघोट यांसह मान्यवरांनी भेट देऊन शुभेच्छा दिल्या, त्याबद्दल यात्रा कमिटीच्या वतीने त्यांचा सन्मान करण्यात आला.
यात्रेचे संयोजक सद्गुरू सेवा मंडळ घोडेगावचे अध्यक्ष मा. सभापती कैलासबवा काळे, उपाध्यक्ष विनोद कासार, सोमनाथ काळे बाजार समिती संचालक, सुनिल ईंदोरे ग्रा पं सदस्य, माऊली काळे, युवराज काळे,, गोविंद काळे, हरिश्चंद्र घोडेकर, गणेश घोडेकर यांनी तर सेकंद राजेंद्र पानसरे व निशाण कामकाज नवनाथ काळे यांनी पाहिले.