समर्थ भारत वृत्तसेवा:
महिलांना मोठ्या प्रमाणात गृहउद्योग तसेच टेक्निकल कपन्यांमध्ये अद्योगिक क्षेत्रात रोजगार उपलब्ध करून महिलांचे सबलिकारण होण्यासाठी महिलांच्या न्याय हक्क, अन्याय या विरुद्ध लढण्यासाठी आंबेगाव तालुक्यात 'फोरम ऑफ स्मॉल स्केल इंडस्ट्रिज असोसियशनचे अध्यक्ष, मेट्रो रेल्वे चे ब्रँड ऍम्बसिडर छावा संघटनेचे अध्यक्ष अभयदादा भोर तसेच दुर्गाताई भोर यांच्या अध्यक्षतेखाली भोसरी या ठिकाणी नियुक्ती पत्र देऊन आंबेगाव तालुका दुर्गा ब्रिगेड कार्यकारणी जाहीर करण्यात आली.
यावेळी अभय दादा भोर यांनी महिलांना विविध टेक्निकल कंपन्यानमध्ये भेट देऊन महिलांना कसा रोजगार उपलब्ध करून देता येईल याचे मार्गदर्शन केले व आंबेगावची कार्यकारणी जाहीर केली त्यात अध्यक्षपदी गावडेवाडीच्या आदर्श राष्ट्रपती पुरस्कार प्राप्त सरपंच मनीषा ताई संतोष गावडे यांची निवड झाली. तसेच उपाध्यक्ष पदी प्रमिलाताई टेमगिरे, सचिव वैशाली थोरात, खजिनदार पदी राणी शहाणे , सरचिटणीस प्रीती भालेराव, उपसरचिटणीस अश्विनी बागल,संघटक प्रमुख ज्योती येवले, संघटक प्रमुख अनिता भालेराव यांची नियुक्ती झाली. आंबेगाव तालुक्यात जास्तीत जास्त महिलांच्या हाताला काम देऊन रोजगार उपलब्ध करून देण्यासाठी महिलांच्या न्याय हक्कासाठी ही दुर्गा ब्रिगेड संघटना नेहमी प्रयत्न शील राहील असे अध्यक्ष गावडे ताई यांनी यावेळी सांगितले.