समर्थ भारत वृत्तसेवा:
आमच्या काळात बंड नव्हते. आम्ही एकत्र
बसून निर्णय घ्यायचो. यात कुठलीच तक्रार नसायची. यशंवतराव चव्हाण यांची विचारधारा
लक्षात घेऊन निर्णय घेण्यात आला होता. याला लोकांनी पाठिंबा दिला होता, अशा शब्दांत राष्ट्रवादी कॉंग्रेसचे
अध्यक्ष शरद पवार यांनी अजित पवार यांच्या व्यक्तव्याचा समाचार घेतला.
मागील 10 ते 15 वर्षांपासून बारामती आणि तेथील कामात
लक्ष्य घातले नसल्याचे सांगत पवार यांनी सांगितले की, पंचायत समिती, साखर कारखाना, अन्य संस्थांवरील पदावर कोणी जावे, कोणी त्या ठिकाणची जबाबदारी घ्यावी, त्यासंबंधी एकही निर्णय मी घेतलेला
नाही. नवीन पिढीने पुढे येऊन त्या जबाबदाऱ्या घ्याव्यात असे मला वाटते. सगळ्यांना
बरोबर घ्यावे, नावलौकिक वाढवावा, अशी अपेक्षा पवार यांनी व्यक्त केली.