समर्थ भारत वृत्तसेवा:
बेकायदा बिगरपरवाना देशी- विदेशी दारू वाहतूक करणारा रामदास दत्तात्रय चिखले वय ४० वर्ष रा. मोरडेवाडी, मंचर त्याचबरोबर दिपक संभाजी कोद्रे वय ३० वर्ष रा.धायकरवाडा गावठाण मुंढवा यांच्या वर मंचर पोलिस स्टेशन मध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत सविस्तर वृत्त असं कि, दिनांक १५ डिसेंबर २०२३ रोजी रात्री ११.१० वा सुमारास मंचर शहराच्या हद्दीत महात्मा गांधी विदयालया समोर पुंडे नाशिक हायवे रोडला आरोपी रामदास दत्तात्रय चिखले व दिपक संभाजी कोद्रे यांनी त्यांच्या जवळील रिक्षा नंबर एम एच १२ एस. के ०२१५ यामधून बेकायदा बिगरपरवाना देशी विदेशी दारूच्या बाटल्या असलेले बॉक्सएकूण ९३,५००/- किंमती माल जवळ बाळगून बेकायदेशीर वाहतूक करत असताना मिळून आले आहेत.
वाहतुकीसाठी समाविष्ट असलेली १०००००/- किंमतीची रिक्षा देखील जप्त
करण्यात आली आहे. असा एकूण १ लाख ९३ हजार ५०० रुपये किंमतीचा मुद्देमाल पोलिसांनी
जप्त केला असून पुढील तपास पोलिस निरीक्षक बळवंत मांडगे यांच्या मार्गदर्शनाखाली
हिले हे करत आहेत.