समर्थ भारत वृत्तसेवा:
जिल्हा परिषद प्राथमिक शाळा आदर्शगाव भागडी येथे होणार अत्याधुनिक संगणक लॅब ECA Environment Conservation Association Pune च्या सहकार्याने आदर्शगाव भागडी च्या शाळेत सुसज्ज संगणक लॅब होणार असुन यापूर्वी संस्थेने रिसायकल ४ टच स्क्रिन लॅपटॉप दिले अशी माहिती मुख्याध्यापक बाळासाहेब गिलबिले यांनी दिली. शाळेतील विद्यार्थ्यांना संगणकाची ओळखी बरोबर हाताळणी व प्रगत तंत्रज्ञानाची ओळख बालवयापासून व्हावी व संपूर्ण शाळेतील विद्यार्थी संगणक साक्षर व्हावेत त्यासाठी ECA मार्फत लॅपटॉप अत्याधुनिक संगणक लॅब अध्यक्षा विनिता दाते यांच्या माध्यमातून साकार होणार आहे. त्यासाठी गावाने पर्यावरण सवंर्धन व प्लॅस्टिक मुक्त गाव करावे असे अवाहन त्यांनी केले
शाळेमध्ये यशवंतराव कला क्रिडा महोत्सवातील यशस्वी विद्यार्थी यांचा सन्मान व लॅपटॉप मान्यवरांच्या हस्ते सुपुर्द करण्यात आले .याप्रसंगी सरपंच गोपाळशेठ गवारी वैभव उंडे शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष विष्णू उंडे , नितिन आगळे , संदिप आदक रामदास गवारी, गवारी, बबन उंडे, हनुमंत जाधव गणेश भालेराव, दत्ता बराटे, रामचंद्र आगळे, अनिल उंडे, प्रकाश आगळे, रोहिदास गवारी ग्रामस्थ शाळा व्यवस्थापन समिती सदस्य उपस्थित होते . कार्यक्रमाचे नियोजन आशा वाळके सिद्धी रावळ यांनी केले तर स्वाती शिंदे यांनी सुत्रसंचलन व लालन गायकवाड यांनी आभार मानले.