समर्थ भारत वृत्तसेवा: विजय कानसकर
आर्थिक दुर्बल घटकातील विद्यार्थ्यांची आज शिष्यवृत्ती परीक्षा पारगाव केंद्रात सुरु झाली आहे. १३ विदयालयातील विद्यार्थी हे पारगाव केंद्रात परीक्षेसाठी आले असून या १३ विदयालयातील ४४४ विद्यार्थी हे परिक्शेसथिओ बसले आहेत.
राज्य परीक्षा परिषदेने राष्ट्रीय आर्थिक दुर्बल घटकातील विद्यार्थ्यांसाठी शिष्यवृत्ती योजनेचे वेळापत्रक जाहीर केले. वेळापत्रकानुसार २४ डिसेंबर रोजी परीक्षा. २००७-०८ पासून इयत्ता आठवीच्या अखेर आर्थिक दुर्बल घटकातील प्रज्ञावान विद्यार्थ्यांचा शोध घेऊन बुद्धिमान विद्यार्थ्यांना सर्वोत्तम शिक्षण मिळण्याच्या दृष्टीने त्यांना आर्थिक सहाय्य करण्यात येते.
विद्यार्थ्याच्या पालकाला २०२१-२२च्या आर्थिक वर्षाचा उत्पन्नाचा दाखला शाळेच्या मुख्याध्यापकाकडे जमा करावा लागेल. सातवीत किमान ५५ टक्के गुण मिळवून विद्यार्थी उत्तीर्ण झालेला असावा. तर विनाअनुदानित, केंद्रीय विद्यालयात, जवाहर नवोदय विद्यालयात, शासकीय वसतिगृहाच्या सवलतीचा, शैक्षणिक सुविधांचा लाभ घेणारे विद्यार्थी, सैनिकी शाळांमध्ये शिकणारे विद्यार्थी परीक्षेला अपात्र आहेत. लेखी परीक्षेतून विद्यार्थ्यांची गुणांच्या आधारे व राज्याने निश्चित केलेल्या मागासवर्गीयांसाठीच्या आरक्षणानुसार विद्यार्थ्यांची निवड होते. पात्र विद्यार्थ्यांना दर वर्षी पंधरा हजार रुपये शिष्यवृत्ती दिली जाते.
विद्यार्थ्यांना दरवर्षी बँक खात्यात मिळणार पंधरा हजार रुपये
* चार वर्षांसाठी मिळणार शिष्यवृत्ती
* पालकांची उत्पन्न मर्यादा साडेतीन लाख रुपये
* शिष्यवृत्तीसाठी विद्यार्थ्यांची निवड लेखी परीक्षेतून होणार
* परीक्षेसाठी विषय बौद्धिक क्षमता चाचणी ( ९० गुणांचे ९० प्रश्न )
* शालेय क्षमता चाचणी ( ९० गुणांचे ९० प्रश्न )
* मराठी, उर्दू, हिंदी, गुजराती, इंग्रजी, तेलगू व कन्नड अशा सात माध्यमातून देता येते परीक्षा
"राज्याच्या निर्धारित कोट्यानुसार संवर्गनिहाय आरक्षणानुसार, गुणवत्तेच्या आधारे जिल्हानिहाय, संवर्गनिहाय विद्यार्थ्यांची शिष्यवृत्तीसाठी निवड केली जाते. या परीक्षेचा निकाल साधारणतः फेब्रुवारी २०२४ च्या पहिल्या किंवा दुसऱ्या आठवड्यात जाहीर करण्यात येईल."