समर्थ भारत वृत्तसेवा:
11 डिसेंबर रोजी झारखंडचे काँग्रेसचे राज्यसभेचे खासदार धीरज साहू यांचे गाडी व निवासस्थानी 300 कोटी पेक्षा जास्त बेनामी रोकड सापडली. त्याचे विरोधात भारतीय जनता पक्ष महिला मोर्चाच्या वतीने जिल्हा सरचिटणीस स्वप्ना पिंगळे यांच्या नेतृत्वाखाली मंचर शहरांमध्ये काँग्रेसचे राज्यसभेचे खासदार धीरज साहू यांच्या विरोधात निषेध आंदोलन केले.
याप्रसंगी भारतीय जनता पक्षाच्या तालुका सरचिटणीस तालुका सरचिटणीस जागृती महाजन यांनी काँग्रेसच्या भ्रष्टाचारी खासदारावर कारवाई करण्यास सांगितले. भाजपचे तालुका अध्यक्ष संदीप बाणखेले यांनी दोन वेळेस खासदारकीला पराभूत झालेल्या उमेदवाराला तीन वेळा राज्यसभेवर काँग्रेस पक्षाने आर्थिक व्यवहारासाठी पाठवले आहे का असा प्रश्नचिन्ह उपस्थित केला.
याप्रसंगी गली
गली मे शोर है काँग्रेस वाले चोर है, काँग्रेसचा हात पोटावर
लाथ, काँग्रेस हटाव देश बचाव अशा घोषणा यावेळी देण्यात आल्या.
यावेळी आरती चव्हाण पदवीधर आघाडी अध्यक्ष आंबेगाव, सुशील भाऊ कहडणे
सरचिटणीस भाजपा आंबेगाव तालुका, गणेश बाणखेले
उपाध्यक्ष भाजपा आंबेगाव तालुका,योगेश बोऱ्हाडे
अध्यक्ष भाजपा मंचर शहर, छाया थोरात मंचर, शहर अध्यक्ष,पल्लवी थोरात, तुषार बाणखेले,गणेश चव्हाण, बबन शेटे, सुदर्शन खानदेशे, सोमनाथ पिंगळे, महेश पिंगळे, मयूर मोरे, रवी बंगाळ आदी भाजपा
पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते.