समर्थ भारत वृत्तसेवा:
महाराष्ट्र राज्य पत्रकार महासंघाच्या आंबेगाव तालुकाध्यक्षपदी जेष्ठ पत्रकार संजय कोकणे, उपाध्यक्षपदी विजय कानसकर, धनंजय पोखरकर तर सचिवपदी राजेश चासकर यांची निवड करण्यात आली. महाराष्ट्र राज्य पत्रकार महासंघाचे राज्याध्यक्ष डॉ. समीर राजे, मार्गदर्शक संदीप खळे यांच्या उपस्थितीत मंचर (ता. आंबेगाव) येथे झालेल्या बैठकीत सर्वानुमते हा निर्णय घेण्यात आला.
यावेळी कार्याध्यक्षपदी किशोर वाघमारे, कोषाध्यक्षपदी स्वप्नील जाधव, संघटकपदी उत्तमराव टाव्हरे, समन्वयकपदी नितीन थोरात, संपर्क प्रमुखपदी दत्ता नेटके, प्रसिध्दी प्रमुखपदी समीर गोरडे, सह सचिवपदी आनंदराव नेटके आणि सह संपर्कप्रमुखपदी संतोष गावडे यांची देखील सर्वानुमते निवड करण्यात आली.
यावेळी महाराष्ट्र राज्य पत्रकार महासंघाचे माजी तालुकाध्यक्ष मनोज तळेकर, माजी उपाध्यक्ष विलास भोर, अमोल जाधव, अश्विनकुमार लोढा, नंदकुमार पोखरकर आदी पत्रकार बांधव उपस्थित होते.
महाराष्ट्र राज्य पत्रकार महासंघाच्या माध्यमातून प्रतिभासंपन्न, निर्भीड, निष्पक्ष आणि व्यवस्था परिवर्तनाची आस असणाऱ्या पत्रकार बांधवांना संधी मिळत आहे. हे सुदृढ लोकशाहीसाठी अतिशय पोषक आहे. (संदीप खळे, मार्गदर्शक, महाराष्ट्र राज्य पत्रकार महासंघ)
महाराष्ट्र राज्य पत्रकार महासंघ राज्यभरातील पत्रकार बांधवांसाठी सातत्याने आग्रही भूमिका घेत आले आहे. पत्रकार महासंघाने सातत्याने मागणी केलेल्या अनेक मुद्द्यांवर यंदाच्या हिवाळी अधिवेशनात चर्चा घडवून आली हे या पत्रकार महासंघाचे मोठे यश आहे. (डॉ. समीर राजे, राज्याध्यक्ष, महाराष्ट्र राज्य पत्रकार महासंघ)
आंबेगाव तालुक्यातील सर्व पत्रकार बांधवांनी मला महाराष्ट्र राज्य पत्रकार महासंघाच्या तालुकाध्यक्षपदी काम करण्याची संधी दिली. मागील काळात आंबेगाव तालुक्यात पत्रकार बांधवांच्या बाबतीत काही गैरप्रकार झाले, जे अतिशय निंदनीय आहे. यापुढील काळात असे प्रकार झाल्यास कठोर प्रतिकार केला जाईल. (संजय कोकणे, अध्यक्ष, महाराष्ट्र राज्य पत्रकार महासंघ, आंबेगाव तालुका)