समर्थ भारत वृत्तसेवा
मंचर ता. १६ : सहकार मंत्री दिलीपराव वळसे पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली कार्यरत असलेल्या दत्तात्रय नगर, पारगाव (ता. आंबेगाव) येथील भीमाशंकर सहकारी साखर कारखान्याकडून ऊस उत्पादक शेतकऱ्यांच्या बिलातून मोठ्या प्रमाणात पाणीपट्टी कपात केली जात होती. या वाढीव कपातीस अनेक शेतकऱ्यांनी विरोध करूनही सदर कपात सुरूच होती. मात्र मा. चेअरमन आणि विद्यमान संचालक देवदत्त निकम यांनी कारखाना प्रशासनाला आंदोलनाचा इशारा देताच; कारखाना प्रशासन धास्तावले असून कारखान्याच्या वतीने सदर कपात न करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
राज्याच्या पाटबंधारे विभागाकडून पाणीपट्टीच्या दरात भरमसाठ वाढ करण्यात आली असून; ही पाणीपट्टी शेतकऱ्यांच्या उसाच्या बिलामधून कपात करून संबंधित विभागाकडे वर्ग केली जात होती! ही अन्यायकारक दरवाढ रद्द होत नाही तोपर्यंत कारखान्याने उसाच्या बिलातून कपात करू नये अशी मागणी करत शेतकऱ्यांनी मोठ्या प्रमाणात विरोध दर्शविला होता. मात्र शेतकऱ्यांच्या या मागणीचा विचार न करता, कारखाना प्रशासनाने वसुली सुरूच ठेवली होती. मात्र भीमाशंकर सहकारी साखर कारखान्याचे माजी चेअरमन आणि विद्यमान संचालक देवदत्त निकम यांनी पत्राद्वारे आंदोलनाचा इशारा देताच कारखाना प्रशासनाने सहकार मंत्री दिलीपराव वळसे पाटील यांच्या सूचनेप्रमाणे सदर कपात न करण्याचा निर्णय घेत असल्याचे जाहीर केले आहे.
पाणीपट्टीत भरमसाठ वाढ
उसाची पाणीपट्टी प्रती एकर ४५०/- रुपये होती, ती आता दहा पटीने वाढवून ४,५००/- रुपये करण्यात आली आहे. यापूर्वी गहू, बाजरी, चारा पिकांची पाणीपट्टी एकरी ९०/- रुपयांच्या जवळपास होती, ती पाणीपट्टी जवळपास १७ पटींनी वाढून आता १,६५०/- रुपये करण्यात आली आहे.
काम निकमांचे आणि श्रेय सहकारमंत्र्यांना!
वाढीव पाणीपट्टी कारखान्याच्या बिळातून कापण्याच्या भूमिकेला देवदत्त निकम यांनी विरोध दर्शविल्यानंतर कारखान्याने घुमजाव करत पाणीपट्टी कपात न करण्याचा निर्णय घेतला, मात्र कारखान्याच्या वतीने प्रसिद्ध करण्यात आलेल्या निर्णयात पत्रकात सहकार मंत्री दिलीपराव वळसे पाटील यांच्या सूचनेप्रमाणे हा निर्णय घेण्यात आला असल्याचे जाहीर केले आहे. यापूर्वी अनेक शेतकऱ्यांच्या ऊस बिलातून मोठ्या प्रमाणात पाणीपट्टी कापण्यात आली असून, या कपातीलाही सहकार मंत्र्यांचे मार्गदर्शन किंवा सूचना होत्या का? असा प्रश्न शेतकरी वर्गातून विचारला जात आहे.
जोपर्यंत शासन वाढीव पाणीपट्टी दर रद्द करत नाही तोपर्यंत भीमाशंकर सहकारी साखर कारखान्याने शेतकऱ्यांच्या ऊस बिलातून पाणीपट्टी कपात करू नये. भीमाशंकर सहकारी साखर कारखान्याने ज्या शेतकऱ्यांची २५ ते ३० हजार रुपयांपर्यंत पाणी पाणीपट्टी कपात केली आहे; ती त्यांना त्वरित परत करावी अन्यथा शेतकऱ्यांना आंदोलन करावे लागेल. (देवदत्त निकम, मा. चेअरमन, भीमाशंकर सहकारी साखर कारखाना)