मंचर पोलिस स्टेशनचे पोलिस शिपाई आणि सहाय्यक पोलिस निरीक्षक यांनी लाच स्वीकारल्या प्रकरणी गुन्हा दाखल
समर्थ भारत
वृत्तसेवा:
याबाबत सविस्तर माहिती अशी की, तक्रारदार याची अपघातातील गुन्ह्यातील दुचाकी परत देण्यासाठी मदत करतो म्हणून 40 हजार रुपयांची मागणी करण्यात आली होती. याबाबत तक्रारदार यांनी लाच लुचपत प्रतिबंधक विभाग पुणे यांच्याकडे तक्रार केली होती.
सदर तक्रारीच्या अनुषंगाने दि.23 डिसेंबर 2023
रोजी
पडताळणी केली असता तक्रारदार याचे वरील काम करून देण्यासाठी तडजोड अंती 8 हजार रुपये दोन्ही लोकसेवक यांनी लाच
मागणी करून सदर रक्कम संदीप रावते यांनी पंचा समक्ष स्वीकारताना रंगेहाथ पकडण्यात
आले आहे. दोघांवर मंचर पोलीस ठाण्यात भ्रष्टाचार प्रतिबंध अधिनियमाखाली गुन्हा
दाखल करण्यात आला आहे. सदर कारवाई लाच लुचपत प्रतिबंधक विभागाचे पोलीस अधीक्षक
अमोल तांबे, अप्पर
पोलीस अधीक्षक डॉ. शितल जानवे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक विद्युलता
चव्हाण, महिला
पोलीस हवालदार सरिता वेताळ, पोलीस
हवालदार नवनाथ वाळके यांनी केली आहे.