समर्थ भारत वृतसेवा (सुधाकर सैद) :
बेल्हे यथे ील एक प्रथितयश उद्योजक सागर व डॉ. अजित लामखडे यांचे वडील अशोक उर्फ बबन शिवबा लामखडे यांच्या दशक्रिया विधीमध् मंगळवार द ये िनांक २८/११/२०२३ रोजी आध्यात्मिक प्रवचना ऐवजी समाजामध्ये विशेषत: तरुणांनी स्वतःच्या आरोग्यविषयक व हृदयासंबंधी काय काळजी घ्यावी यासंदर्भात नारायणगाव यथे ील हृदयविकार तज्ञ, सर्पतज्ञ व विषबाधा तज्ञ डॉ. सदानंद राऊत यांचे व्याख्यान ठेवून एक वेगळा व स्तुत्य उपक्रम राबविण्याचा पायंडा पाडण्याचा प्रयत्न केला. यावेळी बोलताना डॉ. राऊत यांनी हृदयविकार हा आजार होण्याअगोदर जाणवणारी लक्षणे व त्यानंतर घ्यावयाची काळजी यासंदर्भात विवेचन केले.
सध्याची
बदलती जीवनशैली, नियमित व्यायामाचा
अभाव, यांत्रिकीकरणामुळे शारीरिक
कष्टाचा अभाव, आयटी
क्षेत्रातील तरुणांना
१२/१४ तास बसून करावे लागणारे
काम, त्यामुळे
येणारी स्लता, आहाराव
थू िषयी औदासीन्य, परिपर्ण ू आहार न मिळणे, पर्यायाने येणारा मानसिक ताणतणाव, तरुणांमध वाढलेले गुटखा व दारू या
व्यसनाचे प्रमाण, तसेच
घरापासून दूर असलेल्या ग्रामीण
महाविद्यालयात शिक्षण घेत असलेल्या विद्यार्थी व
त्यांच्या गृपमध् सहजपणे उपलब्ध होणारी
नशेची साधने व त्या विळख्यात गुरफटलेला विद्यार्थी
व त्यांच्याकडे होणारे पालकांचे
अक्षम्य दुर्लक्ष,
तसेच तंबाखू मधील निकोटीन व गुटख्यामुळे रक्तवाहिन्या आकुंचन
पावतात व
हृदयविकाराचा धोका बळावतो, यासाठी नियमित
आरोग्य तपासणी व औषधोपचार
यामुळे निरोगी आयुष्य शक्य आहे.
उत्तम शाकाहार हा निरोगी राहण्याचा उत्तम उपाय
असून त्याचबरोबर दररोज ४५ मिनिटे
चालणे, तसेच
पोहणे, योगा, सुरेल संगीत किंवा भजन
ऐकणे, एकमेकांच्या
दुःखात सहभागी होणे, सामाजिक कार्यातील सहभाग वाढणे आणि
ताणतणाव टाळला तर निश्चितपणे
आपण हृदयविकारापासून दूर राहाल अन्यथा मृत् हे अं यू तिम सत्य असून ते
टाळणे कोणाच्याही
हातात नाही व्याख्यानाचा समारोप
करताना डॉक्टर राऊत यांनी असे सांगितले की निसर्गाबरोबर
जुळलेल्या जीवनशैलीचा वापर
करून आपण व्यसनांपासून दूर राहाल तरच निरोगी राहाल आणि असे केले तरच
माझ्या या व्याख्यानाचा
उपयोग झाला असे मी समजेल.