Skip to main content

Posts

Showing posts from December, 2023

घोडेगावच्या घाटात बैलगाडा शौकिनांची तोबा गर्दी

समर्थ भारत वृत्तसेवा: आंबेगाव तालुक्यातील घोडेगावमध्ये दत्तजयंतीनिमित्त सद्गुरू सेवा मंडळामार्फत ४५  वर्ष यात्रा भरवत असुन आयोजित भव्य बैलगाडा शर्यतीस ३६० बैलगाडा मालक सहभागी झाले होते. २६ व २७ डिसेंबर रोजी स्पर्धा पार पडल्या. प्रेषकांच्या डोळ्यांची प्रारणे फेडण्यासाठी चित्तथरारक बैलगाडा शर्यत पहाण्यासाठी, आणि पहाडी आवाजाने स्पर्धेतील बैल आणि प्रेक्षकांच्या कानांवर धावते समालोचन करणारे समालोचक, हजारो बैलगाडाशौकीन आणि व्यावसायिकांनी यात्रेत शोभा आणली.  पहिल्या दिवशी घाटाचा राजा अप्पासाहेब साकोरे फुलगाव ११.१९ सेकंद तर तर दुसऱ्या दिवशी घाटाचा राजा राजुशेठ जवळेकर वाफगाव यांचा मन्या बैल ११.१८ सेकंदासह ठरला. यात्रेस  शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे महिला आघाडी आंबेगाव तालुकाप्रमुख सुरेखाताई निघोट, प्रा. अनिल निघोट  यांसह मान्यवरांनी भेट देऊन शुभेच्छा दिल्या, त्याबद्दल यात्रा कमिटीच्या वतीने त्यांचा सन्मान करण्यात आला. यात्रेचे संयोजक सद्गुरू सेवा मंडळ घोडेगावचे अध्यक्ष मा. सभापती कैलासबवा काळे, उपाध्यक्ष विनोद कासार, सोमनाथ काळे बाजार समिती संचालक, सुनिल ईंदोरे ग्रा पं सदस्य...

अजित पवार यांच्या 'चॅलेंज' वरून तर्कवितर्क

समर्थ भारत वृत्तसेवा: उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आगामी लोकसभा निवडणुकीत डॉ. अमोल कोल्हे यांचा पराभव करणार म्हणजे करणार, असे 'चॅलेंज' दिल्याने चर्चांना उधाण आले आहे. अशाच प्रकारचे 'चॅलेंज' 2019 च्या पुरंदर विधानसभा निवडणुकीत विजय शिवतारे यांना दिले होते. आणि त्यानंतर शिवतारे यांचा पराभव झाला. तर, काँग्रेसचे संजय जगताप विजयी झाले होते. त्यामुळे अजित पवार यांची भविष्यवाणी खरी ठरत असल्याचे बोलले जात आहे. सध्या राज्यात शिवसेना (ठाकरे गट), भाजप आणि राष्ट्रवादी (अजित पवार गट) यांची सत्ता आहे. पवार यांच्या वाट्याला बारामती, शिरूर आणि मावळ लोकसभा मतदारसंघ येण्याची चिन्हे आहेत. तशी तयारीही सुरू झाली आहे. बारामती लोकसभा मतदारसंघात खासदार सुप्रिया सुळे यांना आव्हान देण्यात आले आहे. अजित पवार यांच्या पत्नी सुनेत्रा पवार किंवा पार्थ पवार यांना उमेदवारी मिळण्याची चिन्हे आहेत. बारामती स्वतः अजित पवार निवडून आले आहेत. इंदापूर मतदारसंघात दत्तात्रय भरणे, पुरंदर मतदारसंघात संजय जगताप, भोर - वेल्हा- मुळशी मतदारसंघात संग्राम थोपटे, खडकवासला मतदारसंघात भाजपचे भीमराव तापकीर आमदार म्हणून नि...

मुळात ते बंड नव्हतेच, एकत्र बसून घेतलेला निर्णय होता

 समर्थ भारत वृत्तसेवा: आमच्या काळात बंड नव्हते. आम्ही एकत्र बसून निर्णय घ्यायचो. यात कुठलीच तक्रार नसायची. यशंवतराव चव्हाण यांची विचारधारा लक्षात घेऊन निर्णय घेण्यात आला होता. याला लोकांनी पाठिंबा दिला होता , अशा शब्दांत राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी अजित पवार यांच्या व्यक्तव्याचा समाचार घेतला.   पुण्यात राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी माध्यमांनी संवाद साधला. अजित पवार आणि तुम्ही केलेल्या बंडात काय फरक आहे , असे विचारले असता पवार म्हणाले की , आज कोणी काय केले , त्यांच्या तक्रारी करायची नाही. फक्त पक्ष महत्त्वाचा आहे , त्याचा संस्थापक कोण आहे , हे लोकांना माहित आहे , या पक्षाला कोणी मोठे केले आहे , या सगळ्या गोष्टी सर्वांच्या समोर आहे , त्यामुळे त्याच्यावर अधिक काही भाष्य करण्याची गरज नाही. मागील 10 ते 15 वर्षांपासून बारामती आणि तेथील कामात लक्ष्य घातले नसल्याचे सांगत पवार यांनी सांगितले की , पंचायत समिती , साखर कारखाना , अन्य संस्थांवरील पदावर कोणी जावे , कोणी त्या ठिकाणची जबाबदारी घ्यावी , त्यासंबंधी एकही निर्णय मी घेतलेला नाही. नवीन पिढीने...

गॅरेज समोर उभ्या असलेल्या मालवाहतूक ट्रकला लागली आग

समर्थ भारत वृतसेवा  : आळेफाटा येथे गॅरेज समोर कामासाठी उभ्या असेल्या मालवाहतूक ट्रकला रात्रीच्या सुमारास अचानक शॉर्टसर्कीट होऊन आग लागली. हि घटना शनिवारी मध्यरात्रीच्या सुमारास घडली. याबाबत मिळालेली अधिकची माहिती अशी की , आळेफाटा येथे एका गॅरेजसमोर एक सहा चाकी मालवाहतूक ट्रक कामासाठी उभा होता. शनिवारी रात्री एक वाजण्याच्या सुमारास गाडीने अचानक पेट घेतला. घटनेची माहिती समजतात गॅरेज व्यावसायिक यांनी तात्काळ धाव घेत पाणी टाकून आग विझवण्याचा प्रयत्न केला. मात्र गाडीचा पुढचा भाग पूर्णपणे जळाला. दरम्यान चारच दिवसांपुर्वी आळेफाटा बायपासला धावत्या कंटेनरचा टायर फुटुन लागलेल्या आगीत कंटेनर मधील लाखो रुपयांचे स्पेअर पार्ट जळाले होते. तर मागील महिन्यात बारा चाकी गाडीने अचानक पेट घेतल्याने जळुन खाक झाली होती. आग लागण्याच्या घटना ताज्या असताना शनिवारी रात्री पुन्हा वाहन पेटण्याची घटना घडलेली. आळेफाटा परिसरात गेल्या वर्षभरात सात ते आठ वाहने जळीताच्या घटना घडल्या असुन या ठिकाणी मोठी बाजार पेठ आहे. आळेफाटा परिसरात स्वतंत्र अग्निशमन वाहनाची व्यवस्था करावी अशी मागणी येथील व्यावसायिक , नागरिक क...

मंचर पोलिस स्टेशनचे पोलिस शिपाई आणि सहाय्यक पोलिस निरीक्षक यांनी लाच स्वीकारल्या प्रकरणी गुन्हा दाखल

समर्थ भारत वृत्तसेवा: गुन्हातील पोलीस ठाण्यात जमा असलेल दुचाकी परत देण्यासाठी मदत करतो म्हणून 40 हजार रुपयांची मागणी करत त्यातील 8 हजार रुपये स्वीकारताना मंचर पोलीस ठाण्यातील पोलीस शिपाई संदीप भीमा रावते यांना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने रंगेहाथ पकडले असून पोलीस शिपाई भीमा रावते व सहायक पोलीस निरीक्षक संतोष सुरेश साळुंखे या दोघांवर मंचर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत सविस्तर माहिती अशी की, तक्रारदार याची अपघातातील गुन्ह्यातील दुचाकी परत देण्यासाठी मदत करतो म्हणून 40 हजार रुपयांची मागणी करण्यात आली होती. याबाबत तक्रारदार यांनी लाच लुचपत प्रतिबंधक विभाग पुणे यांच्याकडे तक्रार केली होती. सदर तक्रारीच्या अनुषंगाने दि.23 डिसेंबर 2023 रोजी पडताळणी केली असता तक्रारदार याचे वरील काम करून देण्यासाठी तडजोड अंती 8 हजार रुपये दोन्ही लोकसेवक यांनी लाच मागणी करून सदर रक्कम संदीप रावते यांनी पंचा समक्ष स्वीकारताना रंगेहाथ पकडण्यात आले आहे. दोघांवर मंचर पोलीस ठाण्यात भ्रष्टाचार प्रतिबंध अधिनियमाखाली गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सदर कारवाई लाच लुचपत प्रतिबंधक विभागाचे पोलीस अधीक...

आर्थिक दुर्बल घटकातील विद्यार्थ्यांची आज शिष्यवृत्ती परीक्षा

समर्थ भारत वृत्तसेवा: विजय कानसकर  आर्थिक दुर्बल घटकातील विद्यार्थ्यांची आज शिष्यवृत्ती परीक्षा पारगाव केंद्रात सुरु झाली आहे. १३ विदयालयातील विद्यार्थी हे पारगाव केंद्रात परीक्षेसाठी आले असून या १३ विदयालयातील ४४४ विद्यार्थी हे परिक्शेसथिओ बसले आहेत. राज्य परीक्षा परिषदेने राष्ट्रीय आर्थिक दुर्बल घटकातील विद्यार्थ्यांसाठी शिष्यवृत्ती योजनेचे वेळापत्रक जाहीर केले. वेळापत्रकानुसार २४ डिसेंबर रोजी परीक्षा. २००७-०८ पासून इयत्ता आठवीच्या अखेर आर्थिक दुर्बल घटकातील प्रज्ञावान विद्यार्थ्यांचा शोध घेऊन बुद्धिमान विद्यार्थ्यांना सर्वोत्तम शिक्षण मिळण्याच्या दृष्टीने त्यांना आर्थिक सहाय्य करण्यात येते. विद्यार्थ्याच्या पालकाला २०२१-२२च्या आर्थिक वर्षाचा उत्पन्नाचा दाखला शाळेच्या मुख्याध्यापकाकडे जमा करावा लागेल. सातवीत किमान ५५ टक्के गुण मिळवून विद्यार्थी उत्तीर्ण झालेला असावा. तर विनाअनुदानित, केंद्रीय विद्यालयात, जवाहर नवोदय विद्यालयात, शासकीय वसतिगृहाच्या सवलतीचा, शैक्षणिक सुविधांचा लाभ घेणारे विद्यार्थी, सैनिकी शाळांमध्ये शिकणारे विद्यार्थी परीक्षेला अपात्र आहेत. लेखी परीक्षेतून विद्यार...

चपलेचा त्याग, कटिंग न करण्याचा निर्णय; दोन भावांचा मराठा मोर्चाला अनोखा पाठिंबा

समर्थ भारत वृत्तसेवा: मराठा समाजाला सरसकट आरक्षण मिळावे यासाठी गेल्या तीन ते चार महिन्यांपासून मनोज जरांगे पाटील यांचे मराठा समाजाला घेऊन आंदोलन सुरू केले आहे. या आंदोलनाला राज्यभरातून मोठा पाठिंबा मिळत असून ग्रामीण भागातील मराठा तरुण मोठ्या संख्येने यात सहभागी होत आंदोलनास पाठिंबा दर्शवत आहे. यात आंबेगाव तालुक्यातील धामणी गावच्या दोन सख्ख्या मावस भावांनी आनोखे आंदोलन करून मनोज जरांगे पाटील यांना पाठींबा दिला आहे. आंबेगाव तालुक्यातील धामणी गावचे असणारे दोन सख्खे मावस भाऊ रंगनाथ जाधव आणि शांताराम जाधव यांनी मराठ्यांना आरक्षण मिळावे यासाठी अनोखे आंदोलन करून पाठींबा दिला आहे. त्यातील रंगनाथ जाधव हे गेल्या तीन महिन्यांपासून चप्पल न घालता अनवाणी फिरून आंदोलनाला पाठींबा देत आहेत. तर शांताराम जाधव यांनी गेल्या चार महिन्यांपासून कटिंग आणि दाढी न करण्याचा पण केला असून जोपर्यंत मराठ्यांना आरक्षण मिळत नाही , तोपर्यंत हे आम्ही करणार असल्याचे त्यांच्याकडून सांगण्यात आले आहे. या अनोख्या आंदोलनाची आता चर्चा सगळीकडे होऊ लागली आहे. मराठा आंदोलनाला पाठींबा देण्यासाठी सप्टेंबर महिन्यात धामणी येथे स...

महाराष्ट्र राज्य पत्रकार महासंघाची आंबेगाव तालुका कार्यकारिणी जाहीर

समर्थ भारत वृत्तसेवा: महाराष्ट्र राज्य पत्रकार महासंघाच्या आंबेगाव तालुकाध्यक्षपदी जेष्ठ पत्रकार संजय कोकणे, उपाध्यक्षपदी विजय कानसकर, धनंजय पोखरकर तर सचिवपदी राजेश चासकर यांची निवड करण्यात आली. महाराष्ट्र राज्य पत्रकार महासंघाचे राज्याध्यक्ष डॉ. समीर राजे, मार्गदर्शक संदीप खळे यांच्या उपस्थितीत मंचर (ता. आंबेगाव) येथे झालेल्या बैठकीत सर्वानुमते हा निर्णय घेण्यात आला.  यावेळी कार्याध्यक्षपदी किशोर वाघमारे, कोषाध्यक्षपदी स्वप्नील जाधव, संघटकपदी उत्तमराव टाव्हरे, समन्वयकपदी नितीन थोरात, संपर्क प्रमुखपदी दत्ता नेटके, प्रसिध्दी प्रमुखपदी समीर गोरडे, सह सचिवपदी आनंदराव नेटके आणि सह संपर्कप्रमुखपदी संतोष गावडे यांची देखील सर्वानुमते निवड करण्यात आली.  यावेळी महाराष्ट्र राज्य पत्रकार महासंघाचे माजी तालुकाध्यक्ष मनोज तळेकर, माजी उपाध्यक्ष विलास भोर, अमोल जाधव, अश्विनकुमार लोढा, नंदकुमार पोखरकर आदी पत्रकार बांधव उपस्थित होते. महाराष्ट्र राज्य पत्रकार महासंघाच्या माध्यमातून प्रतिभासंपन्न, निर्भीड, निष्पक्ष आणि व्यवस्था परिवर्तनाची आस असणाऱ्या पत्रकार बांधवांना संधी मिळत आहे. हे सुदृढ लो...

भागडीच्या जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत होणार अत्याधुनिक संगणक लॅब

समर्थ भारत वृत्तसेवा: जिल्हा परिषद प्राथमिक शाळा आदर्शगाव भागडी येथे होणार अत्याधुनिक संगणक लॅब ECA Environment Conservation Association  Pune च्या सहकार्याने आदर्शगाव भागडी च्या शाळेत सुसज्ज संगणक लॅब होणार असुन यापूर्वी संस्थेने रिसायकल ४ टच स्क्रिन लॅपटॉप दिले अशी माहिती मुख्याध्यापक बाळासाहेब गिलबिले यांनी दिली. शाळेतील विद्यार्थ्यांना संगणकाची ओळखी बरोबर हाताळणी व प्रगत तंत्रज्ञानाची ओळख बालवयापासून  व्हावी व संपूर्ण शाळेतील विद्यार्थी संगणक साक्षर व्हावेत त्यासाठी ECA मार्फत लॅपटॉप अत्याधुनिक संगणक लॅब अध्यक्षा विनिता दाते यांच्या माध्यमातून  साकार होणार  आहे. त्यासाठी गावाने पर्यावरण सवंर्धन व प्लॅस्टिक मुक्त गाव करावे असे अवाहन त्यांनी केले शाळेमध्ये यशवंतराव कला क्रिडा महोत्सवातील यशस्वी विद्यार्थी यांचा सन्मान व लॅपटॉप  मान्यवरांच्या हस्ते सुपुर्द करण्यात आले .याप्रसंगी सरपंच गोपाळशेठ गवारी वैभव उंडे शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष विष्णू उंडे , नितिन आगळे , संदिप आदक  रामदास गवारी, गवारी, बबन उंडे, हनुमंत जाधव गणेश भालेराव, दत्ता बराटे, रामचंद्र आग...

शेतकऱ्याच्या गायीचा चक्क विमानाने प्रवास

समर्थ भारत वृत्तसेवा शिक्रापूर (शेरखान शेख) ता. १६ : गेली काही दिवसांपासून बैलगाडा शर्यती सुरु झाल्यानंतर बैलांना लाखो रुपयांची किंमत मिळत असल्याचे सर्वत्र पहावयास मिळत असताना आता पुणे जिल्ह्यातील एका शेतकऱ्याने चक्क गुजरात मधून अडीच लाख रुपयांना गाय खरेदी करुन विमानाने आणली असल्याने या गायची पुणे जिल्ह्यात चर्चा रंगू लागली आहे.                 पिंपळे खालसा (ता. शिरुर) येथील रवींद्र शांताराम धुमाळ या शेतकऱ्याला गोरक्षणाची आवड असल्याने त्यांच्याकडे यापूर्वी अनेक गायी आहेत, त्यांना गोरक्षणाची आवड असल्याने अनेक ठिकाणच्या शेतकरी तसेच गोशाळेंशी त्यांचा चागला संपर्क आहे. नुकतेच गुजरात मधील एका इसमाकडे सुवर्ण गिर जातीची गाय असून सदर गाय एका वेळी पंधरा लिटर दुध देत असून हि गाय विक्रीसाठी असल्याची माहिती रवींद्र धुमाळ यांना मित्राकडून समजली.  यावेळी मित्राने धुमाळ यांना गायीचे फोटो देखील पाठवले. फोटो पाहता क्षणीच धुमाळ यांना गाय आवडल्याने त्यांनी थेट गुजरात गाठले. गाय खरेदी करण्यासाठी त्यांनी गायीसाठी थेट अडीच लाख रुपये देऊ करत गाय विमानाने लोहगा...

अतिक्रमणावर कारवाई करा अन्यथा आंदोलन : काळे

समर्थ भारत वृत्तसेवा घोडेगाव ता. १६ : आंबेगाव तालुक्यातील घोडेगाव येथील मारुती मंदिरा शेजारी असलेल्या इमारत अतिक्रमण अनेक दिवसांपासून चर्चेत आहे. याबाबत घोडेगाव ग्रामपंचायतचे विद्यमान ग्रामपंचायत सदस्य मनोज काळे यांनी आपली भूमिका मांडली आहे. १३ डिसेंबर २०२३ रोजी घोडेगाव ग्रामपंचायत मारुती मंदिराशेजारील मिळकत क्र १७३ आणि १७५ अ या जागेत अतिक्रमण झालेल्या इमारतीवर हातोडा पडणार असल्याची चर्चा होती. असे पत्रही समोर आले होते.  यानंतर मिळकत क्र. १७३ व १७५ अ या जागेवर झालेल्या आतिक्रमणावरकारवाई करण्यासंदर्भात घोडेगाव ग्रामपंचायतीचा काय निर्णय झाला याची माहिती अद्याप पर्यंत समोर आली नसून घोडेगाव व पंचक्रोशीत या इमारती संदर्भात अनेक उलट सुलट चर्चाना उधाण आले आहे. या अतिक्रमण झालेल्या इमारतीवर ग्रामपंचायतीने कारवाई केली नाही तर आपण न्यायालयात जाणार असल्याचे विद्यमान ग्रामपंचायत सदस्य मनोज काळे, ज्येष्ठ पत्रकार विलास काळे यांनी म्हटले आहे. घोडेगाव ग्रामपंचायत मिळकत नंबर १७३ व १७५ अ या जागेत अतिक्रमण झाले आहे. या अतिक्रमणावर प्रशासनाने कारवाई न केल्यास घोडेगाव ग्रामपंचायत हद्दीत चौकात ज्या ठिका...

देवदत्त निकम यांच्या धसक्याने भीमाशंकर कारखान्याचे घुमजाव?

समर्थ भारत वृत्तसेवा मंचर ता. १६ : सहकार मंत्री दिलीपराव वळसे पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली कार्यरत असलेल्या दत्तात्रय नगर, पारगाव (ता. आंबेगाव) येथील भीमाशंकर सहकारी साखर कारखान्याकडून ऊस उत्पादक शेतकऱ्यांच्या बिलातून मोठ्या प्रमाणात पाणीपट्टी कपात केली जात होती. या वाढीव कपातीस अनेक शेतकऱ्यांनी विरोध करूनही सदर कपात सुरूच होती. मात्र मा. चेअरमन आणि विद्यमान संचालक देवदत्त निकम यांनी कारखाना प्रशासनाला आंदोलनाचा इशारा देताच; कारखाना प्रशासन धास्तावले असून कारखान्याच्या वतीने सदर कपात न करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. राज्याच्या पाटबंधारे विभागाकडून पाणीपट्टीच्या दरात भरमसाठ वाढ करण्यात आली असून; ही पाणीपट्टी शेतकऱ्यांच्या उसाच्या बिलामधून कपात करून संबंधित विभागाकडे वर्ग केली जात होती! ही अन्यायकारक दरवाढ रद्द होत नाही तोपर्यंत कारखान्याने उसाच्या बिलातून कपात करू नये अशी मागणी करत शेतकऱ्यांनी मोठ्या प्रमाणात विरोध दर्शविला होता. मात्र शेतकऱ्यांच्या या मागणीचा विचार न करता, कारखाना प्रशासनाने वसुली सुरूच ठेवली होती. मात्र भीमाशंकर सहकारी साखर कारखान्याचे माजी चेअरमन आणि विद्यमान संचा...

१ लाख ९३ हजार ५०० रुपये किंमतीचा मुद्देमाल मंचर पोलिसांनी केला जप्त

 समर्थ भारत वृत्तसेवा: बेकायदा बिगरपरवाना देशी- विदेशी दारू वाहतूक करणारा रामदास दत्तात्रय चिखले वय ४० वर्ष रा. मोरडेवाडी, मंचर त्याचबरोबर दिपक संभाजी कोद्रे वय ३० वर्ष रा.धायकरवाडा गावठाण मुंढवा यांच्या वर मंचर पोलिस स्टेशन मध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.   याबाबत सविस्तर वृत्त असं कि, दिनांक १५ डिसेंबर २०२३ रोजी रात्री ११.१० वा सुमारास मंचर शहराच्या हद्दीत महात्मा गांधी विदयालया समोर पुंडे नाशिक हायवे रोडला आरोपी रामदास दत्तात्रय चिखले व दिपक संभाजी कोद्रे यांनी त्यांच्या जवळील रिक्षा नंबर एम एच १२ एस. के ०२१५ यामधून बेकायदा बिगरपरवाना देशी विदेशी दारूच्या बाटल्या असलेले बॉक्सएकूण ९३,५००/- किंमती माल जवळ बाळगून बेकायदेशीर वाहतूक करत असताना मिळून आले आहेत. वाहतुकीसाठी समाविष्ट असलेली १०००००/- किंमतीची रिक्षा देखील जप्त करण्यात आली आहे. असा एकूण १ लाख ९३ हजार ५०० रुपये किंमतीचा मुद्देमाल पोलिसांनी जप्त केला असून पुढील तपास पोलिस निरीक्षक बळवंत मांडगे यांच्या मार्गदर्शनाखाली हिले हे करत आहेत.    

महिला तलाठ्यासह सहाय्यकाला लाच घेताना रंगेहाथ पकडले

समर्थ भारत वृत्तसेवा: शेंडी गावातील शेत जमिनीची खरेदीची नोंद करण्यासाठी व इतर तीन गटातील वडिलोपार्जित मिळकतीची हक्क सोड नोंद करण्यासाठी नगर तालुक्यातील शेंडी येथील तलाठी निकीता जितेंद्र शिरसाठ पदावर कार्यरत असलेल्या महिला तलाठ्याला तब्बल 50 हजाराची लाच स्वीकारताना लाच लुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने रंगेहात पकडले.  महसूल मंत्री राधाकृष्ण विखे यांच्या जिल्ह्यातच हा प्रकार घडल्यामुळे एकच खळबळ उडाली आहे. आरोपींमध्ये निकिता जितेंद्र शिरसाठ ( 46 वर्ष, पद- तलाठी सजा शेंडी,(वर्ग-3), ता.नगर,जि.नगर), संकेत रणजीत ससाणे ( 26 वर्ष, तलाठी शिरसाठ यांचे खाजगी मदतनीस, रा. निर्मल नगर, तपोवन रोड, नगर) यांचा समावेश आहे. गजराज नगर येथे पैसे घेत असताना पथकाने तलाठ्याला रंगेहात पकडले असून पुढील कारवाईसाठी एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तक्रारदार यांचे मौजे शेंडी गावातील शेत जमिनीची खरेदीची नोंद करण्यासाठी व इतर तीन गटातील वडिलोपार्जित मिळकतीची हक्क सोड नोंद करण्यासाठी तलाठी शिरसाठ यांनी तक्रारदाराकडे 50,000 रुपये लाचेची मागणी केली. याबाबतची तक्रार लाचलुचपत प्रतिबंधक विभाग नगर यांच...

रूपाली चाकणकरांविरोधात गुन्हा दाखल करा: संभाजी ब्रिगेड

समर्थ भारत वृत्तसेवा: राज्य महिला आयोग अध्यक्षा रूपाली चाकणकरांनी बळीराजांचा अवमान करून धार्मिक भावना दुखविल्याबद्दल त्यांचेवर गुन्हा दाखल करण्याची मागणी संभाजी ब्रिगेडने केली आहे. आज संपूर्ण महाराष्ट्रात निदर्शने करून प्रत्येक जिल्हाधिकाऱ्यांना निवेदने देऊन चाकणकरांविरूद्ध कारवाई करून पदमुक्त करण्याच्या मागणीचा भाग म्हणून पुण्यातही निदर्शने करण्यात आली. रूपाली चाकणकरांनी १४ नोव्हेंबर रोजी त्यांच्या स्वतःच्या अधिकृत फेसबुकवरून बहूजनांचा राजा बळीराजांच्या मस्तकावर वामनाने पाय दिल्याचा काल्पनिक फोटो पोस्ट केला होता. मुळात राज्यातला शेतकरी वर्ग महासम्राट बळीराजाला आपली अस्मीता मानतो. दिवाळी बलीप्रतिपदेच्या दिवशी शेतात बळीपुजन करतो. इतिहासात बळीराजाला वामन या आक्रमकाने कपटाने ठार मारले. हा प्रसंग महात्मा ज्योतिबा फुल्यांनी आपल्या गुलामगीरी या ग्रंथात सिद्ध केला. या पोस्टबाबत काही प्रश्न उपस्थित झाल्यानंतर पोलीस प्रशासनावर दबाव टाकून प्रश्न विचारणारांवरच कारवाई करण्याचा प्रकार घडला आहे. संवैधानिक पदावर बसल्या असतांना चाकणकर यांनी महापुरूष बळीराजांचा वारसा नाकारत वामनाचे उदात्तीकरण केले. त्य...

खासदार धीरज साहू यांचे विरोधात मंचरमध्ये महिला मोर्चाचे आंदोलन

 समर्थ भारत वृत्तसेवा: 11 डिसेंबर रोजी झारखंडचे काँग्रेसचे राज्यसभेचे खासदार धीरज साहू यांचे गाडी व निवासस्थानी 300   कोटी पेक्षा जास्त बेनामी रोकड सापडली. त्याचे विरोधात भारतीय जनता पक्ष महिला मोर्चाच्या वतीने जिल्हा सरचिटणीस स्वप्ना पिंगळे यांच्या नेतृत्वाखाली मंचर शहरांमध्ये काँग्रेसचे राज्यसभेचे खासदार धीरज साहू यांच्या विरोधात निषेध आंदोलन केले.  याप्रसंगी भारतीय जनता पक्षाच्या तालुका सरचिटणीस तालुका सरचिटणीस जागृती महाजन यांनी काँग्रेसच्या भ्रष्टाचारी खासदारावर कारवाई करण्यास सांगितले. भाजपचे तालुका अध्यक्ष संदीप बाणखेले यांनी दोन वेळेस खासदारकीला पराभूत झालेल्या उमेदवाराला तीन वेळा राज्यसभेवर काँग्रेस पक्षाने आर्थिक व्यवहारासाठी पाठवले आहे का असा प्रश्नचिन्ह उपस्थित केला.  याप्रसंगी गली गली मे शोर है काँग्रेस वाले चोर है , काँग्रेसचा हात पोटावर लाथ , काँग्रेस हटाव देश बचाव अशा घोषणा यावेळी देण्यात आल्या. यावेळी  आरती चव्हाण पदवीधर आघाडी अध्यक्ष आंबेगाव , सुशील भाऊ कहडणे सरचिटणीस भाजपा आंबेगाव तालुका , गणेश बाणखेले उपाध्यक्ष भाजपा आंबेगाव तालुका , योगेश ब...

सर्पदंश झालेल्या व्यक्तींना मिळणार आर्थिक मदत

समर्थ भारत वृत्तसेवा: सर्पदंश झालेल्या व्यक्तींना आर्थिक मदत देण्याच्या खासदार डॉ. अमोल कोल्हे यांच्या मागणीची तातडीने दखल घेऊन केंद्रीय वन विभागाचे महासंचालक चंद्र प्रकाश गोयल यांनी सर्पदंशावरील उपाययोजनांसाठी मार्गदर्शक तत्वे तयार करण्याचे, तसेच सर्पदंश झालेल्या व्यक्तींना आर्थिक मदत देण्याचे निर्देश राज्याच्या प्रधान मुख्य वनसंरक्षकांना दिले आहेत. जुन्नर तालुक्यातील घोणसच्या सर्पदंशाचे वाढते प्रमाण लक्षात घेऊन खासदार डॉ. कोल्हे यांनी बुधवारी (दि. 6) केंद्रीय वनमंत्री भुपेंद्र यादव आणि केंद्रीय वनविभागाचे महासंचालक चंद्र प्रकाश गोयल याची भेट घेतली होती. या भेटीत त्यांनी कर्नाटक, ओरिसा, पंजाब, पश्‍चिम बंगाल, केरळ राज्यात सर्पदंशामुळे मृत्यू वा कायमचे अपंगत्व आलेल्या व्यक्तीच्या कुटुंबियांना आर्थिक मदत दिली जाते याकडे लक्ष वेधून महाराष्ट्रातही याच धर्तीवर आर्थिक मदत देण्याचे व उपाययोजना करण्याची मागणी केली होती. खासदार डॉ. कोल्हे यांच्या मागणीतील गांभीर्य ओळखून केंद्रीय वन विभागाचे महासंचालक चंद्र प्रकाश गोयल यांनी तातडीने लक्ष घालून महाराष्ट्र राज्याचे प्रधान मुख्य वनसंरक्षक एस. जी. ट...

श्री तपनेश्वर पायी दिंडीचे मंचर पोलिसांकडून स्वागत

समर्थ भारत वृत्तसेवा: मंचर   कार्तिकी एकादशीच्या निमित्ताने आळंदी येथे ज्ञानेश्वर महाराज संजीवन समाधी उत्सवा करिता निघालेल्या श्री तपणेश्वर पायी दिंडीचे   मंचर पोलीस ठाण्याच्या वतीने  पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक बलवंत मांडगे यांनी स्वागत केले. श्री तपनेश्वर पायी दिंडीचे हे रौप्यमहोत्सवी वर्ष असून; मंचर पोलीस ठाण्यातील सर्व कर्मचाऱ्यांनी वारक-यांचे स्वागत करून पालखीला हार घालुन दर्शन घेतले. या दिंडीत तब्बल २५० वारकरी होते. या वेळी दिंडी प्रमुख शशिकांत कडधेकर तसेच विणेकरी यांचा शाल व श्रीफळ देवुन सत्कार करण्यात आला. दिंडीत सहभागी झालेल्या वारकऱ्यांच्या स्वागतासाठी मंचर पोलीस ठाण्यासमोर आकर्षक रांगोळी काढण्यात आली होती. ही दिंडी मंचर पोलीस ठाण्यात तब्बल एक तास थांबली, यावेळी दरम्यान सर्व वारकऱ्यांना मंचर पोलीस ठाण्यात अल्पोपहारची व्यवस्था करण्यात आली होती.   पिढ्यानपिढ्या चालत आलेल्या कार्तिकी एकादशी पायी दिंडीची परंपरा जोपासणारे वारकऱ्यांसोबत पोलीस बांधवांनी तुळशी वृंदावन डोक्यावर घेवुन तर पोलीस निरीक्षक बलवंत मांडगे व पोलीस अंमलदार यांनी गळ्यात टा...

आंबेगाव तालुक्यात दुर्गा ब्रिगेडची कार्यकारणी जाहीर अध्यक्षपदी मनीषा गावडे यांची निवड

समर्थ भारत वृत्तसेवा:   महिलांना मोठ्या प्रमाणात गृहउद्योग तसेच टेक्निकल कपन्यांमध्ये अद्योगिक क्षेत्रात रोजगार उपलब्ध करून महिलांचे सबलिकारण होण्यासाठी महिलांच्या न्याय हक्क, अन्याय या विरुद्ध लढण्यासाठी आंबेगाव तालुक्यात 'फोरम ऑफ स्मॉल स्केल इंडस्ट्रिज असोसियशनचे अध्यक्ष, मेट्रो रेल्वे चे ब्रँड ऍम्बसिडर छावा संघटनेचे अध्यक्ष अभयदादा भोर तसेच दुर्गाताई भोर यांच्या अध्यक्षतेखाली भोसरी या ठिकाणी नियुक्ती पत्र देऊन आंबेगाव तालुका दुर्गा ब्रिगेड कार्यकारणी जाहीर करण्यात आली.  यावेळी अभय दादा भोर  यांनी महिलांना विविध  टेक्निकल कंपन्यानमध्ये भेट  देऊन  महिलांना कसा  रोजगार उपलब्ध  करून  देता येईल याचे  मार्गदर्शन केले व आंबेगावची  कार्यकारणी जाहीर केली त्यात अध्यक्षपदी  गावडेवाडीच्या आदर्श राष्ट्रपती पुरस्कार प्राप्त सरपंच मनीषा ताई संतोष गावडे यांची निवड झाली. तसेच उपाध्यक्ष पदी प्रमिलाताई टेमगिरे, सचिव वैशाली थोरात, खजिनदार पदी राणी शहाणे , सरचिटणीस प्रीती भालेराव, उपसरचिटणीस अश्विनी बागल,संघटक प्रमुख ज्योती येवले, संघटक प्र...

तीन लाचखोर शिक्षणाधिकाऱ्यांविरुद्ध गुन्हा दाखल; कोट्यावधींची संपत्ती जमवणे भोवले!!

समर्थ भारत वृत्तसेवा: पुणे  तुकाराम सुपे, विष्णू कांबळे आणि किरण लोहार या तीन लाचखोर शिक्षणाधिकाऱ्यांविरुद्ध लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने गुन्हा दाखल केला आहे. कोट्यावधींची बेकायदा संपत्ती जमवणे या शिक्षणाधिकाऱ्यांना भोवले आहे. त्यांच्या कुटुंबाचाही यात सहभाग आढळून आल्याने आरोपींच्या यादीत त्यांच्या कुटुंबीयांचीही नावे आहेत.  A case has been registered against three bribe-taking education officials तुकाराम सुपे याने 3 कोटी 59 लाख रुपये, विष्णू कांबळे यांनी ८२ लाख रुपये, तर किरण लोहारने 5 कोटी 85 लाख रुपयांची बेकायदा संपत्ती जमवल्याचा आरोप आहे. यापैकी तुकाराम सुपेला अटक देखील झाली होती, सध्या तो सेवानिवृत्त आहे. सर्वांविरुद्ध कायदेशीर प्रक्रिया सुरू आहे.  आरोपी लोकसेवक : 1. तुकाराम नामदेव सुपे, वय - 59 वर्षे, तत्कालीन शिक्षणाधिकारी माध्यमिक जि प पुणे. (सध्या सेवा निवृत्त) रा. कल्पतरू, गांगर्डेर नगर, सुदर्शन हॉस्पिटल समोर, पिंपळे गुरव, पुणे. 1. विष्णू मारुतीराव कांबळे वय 59 वर्ष, सेवानिवृत्त शिक्षणाधिकारी, माध्यमिक शिक्षण विभाग, जिल्हा परिषद सांगली, 2. पत्नी जयश्री विष्...

30 ते 50 वयोगटात हृदयविकाराच्या समस्या वाढल्या : डॉ. राऊत

समर्थ भारत वृतसेवा (सुधाकर सैद) :  बेल्हे यथे ील एक प्रथितयश उद्योजक सागर व डॉ. अजित लामखडे यांचे वडील अशोक उर्फ बबन शिवबा लामखडे यांच्या दशक्रिया विधीमध् मंगळवार द ये िनांक २८/११/२०२३ रोजी आध्यात्मिक प्रवचना ऐवजी समाजामध्ये विशेषत: तरुणांनी स्वतःच्या आरोग्यविषयक व हृदयासंबंधी काय काळजी घ्यावी यासंदर्भात नारायणगाव यथे ील हृदयविकार तज्ञ , सर्पतज्ञ व विषबाधा तज्ञ डॉ. सदानंद राऊत यांचे व्याख्यान ठेवून एक वेगळा व स्तुत्य उपक्रम राबविण्याचा पायंडा पाडण्याचा प्रयत्न केला. यावेळी बोलताना डॉ. राऊत यांनी हृदयविकार हा आजार होण्याअगोदर जाणवणारी लक्षणे व त्यानंतर घ्यावयाची काळजी यासंदर्भात विवेचन केले. सध्याची बदलती जीवनशैली , नियमित व्यायामाचा अभाव , यांत्रिकीकरणामुळे शारीरिक कष्टाचा अभाव , आयटी क्षेत्रातील तरुणांना १२/१४ तास बसून करावे लागणारे काम , त्यामुळे येणारी स्लता , आहाराव थू िषयी औदासीन्य , परिपर्ण ू आहार न मिळणे , पर्यायाने येणारा मानसिक ताणतणाव , तरुणांमध वाढलेले गुटखा व दारू या व्यसनाचे प्रमाण , तसेच घरापासून दूर असलेल्या ग्रामीण महाविद्यालयात शिक्षण घेत असले...