Skip to main content

Posts

Showing posts from November, 2023

अवकाळीने झालेल्या नुकसानीचे तातडीने पंचनामे करा : आढळराव पाटील

 समर्थ भारत वृत्तसेवा माजी खासदार शिवाजीराव आढळराव पाटील यांनी  आंबेगाव तालुक्यातील अनेक ठिकाणी प्रामुख्याने खडकवाडी, वाळुंजनगर, लोणी, धामणी, वडगाव पीर, कुरवंडी, कारेगाव या परिसरामध्ये गारपीट व अवकाळी पाऊस मोठ्या प्रमाणात होऊन झालेल्या शेतकऱ्यांच्या शेतीच्या नुकसानीची पाहणी करून जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख व तहसीलदार संजय नागटिळक यांच्याशी दूरध्वनीवरून चर्चा केली.  सदर पिकांच्या नुकसानीचे पंचनामे तातडीने करण्यात यावे याबाबत सूचना केल्या. मुख्य म्हणजे अनेक शेतकऱ्यांनी कमी क्षेत्रामध्ये जास्त प्रमाणात पीक घेतले असून सदर पंचनामे हे वस्तुस्थितीला आधारभूत मानून योग्यरित्या करण्यात यावे असे सांगितले. शिरूर लोकसभा मतदारसंघातील विविध भागात मोठ्या प्रमाणात वादळी वाऱ्यासह जोरदार पाऊस होऊन झालेल्या नुकसानीमुळे शेतकरी हतबल झालेला आहे. याबाबत राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची मंत्रालय, मुंबई येथे भेट घेऊन तातडीने मदत मिळण्याबाबत निर्णय घेण्यात यावा अशी आग्रही मागणी करणार असल्याचे माजी खासदार आढळराव पाटील यांनी शेतकऱ्यांना सांगून आश्वस्त केले. यावेळी पंचायत समितीचे माजी सदस्य रव...

देवदत्त निकम यांच्या पाठोपाठ सहकार मंत्री वळसे पाटीलही नुकसानग्रस्त भागाच्या दौऱ्यावर

समर्थ भारत वृत्तसेवा पेठ ता. २७ : आंबेगाव तालुक्यातील सातगाव पठार परिसरात काल दुपारी तीन ते पाच च्या दरम्यान अतिवृष्टी व गारपटीने मोठ्या प्रमाणात पिकाचे नुकसान झाले आहे. यामध्ये कांदा, बटाटा, ज्वारी, हरभरा, लसूण, टोमॅटो आदी पिकांचा समावेश आहे.  आज सकाळी भीमाशंकर सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन देवदत्त निकम यांनी सकाळीच शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन शेती पिकांच्या नुकसानीची पाहणी करायला सुरुवात केली असून, त्यापाठोपाठ राज्याचे सहकार मंत्री दिलीप वळसे पाटील यांनी सातगाव पठारावरील नुकसान ग्रस्त भागाची पाहणी करण्यात केली.  यावेळी जिल्हा कृषी अधीक्षक, प्रांताधिकारी, तहसीलदार, गट विकास अधिकारी, उपकार्यकारी अभियंता, मंडल कृषी अधिकारी, सरपंच मनीषा तोत्रे, उपसरपंच जितेंद्र तोत्रे, विकास बारवे, कैलास तोत्रे, पोलीस पाटील प्रगती तोत्रे, राष्ट्रवादीचे तालुका अध्यक्ष विष्णू हिंगे, संतोष धुमाळ, माऊली एरंडे, तलाठी माने, दत्तात्रय तोत्रे आदी उपस्थित होते. दरम्यान शासनाने जिल्हाधिकाऱ्यांना पंचनामे करण्याचे आदेश देण्यात आले असल्याची माहिती सहकार मंत्री वळसे पाटील यांनी दिली. कालच्या पावसाने सातगाव पठ...

देवदत्त निकम भल्या सकाळीच नुकसानग्रस्त शेतकऱ्यांच्या बांधावर

समर्थ भारत वृत्तसेवा: मंचर ता. २७ : पुणे जिल्ह्यासह महाराष्ट्रभर झालेल्या अवकाळी पावसामुळे आणि गारपिटीमुळे पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झालेले असून निसर्गाच्या लहरीपणामुळे शेतकरी मेटाकुटीस आला आहे. अशा वेळी शेतकऱ्याला सरकारकडून मदतीची अपेक्षा असताना, भीमाशंकर सहकारी साखर कारखान्याचे माजी चेअरमन देवदत्त निकम भल्या सकाळीच नुकसान ग्रस्त शेतकऱ्यांच्या भेटीला गेले आहेत. रविवारी (दि. २६) झालेल्या अवकाळी पावसाने आणि गारपिटीने आंबेगाव, शिरूर तालुक्यांमध्ये शेतकऱ्यांचे कोट्यावधी रुपयांचे नुकसान झाले आहे. अनेक ठिकाणी पिके भुईसपाट झाली असून, काही ठिकाणी काढणीला आलेला कांदा, ज्वारी, गहू, बीट, कोबी, फ्लॉवर, धना, मेथी, चारा आदी पिके भुईसपाट झाल्याने शेतकरी हवालदिल झाला आहे. या नुकसान ग्रस्त शेतकऱ्यांच्या समस्या जाणून घेण्यासाठी भीमाशंकर सहकारी साखर कारखान्याचे माजी चेअरमन देवदत्त निकम नुकसानग्रस्त भागाच्या दौऱ्यावर आहेत. आंबेगाव आणि शिरूर तालुक्यातील नुकसानग्रस्त शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन नुकसानीची पाहणी करून संबंधित अधिकाऱ्यांकडे आणि शासनाकडे शेतकऱ्यांच्या समस्या मांडण्यासाठी त्यांनी प्रत्येक नु...

आंबेगाव तालुक्यात पावसाचा धुमाकूळ, शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान

आंबेगाव प्रतिनिधी: आंबेगाव तालुक्यातील पूर्वपट्ट्यामध्ये लोणी,धामणी, खडकवाडी, वडगावपिर,शिरदाळे,मांदळवाडी, रानमळा ,वाळूज नगर ,या  परिसरामध्ये 26 नोव्हेंबर रोजी दुपारी अडीच वाजता अचानक झालेल्या गारपिटीमुळे शेतकरी वर्गाचे प्रचंड नुकसान झालेले आहे. शेतकऱ्यांच्या घरासमोर बांधलेल्या जनावरांसाठी असणारा चारा, पिके, घास, गवत, मका, गहू, त्याचप्रमाणे शेतकऱ्यांचे कांदा लागवडीचे दिवस चालू असताना पावसामुळे असणारे कांदा रोप त्याचप्रमाणे ज्या शेतकऱ्यांची बटाटे काढण्याची लगबग सुरू होती अशा शेतकऱ्यांचे बटाट्याचे नुकसान झाले आहे. प्रचंड नुकसान झाल्यामुळे व गारांचा आकार प्रचंड मोठा असल्यामुळे अगदी शेतातील उभ्या असणाऱ्या झाडांना पाला देखील राहिलेला नाही. लोणी धामणी परिसरामध्ये असणार उपबाजार समितीचे मार्केट या ठिकाणी शेतकऱ्यांनी विक्रीस आणलेल्या कांद्याचे प्रचंड नुकसान झालेले असून कृषी विभागाने शेतामधील झालेल्या शेतकऱ्यांच्या पिकांचे नुकसान त्याचप्रमाणे लोणी बाजार समिती या ठिकाणी विक्रीसाठी आणलेल्या कांद्याचे नुकसान याचे त्वरित पंचनामे करून शेतकऱ्यांना मदत करावी अशी मागणी शेतकरी वर्गातून केली जात आहे.

कोरोना काळात पुणे महापालिकेत लाखो रुपयांचा घोटाळा उघड

पुणे प्रतिनिधी : कोरोना कालावधीत पुणे महापालिकेत लाखो रुपयांचा घोटाळा झाल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. या प्रकरणी अपहार करणाऱ्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. कोरोना चाचणी किट्स आणि औषधे खासगी रुग्णालयांत विक्री करून ८० ते ९० लाख रुपयांचा अपहार केल्याप्रकरणी महापालिकेचे तत्कालीन आरोग्य प्रमुख डॉ. आशिष भारती यांच्यासह तिघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत सतीश बाबुराव कोळसुरे (वय ४२, रा. पिंपळे गुरव) यांनी वारजे माळवाडी पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यावरून तत्कालीन आरोग्य अधिकारी डॉ. आशिष भारती, डॉ. अरुणा सूर्यकांत तायडे, डॉ. ऋषिकेश हनुमंत गार्डी यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, २०२१ मध्ये कोरोना महामारीच्या काळात राज्य सरकारने वारजे येथील कै. अरविंद बारटक्के रुग्णालयासाठी कोरोना चाचणीचे किट्स, सॅनिटायझर आणि औषधे उपलब्ध करून देण्यात आली होती. परंतु तत्कालीन आरोग्य प्रमुख डॉ. भारती यांच्यासह तिघांनी कागदपत्रांमध्ये फेरफार आणि खोट्या नोंदी केल्या. कोरोना चाचणीचे किट्स आणि औषधे वारजे येथील रुग्णालयात वापरण्यात आल्याचे राज्य सरकार आणि ...

शेतकऱ्यांना भेटणार आता 8 हजार रुपये

समर्थ भारत वृत्त: केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन येत्या १ फेब्रुवारी २०२४ रोजी २०२४-२५ या आर्थिक वर्षासाठी अर्थसंकल्प संसदेत सादर करतील. त्यांचा हा सलग सहावा अर्थसंकल्प असेल. यात शेतकऱ्यांना दिला जाणारा सन्मान निधी दोन हजारांनी वाढविला जाण्याची शक्यता आहे. जाण्याची सध्या या योजनेतून शेतकऱ्यांना वर्षाला ६ हजार रुपये दिले जातात. ही रक्कम वाढवून ८ हजार केली जाऊ शकते. सध्या सन्मान निधी वर्षभरात तीन हफ्त्यांमध्ये दिला जातो. दर चार महिन्यांनी २ हजार रुपये शेतकऱ्यांच्या थेट बँक खात्यात जमा केले जातात. मोदी सरकारच्या वतीने १५ नोव्हेंबर रोजी शेतकऱ्यांच्या खात्यात या सन्मान निधीचा १५ वा हप्ता जमा केला होता. केंद्र सरकारची ही सर्वांत मोठी योजना आहे. १ डिसेंबर २०१८ पासून ही योजना लागू करण्यात आली. सरकारकडून दिल्या जाणाऱ्या सन्मान निधीत वाढ केली जावी, अशी मागणी शेतकऱ्यांकडून करण्यात येत होती. ११ कोटी कुटुंबांना पंतप्रधान शेतकरी सन्मान निधीचा लाभ मिळाला आहे. - २.६० लाख कोटी रुपयांचा निधी या योजनेतून आतापर्यंत वितरित करण्यात आला आहे. लोकप्रिय अर्थसंकल्प मांडणार? आगामी वर्षात देश लोकसभा निवडणुका...

एसटी चालकांना गाडी चालवताना मोबाइलवर बोलण्यास बंदी

समर्थ भारत वृत्त : एसटी बस चालवत असताना फोनवर बोलणे अथवा हेडफोन घालून मोबाईलवरील गाणी, व्हिडीओ ऐकणे/बघणे अशी चालकाची एकाग्रता भंग करणारी कृत्ये चालकाकडून घडल्यास त्यांच्यावर प्रचलित नियमानूसार कडक कार्यवाही करण्याचे निर्देश एसटी प्रशासनाने दिले आहेत. एसटी चालकांना गाडी चालवताना मोबाइल वापरण्यास आता बंदी घालण्यात आली आहे. असा नवा नियम लागू करण्यात आला असून याबाबत सूचना जारी करण्यात आल्या आहेत. एसटीचा प्रवास हा सुरक्षित प्रवास म्हणून ओळखला जातो. गेली ७५ वर्षे प्रवाशांची विश्वासर्हता जपण्यामध्ये एसटीच्या निर्व्यसनी व सुरक्षित वाहन चालवणाऱ्या चालकांचा खुप मोठा वाटा आहे. परंतू गेल्या काही दिवसांमध्ये एसटी बस चालवित असतांना फोनवर बोलणे, कानात हेडफोन घालून गाणी ऐकणे, मोबाईलवरील व्हिडीओ पाहणे अशा चालक व प्रवाशांचाद्ष्टीने अत्यंत धोकादायक असलेल्या कृत्यामुळे बसमधून प्रवास करणाऱ्या प्रवाशांच्या मनात असुरक्षिततेची भावना बळावते. याबदृल समाज माध्यमातून, लोकप्रतिनिधींमार्फत अनेक तक्रारी एसटी महामंडळाकडे दाखल झाल्या आहेत. यापुढे अशा घटना निर्दशनास आल्यास संबंधीत चालकावर निलंबनापर्यंतची प्रमादीय कार्य...

कुख्यात गुंड जाधव येरवडा कारागृहातून फरार

पुणे प्रतिनिधी : खुनाच्या आरोपाखाली येरवडा कारागृहात शिक्षा भोगत असलेला कुख्यात गुंड आशिष जाधव हा पळून गेला आहे. पोलिसांना चकवा देऊन तो तुरुंगातून पळून गेला असून एकच खळबळ उडाली आहे. यामुळं पोलिसांच्या कार्यपद्धतीवर प्रश्नचिन्ह उपस्थित केला जात आहे. वारजे माळवाडीचा रहिवासी आशिष जाधव हा वारजे माळवाडी पोलीस स्टेशनच्या हद्दीतील एका खुनाच्या गुन्हात 2008 पासून येरवडा कारागृहात होता. जाधवला येरवडा कारागरातील रेशन विभागात काम देण्यात आलं होतं. या कामादरम्यानच तो पळून गेल्याचा संशय आहे.  कडक सुरक्षाव्यवस्थेत काल दुपारच्या सुमारास कारागृहातील कैद्यांची तुरुंग अधिकाऱ्यांनी मोजणी केली. त्यावेळेस अशिष जाधव हा कारागृहातील अधिकाऱ्यांना आढळून आला नाही. त्यामुळं जाधव हा फरार झाल्याचं लक्षात आलं. राज्यातील सर्वात संवेदनशील आणि कडक सुरक्षेसाठी ओळखल्या जाणाऱ्या येरवडा करागृहातूनच तो पळाल्याने खळबळं उडाली आहे.

दुधाचा भाव घसरल्याने दूध उत्पादक अडचणीत

समर्थ भारत वृत्तसेवा  निरगुडसर ता. १८ : पूर्वी शेतीला जोडधंदा म्हणून शेतकरी दूध व्यवसायाकडे पाहत होता. मात्र, मध्यंतरी वाढलेल्या दरामुळे तरुण वर्गही दूध व्यवसायाकडे वळला आहे. मागील सोळा-सतरा महिन्यांपासून गाय व म्हशीच्या दूध दरात वाढ झाली होती. प्रतिकूल परिस्थितीमध्ये दरात वाढ झाल्याने शेतकऱ्यांना त्याचा फायदा झाला होता. शिवाय स्थानिक पातळीवर वाढत्या दराची अंमलबजावणी झाल्याने त्याचाही फायदा झाला होता; मात्र पुन्हा दुधाचे दर घसरण्यास सुरुवात झाली आहे. सणासुदीच्या तोंडावर दूध दरात दोन रुपयांनी घसरण झाली आहे. पशुखाद्याची दर वाढत असताना, दुधाला चांगली मागणी असतानाही दर कमी होत आहेत. उन्हाळ्याच्या सुरुवातीला दुधाला प्रति लिटर ३९ रुपये दर मिळाला होता. त्यामुळे तरुणाई दूध व्यवसायाकडे वळली. बँकेचे, पतसंस्थेचे कर्ज घेऊन, तरुण या व्यवसायात गुंतला आहे. त्यांना मोठा आर्थिक फटका दुध दर कपातीमुळे बसणार आहे. नव्याने धंद्यात उतरलेल्या तरुण वर्ग कर्जाच्या विळख्यात अडकणार आहे.दुध व दुग्धजन्य पदार्थांना वाढती मागणी असूनही गायीच्या दूध दरात कपात केल्याने संकट वाढले आहे. प्रत्यक्षात दुधाला प्रतिलिटर उत...

मा. खा. शिवाजीराव आढळराव पाटील राष्ट्रवादीत?

आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्शवभूमीवर राज्यभरातील सगळ्याच पक्षांनी चाचपणी सुरू केली आहे. सत्तेत सहभागी असणाऱ्या अजित पवार गटाकडून शिरूर लोकसभा मतदार संघावर दावा केल्याने शिरूर लोकसभा मतदार संघाचे माजी खासदार शिवाजीराव आढळराव पाटील हे राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) पक्षासोबत जाणार असल्याच्या चर्चा सुरू आहेत. लोकशाही या वृत्तवाहिनीने प्रसारित केलेल्या एका वृत्तानुसार राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) पक्षाने लोकसभेच्या ९ जागांवर दावा केला असून, शिरूर लोकसभा मतदार संघाचाही यामध्ये समावेश आहे. काँग्रेस पक्षाच्या एका बड्या नेत्यासह शिवसेनेचे (शिंदे गट) मा. खा. शिवाजीराव आढळराव पाटील अजित पवार गटात जाण्याची शक्यता वर्तविण्यात आली आहे. मा. खा. शिवाजीराव आढळराव पाटील नॉट रीचेबल! आगामी लोकसभा निवडणुकी या महायुतीत लढविल्या जाणार असून शिंदे गट, भाजपा आणि अजित पवारांची राष्ट्रवादी या तिन्ही पक्षांतील जागावाटपात शिरूर लोकसभा मतदार संघ हा अजित पवार गटाकडे जाणार असल्याने आणि विद्यमान खा. डॉ. अमोल कोल्हे यांनी भाजपसोबत जवळीक वाढल्याने? माजी खा. शिवाजीराव आढळराव पाटील राजकीय सोय म्हणून अजित पवा...

ऐन दिवाळीत एसटी बस बंद, प्रवाशांना सहन करावा लागतोय नाहक त्रास

मंचर प्रतिनिधी: ऐन दिवाळीत महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाच्या मनमानी कारभाराचा प्रवाशांना मोठा फटका बसताना पाहायला मिळतोय. दिवाळीच्या निमित्ताने सुट्ट्या असल्यामुळे लाखो प्रवाशी शहरातून आपल्या मूळ गावी प्रवास करत असतात. अनेक बहिणी आपल्या भावाला ओवाळायला भावाकडे जात असतात. मात्र राज्य परिवहन महामंडळाच्या वतीने गेले अनेक दिवस विविध मार्गांवरील बस नियमित वेळेत न सोडणे, बस नादुरुस्त असल्याचे सांगून अचानक रद्द करणे, बसच न सोडणे अशा अनेक गोष्टींमुळे प्रवाशांचे मोठे हाल होतायेत. मागील वर्षी मोठा डामडौल करत एस टीची मोठी जाहिरात करून प्रवाशांविषयी मोठी आपुलकी दाखवत राज्य सरकारने मोठमोठ्या जाहिराती केल्या होत्या, मात्र या वर्षी राज्यभरात प्रवाशांचे मोठे हाल होताना पाहायला मिळत आहेत. आंबेगाव तालुक्यातील चास, नारोडी, साकोरे तसेच आदिवासी भागातील अनेक गावांमध्ये एस टी बसच्या नियमित फेऱ्यांना कात्री लावल्याने या परिसरात देखील प्रवाशांना तासंतास तिष्ठत उभे राहावे लागत असून शेवटी सोबत आणलेले ओझे घेऊन रिकाम्या हाताने घरचा रस्ता धरावा लागत आहे. पुढाऱ्यांच्या हुजऱ्यांनी संपर्क केल्यावर एस टी प्रशासन काम...

मंचरमध्ये उत्तम भाग्य ज्वेलर्सवर दरोडा

  मंचर प्रतिनिधी: मंचरमध्ये (ता. आंबेगाव) उत्तम भाग्य ज्वेलर्सवर सात दरोडेखोरांनी ६.५० लाख रुपयांचा ऐवज चोरल्याची घटना घडली आहे. या दरोडेखोरांनी दरोडा टाकून जाताना दुकान मालकाची आई, मुलगा, मुलीला बांधून ठेवून दमदाटी केली. पोलिसांनी व स्थानिकांनी तत्परता दाखवत घटनास्थळी येऊन ५ दरोडेखोरांना जेरबंद केले असून दोघे फरार झाले आहेत. ही घटना आज पहाटे २ ते ३ च्या सुमारास घडली आहे. दरम्यान जैना समदडिया या धाडसी मुलीने संबंधित हत्यारबंद दरोडेखोरांना प्रतिकार करत थोपविण्यासाठी प्रयत्न केल्याने तिचे कौतुक होत आहे. मंचर शहराच्या बाजारपेठेत भरवस्तीत उत्तम भाग्य ज्वेलर्स हे सोन्या-चांदीचे दुकान आहे. मागील एक महिन्यापासून दरोडेखोरांनी या दुकानाची रेकी केली होती. संबंधित दरोडे खोरांना दोन स्थानिकांनी मदत करत सर्व माहिती पुरवली. मालक अभिजीत समदडिया हे रात्री दुसऱ्या दुसऱ्या मजल्यावर तर त्यांची आई ललिताबाई (वय ७५), मुलगा यश (वय २१), मुलगी जैना (वय १६) हे पहिल्या मजल्यावर झोपले होते. आज पहाटे २ च्या सुमारास ७ दरोडेखोर ड्रेनेजच्या पाईपवरून तीन मजली इमारतीवर चढले. इमारतीचा वरील दरवाजा तोडून जिन्याने ते ख...