घोडेगाव प्रतिनिधी:
पुणे जिल्हा माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळा मुख्याध्यापक संघाच्या वतीने आमोंडी येथील लालबहादूर शास्त्री विद्यालयाचे शिक्षक संजय बबन फलके यांना जिल्हास्तरीय गुणवंत शिक्षक पुरस्कार देऊन गौरविण्यात आले.
स्वारगेट (पुणे) येथील गणेश कला क्रीडा मंच येथे बुधवारी (ता.४) हा पुरस्कार सोहळा संपन्न झाला. कार्यक्रमाचे अध्यक्ष लेखक शरद तांदळे, शिक्षक आमदार जयंत तासगावकर, ज्ञानेश्वर म्हात्रे, जे.के. पाटील, शिक्षणाधिकारी सुनंदा वाखारे, पुणे जिल्हा मुख्याध्यापक संघाचे अध्यक्ष नंदकुमार सागर, सचिव प्रसाद गायकवाड व इतर पदाधिकाऱ्यांच्या हस्ते गुणवंतांना सन्मानित करण्यात आले.
या कार्यक्रमास संस्थेचे अध्यक्ष, सचिव व सर्व पदाधिकारी, ग्रामस्थ, पालक, शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते अशी माहिती विद्यालयाचे मुख्याध्यापक एल.एन. काळे यांनी दिली.