महाळूंगे पडवळ प्रतिनिधी:
सकल मराठा समाजाच्या वतीने महाळुंगे पडवळ या ठिकाणी रविवार दिनांक 29 नोव्हेंबर पासून मराठा योद्धा मनोज जरांगे पाटील यांच्या उपोषणास पाठिंबा म्हणून सकल मराठा समाज महाळुंगे पडवळ, कळंब, विठ्ठलवाडी, नांदूर, साकोरे, कडेवाडी, चासच्या वतीने आमरण उपोषण करण्यात आलेले आहे. या उपोषणास मराठा समाजाचा पाठिंबा वाढत आहे सकल मराठा समाजाच्या वतीने सर्व मराठा समाजाच्या सर्व आमदार, खासदारांच्या विरोधात घोषणा दिल्या गेल्या जात आहे. लोकांचा तीव्र संताप होता दिसतं आहे. राजकीय पुढाऱ्यांना नेत्यांना गावबंदी करण्यात आली असून राजकीय जाहिरात बंद ही करण्यात आली.
शासनाचा तीव्र निषेध करण्यात आला यात विशेष करून महिला ज्येष्ठ नागरिक व युवक यांचा मोठ्या प्रमाणात सहभाग होता "आरक्षण आमच्या हक्काचं नाही कुणाच्या बापाचं"या घोषणाही देण्यात आल्या.