लाखनगाव प्रतिनिधी:
शुक्रवार दिनांक ६ ऑक्टोबर २०२३ रोजी लाखनगाव (ता. आंबेगाव) येथे वनविभाग, न्यू इंग्लिश स्कूल व जि प प्राथमीक शाळा यांच्या संयुक्त विद्यमाने सर्व विद्यार्थी, ग्रामस्थ, पदाधिकारीं या सर्वांसाठी वन्यजीव सुरक्षा सप्ताहचे आयोजन करण्यात आले होते.
याप्रसंगी वन्यजीवांचे अभ्यासक, रेस्क्यू टीम, जुन्नर वणविभागाच्या सदस्या व इको रेस्क्यू टीम दौंड च्या मेंबर शारदा दत्तात्रय राजगुरू यांनी वन्यजीव आपले वैरी नसून शेजारी आहेत, वन्यजीव बिबट्या हा आपल्या आजूबाजूला वावरणारा, राहणारा प्राणी आहे, त्याच्यापासून आपण आपली स्वतःची कशी काळजी घ्यावी? बिबट्याची काळजी कशी घ्यावी? बिबट्या पासून आपल्याला कोणते धोके होऊ शकतात? बिबट्या माणसांवर हल्ला करतो का? बिबट्या प्राण्यांची शिकार कधी करतो? साधारण आपल्या परिसरात बिबट्यांची संख्या किती आहे? कोणत्या प्रवर्गातील बिबटे आहेत? साधारण बिबट्या माणसांची शिकार करतो का बिबट्या कोणत्या वेळेला शिकार करतो? अशी सखोल माहिती दिली. यावेळी बिबट्यांच्या संदर्भातल्या व्हिडिओ क्लिपच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना चित्रफिती दाखवण्यात आल्या
याप्रसंगी कार्यक्रमासाठी वनरक्षक साईमाला गीते, प्रायमरी आणी माध्यमिक शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष महादेव कानसकर, सोमनाथ पोंदे, सरपंच प्राजक्ता रोडे, कल्पना बोहाडे, निसर्गाचे सखोल अभ्यासक व रेस्क्यू टीमचे मेंबर दत्तात्रेय राजगुरव, ग्रामसेविका शीला साबळे, माध्यमिक शाळेचे मुख्याध्यापक अनिल देसले,प्राथमिक शाळेचे मुख्याध्यापक दत्तात्रय डोळस, रेस्क्यू टीमचे मेंबर व पत्रकार विजय कानसकर,अशोक जाधव, रामदास वळसे, महादेव दौंड, विकास खळे, अजय तळेकर दोन्ही शाळांचे सर्व शिक्षक, शिक्षिका व प्राथमिक माध्यमिक चे सर्व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
यावेळी चर्चा सत्र, चित्रफीतींच्या माध्यमातून मार्गदर्शन करत वन्यजीव सुरक्षा सप्ताह साजरा करण्यात आला. दरम्यान इंग्लिश स्कूलच्या सर्व विद्यार्थ्यांनी गावातून प्रभात फेरी काढली. कार्यक्रमाचे प्रास्ताविक मुख्याध्यापक अनिल देसले यांनी केले तर मुख्याध्यापक दत्तात्रय डोळस यांनी आभार मानले.