अवसरी प्रतिनिधी:
अवसरी खुर्द येथील ग्राम विकास अधिकारी जे बी शिदोरे हे कधीही ग्रामपंचायत मध्ये वेळेत हजर नसतात अनेक वेळा ग्रामपंचायत मध्ये अनुपस्थित असतात लोकांची काम वेळेत करत नाहीत नागरिकांच्या बरोबर आर्यभिने वागतात लोकांचे फोन उचलत नाही त्यांच्या कामाची चौकशी व्हावी,
ग्रामपंचायत च्या माध्यमातून केलेल्या बांधकामांचे चौकशी व्हावी कामांमध्ये बेकायदेशीरपणा आणि अनियमितपणा आहे अशा अनेक नागरिकांच्या तक्रारी आहेत त्यांच्या कामकाजाची कार्यालयीन चौकशी व्हावी आणि त्यांच्यावर कारवाई करावी अशी मागणी मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद पुणे यांच्याकडे आज शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्यावतीने सकाळी केलेली आहे.
शिदोरे यांच्या रिकाम्या खुर्चीला आणि त्यांच्या नामफलकाला पुष्पहार घालून शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष व ग्रामस्थांनी निषेध व्यक्त केला आहे.
यावेळी जिल्हाप्रमुख सुरेश पवार, शहर प्रमुख प्रवीण टेमकर, शहर संघटक राजेश टेमकर, सामाजिक कार्यकर्ते विवेक टेमकर, दीपक शिंदे, जालिंदर इंदोरे, गुलाबराव शिंदे, गोविंद इंदोरे, अधिक कार्यकर्ते उपस्थित होते.