मंचर ता. ४ : सहकारमंत्री दिलीप वळसे पाटील यांच्यावर बुलढाणा जिल्ह्याच्या पालकमंत्री पदाची जबाबदारी देण्यात आली आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये फूट पडल्यानंतर अजित पवार यांच्यासह महायुती मध्ये सहभागी झालेल्या दिलीप वळसे पाटील यांच्याकडे सहकार खात्याची जबाबदारी देण्यात आली होती. आता या नवीन जबाबदारीमुळे वळसे पाटील यांच्या कार्यकर्त्यांमध्ये उत्साह संचारला आहे.
राज्यात १२ जिल्ह्यांच्या पालकमंत्र्यांची नवीन यादी सचिवालयातून प्रकाशित करण्यात आली असून, पुणे जिल्ह्याच्या पालकमंत्रीपदी उपमुख्यमंत्री अजित पवार यांची वर्णी लागली असून चंद्रकांत पाटील यांच्या जागी आता उपमुख्यमंत्री अजित पवार पुण्याचा कारभार पाहणार आहेत. चंद्रकांत पाटील यांच्यावर सोलापूर आणि अमरावती जिल्ह्यांची जबाबदारी असणार आहे.
राज्यातील १२ जिल्ह्यांच्या पालकमंत्र्यांची सुधारीत यादी
पुणे : अजित पवार
अकोला :राधाकृष्ण विखे पाटील
सोलापूर : चंद्रकांत पाटील
अमरावती : चंद्रकांत पाटील
भंडारा : विजयकुमार गावित
बुलढाणा : दिलीप वळसे-पाटील
कोल्हापूर : हसन मुश्रीफ
गोंदिया : धर्मरावबाबा आत्राम
बीड : धनंजय मुंडे
परभणी : संजय बनसोडे
नंदूरबार : अनिल भा. पाटील
वर्धा : सुधीर मुनगंटीवार