मंचर प्रतिनिधी:
वडगाव काशिंबे ता. आंबेगाव येथे मराठा आरक्षणासाठी सकल मराठा बांधव तसेच वडगाव कशिंबेतील ग्रामस्थ यांनी संघर्षयोध्दा मनोज जरांगे पाटील यांना समर्थन देण्यासाठी सर्व राजकीय नेत्यांना गावातील प्रवेश बंद केला असून हा लढा अतिशय बळकट करणार होणार आहे.
सदर उपोषणाचा लढा हा साखळी पध्दतीने असणार आहे यापुढे याचे रुपांतर आमरण उपोषण सुध्दा होणार असल्याचे मराठा समाजाकडून बोलले जाते. मराठा समाजाला आरक्षणाच्या मुद्द्यावर या राजकीय नेत्यांनी मराठ्यांना अनेक वर्षे झुलवत ठेवले आहे.
जो पर्यंत सरकार मराठ्यांना कायद्याच्या चौकटीत टिकणारे आरक्षण देत नाही तोपर्यंत हा लढा चालूच राहणार आहे.
गावामध्ये सर्व पक्षाच्या राजकीय नेत्यांना प्रवेश बंद व मनोज जरांगे पाटील यांना समर्थन देण्याचे फ्लेक्स लावले आहेत.
या उपोषणात, तरुण मोठ्या संख्येने सहभागी झाले आहेत.