मंचर ता. २ : स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे पुणे जिल्हाध्यक्ष प्रभाकर बांगर यांच्यावर १० ते १२ अज्ञात तरुणांनी हल्ला केला असून हा हल्ल्यात प्रभाकर बांगर गंभीर जखमी झाल्याची प्राथमिक माहिती समोर येत आहे.
जुन्नर तालुक्यातील विघ्नहर सहकारी साखर कारखान्याच्या बैठकीसाठी जात असताना, कळंब च्या हद्दीत दहा ते बारा अज्ञात तरुणांनी पाठलाग करून प्रभाकर बांगर यांच्यावर हल्ला केला. या तरुणांनी प्रभाकर बांगर यांना जबर मारहाण करून त्यांच्या डोक्यात दगड घालून त्यांना जीवे मारण्याचा प्रयत्न केल्याची माहिती समोर येते आहे. प्रभाकर बांगर यांच्यासोबत त्यांचे सहकारी वनाजी बांगर हे देखील होते.
प्रभाकर बांगर यांच्यावर मंचर येथील उपजिल्हा रुग्णालयात उपचार सुरू असून, त्यांच्याशी संपर्क होऊ शकला नाही. त्यांचे सहकारी वणाजी बांगर यांनी संबंधित हल्लेखोर हे राष्ट्रवादीचे कार्यकर्ते असून त्यांनी प्रभाकर बांगर यांना आमच्या साहेबांविषयी बोलतो का असे म्हणत तब्बल अर्धा तास मारहाण केल्याची माहिती दिली.