थोरांदळे (ता. आंबेगाव) येथे आज (दि.११) पहाटे 2
२ च्या सुमारास मेंढपाळांच्या वाड्यावर बिबट्याने हल्ला केला. त्या हल्ल्यामध्ये बिबट्याने ७ महिन्यांच्या देवा करगळ या बालकाला लक्ष्य केले होते. आला होतास बाळाच्या आईने बिबट्याला प्रतिकार करत अर्धा ओरडा केला. आईचा आरडाओरडा ऐकून इतर मेंढपाळ जमले. या सर्वांनी आरडाओरडा केल्यामुळे बिबट्याने तिथून पोबारा केला.
या हल्ल्यात सुदैवाने बालक बचावले असले तरी, आई आणि बाळ दोघेही जखमी झाले आहेत. या घटनेच्या संदर्भात मंचर कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी सभापती, विद्यमान संचालक देवदत्त निकम यांनी तातडीने घटनास्थळी भेट देऊन संबंधित घटनेची दखल घेत डॉक्टरांशी आणि वनविभागाशी उपाययोजना करण्याच्या सूचना केल्या. या दोघांवर मंचर येथील उपजिल्हा रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
नुकतेच जुन्नर तालुक्यात एका चार वर्षाच्या चिमुकल्यावर बिबट्याने हल्ला करत त्याला गंभीर जखमी केले होते. त्यात त्या चिमुकल्याचा दुर्दैवी अंत झाला होता. त्यानंतर आज झालेला हल्ला पाहून बिबट्याने पुन्हा माणसाला आपले लक्ष्य केले असल्याची भीती वर्तविण्यात येत आहे.