समर्थ भारत वृत्तसेवा
मंचर ता. १ : राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार आज (दि.१) संध्याकाळी 5.30 वाजता मंचर कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये भेट देऊन राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांशी संवाद साधणार असल्याची माहिती राष्ट्रवादी काँग्रेसचे पुणे जिल्हा कार्याध्यक्ष देवदत्त निकम यांनी दिली.
जुन्नर येथे बिरसा ब्रिगेडच्या वतीने आयोजित काळा चबुतरा अभिवादन दिनाच्या कार्यक्रमाला शरद पवार यांनी हजेरी लावली असून आदिवासी बांधवांच्या मेळाव्याला संबोधित केल्यानंतर ते पुण्याला जात असताना मंचर येथील कृषी उत्पन्न बाजार समितीमधे राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांशी संवाद साधणार आहेत.
देवदत्त निकम यांच्या विनंती वरून होत असलेल्या शरद पवारांच्या या भेटीमुळे सहकार मंत्री दिलीप वळसे पाटील यांच्या गोटात मात्र अस्वस्थता पसरली असल्याची माहिती समोर येत आहे.