Skip to main content

Posts

Showing posts from October, 2023

महाळूंगे पडवळ येथे राजकीय नेत्यांना प्रवेश बंद

महाळूंगे पडवळ प्रतिनिधी: सकल मराठा समाजाच्या वतीने महाळुंगे पडवळ या ठिकाणी रविवार दिनांक 29 नोव्हेंबर पासून मराठा योद्धा मनोज जरांगे पाटील यांच्या उपोषणास पाठिंबा म्हणून सकल मराठा समाज महाळुंगे पडवळ, कळंब, विठ्ठलवाडी, नांदूर, साकोरे, कडेवाडी, चासच्या वतीने आमरण उपोषण करण्यात आलेले आहे. या उपोषणास मराठा समाजाचा पाठिंबा वाढत आहे सकल मराठा समाजाच्या वतीने सर्व मराठा समाजाच्या सर्व आमदार, खासदारांच्या विरोधात घोषणा दिल्या गेल्या जात आहे. लोकांचा तीव्र संताप होता दिसतं आहे. राजकीय पुढाऱ्यांना नेत्यांना गावबंदी करण्यात आली असून राजकीय जाहिरात बंद ही करण्यात आली.  शासनाचा तीव्र निषेध करण्यात आला यात विशेष करून महिला ज्येष्ठ नागरिक व युवक यांचा मोठ्या प्रमाणात सहभाग होता "आरक्षण आमच्या हक्काचं  नाही कुणाच्या बापाचं"या घोषणाही देण्यात आल्या.

वडगाव काशिंबे येथे राजकीय नेत्यांना प्रवेश बंद

मंचर प्रतिनिधी: वडगाव काशिंबे ता. आंबेगाव येथे मराठा आरक्षणासाठी सकल मराठा बांधव तसेच वडगाव कशिंबेतील ग्रामस्थ यांनी संघर्षयोध्दा मनोज जरांगे पाटील यांना समर्थन देण्यासाठी सर्व राजकीय नेत्यांना गावातील प्रवेश बंद केला असून हा लढा अतिशय बळकट करणार होणार आहे.   सदर उपोषणाचा लढा हा साखळी पध्दतीने असणार आहे यापुढे याचे रुपांतर आमरण उपोषण सुध्दा होणार असल्याचे मराठा समाजाकडून बोलले जाते.  मराठा समाजाला आरक्षणाच्या मुद्द्यावर या राजकीय नेत्यांनी मराठ्यांना अनेक वर्षे झुलवत ठेवले आहे. जो पर्यंत सरकार मराठ्यांना कायद्याच्या चौकटीत टिकणारे आरक्षण देत नाही तोपर्यंत हा लढा चालूच राहणार आहे. गावामध्ये सर्व पक्षाच्या राजकीय नेत्यांना प्रवेश बंद व मनोज जरांगे पाटील यांना समर्थन देण्याचे फ्लेक्स लावले आहेत. या उपोषणात, तरुण मोठ्या संख्येने सहभागी झाले आहेत.

भीमाशंकर मंदिर परिसरात पुजाऱ्यांमध्ये लाठ्याकाठ्यांनी हाणामारी

घोडेगाव प्रतिनिधी: भीमाशंकर येथे पुजाऱ्यांमध्ये लाठ्याकाठ्यांनी फ्री स्टाईल हाणामारी पाहायला मिळाली. शिवलिंगावर अभिषेक, पुजा करुन फुले वाहणाऱ्या पुजारी गुरव यांच्यामध्ये पुजेच्या संधीवरुन वाद झाला. हा वाद विकोपाला गेल्याने एकमेकांवर लाठ्या-काठ्या आणि लोखंडी रॉडने हल्ला करीत मारहाण केल्याचा खळबळजनक प्रकार भीमाशंकर मंदिर परिसरात घडला. या प्रकरणानंतर दोन्ही बाजूच्या 36 पुजाऱ्यांवर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. शंकर गंगाराम कौदरे (वय 65 रा. खरोशी, ता. खेड) यांनी दिलेल्या तक्रारीवरुन 21 जणांविरोधात तर गोरक्ष यशवंत कौदरे (रा. भीमाशंकर, ता. खेड) यांच्या तक्रारीवरुन विरोधी गटातील 15 जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दरम्यान, भाविकांसमोरच हा प्रकार घडल्याने मंदिर प्रशासनाची मान शरमने खाली गेली आहे. भीमाशंकर मंदिर गाभारा आणि परिसरात असलेल्या शनि मंदिरात पुजा करण्यावरुन पुजाऱ्यांमध्ये वाद आहेत. सोमवारी दुपारी भाविकांच्या रांग लागलेल्या असताना हा वाद विकोपाला गेला. एका गटाने पुजेला बसलेला पुजाऱ्यांना उठवून तिथला ताबा घेण्याचा प्रयत्न केला. त्यामुळे दोन गटात फ्री स्टाईल हाणामारी सुरू झाली. ल...

मनोज जरांगे पाटलांच्या सभेला 100 एकर जागा निश्चित, 5 लाख मराठाबांधव एकवटणार

राजगुरुनगर प्रतिनिधी:   मराठा आरक्षणासाठी उपोषणकरुन मराठा आरक्षणासाठी मोठा लढा उभा करणारे   मनोज जरांगे पाटील यांची आंतरवाली सराटीनंतर आता थेट राजगुरुनगर ( खेड ) या ठिकाणी सभा होणार आहे . 14 ऑक्टोबर रोजी जालना जिल्ह्यातील अंतरवली सराटी येथे त्यांची विराट सभा झाली . या सभेत त्यांनी आरक्षणासाठी आणखी दहा दिवस सरकारला दिले आहे . त्यापूर्वीच 20 ऑक्टोंबरला राजगुरुनगर येथे   सभा होणार आहे .   पवारांचा बालेकिल्ला असलेल्या ठिकाणी जरांगे पाटील पहिल्यांदाच सभा घेणार आहे . याच सभेची जागादेखील ठरवण्यात आवी आहे .   पुणे   जिल्ह्यातील ही पहिलीच सभा असणार आहे . मराठा क्रांती मोर्चातर्फे या सभेची जय्यत तयारी सुरु करण्यात आली आहे .   आंतरवाली सराटी सारख्या मराठवाड्यातील गावात ऑक्टोबर हीट असूनही लाखो लोकांनी गर्दी केली होती . नजर जाईल तिथपर्यंत मराठे एकवटले होते . यात सर्व वयोगटातील मराठे आंतरवाली सराटीत प्रवास करत दाखल झाले होते . तरुणांचादेखील यात मोठा सहभाग ...

चासच्या बैलपोळ्याला डीजे मुळे गालबोट

समर्थ भारत वृत्तसेवा घोडेगाव ता. १५ : चास (ता. आंबेगाव) येथे भाद्रपदी बैलपोळा मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. अनेक शेतकऱ्यांनी आपल्या बैलांना सजवून गोड नैवेद्य भरवत आपल्या लाडक्या सर्जा राजाची गावातून वाजत गाजत आणि डीजेच्या दनदणाटात मिरवणूक काढली होती. डीजे चालकाच्या दुर्लक्षामुळे डीजेचा धक्का लागून विजेचे दोन खांब वाकून त्यावरील विजेच्या तारा तुटल्या. काही उत्साही लोकांनी मोठ्या आवाजात लावलेल्या डीजेमुळे बैल सैरभैर होऊन उधळले.  गावातील सामाजिक कार्यकर्ते संतोष भागवत, फिरोज इनामदार, ग्रामपंचायत सदस्य संतोष रोकडे आणि या विभागातील वीज कर्मचारी अशोक भोर यांनी तातडीने वीजपुरवठा खंडित केल्यामुळे पुढील अनर्थ टळला. जर वीजपुरवठा तातडीने खंडित केला नसता तर तुटलेल्या तारांमुळे विजेचा धक्का लागून मोठ्या प्रमाणात जीवितहानी होण्याचा धोका निर्माण झाला असता. या घटनेमुळे गावातील अनेक सजग नागरिकांनी बैल पोळ्याला लावलेल्या डीजेवर नाराजी व्यक्त करत गावात डीजे बंदी करावी अशी मागणी केली आहे. डीजेच्या मोठ्या आवाजामुळे सर्वांनाच त्रास होतो, मात्र विनाकारण वाद नको म्हणून यावर कुणी बोलत नाही. डीजेमुळे ल...

थोरांदळेत बिबट्याचा सात महिन्यांच्या बाळावर हल्ला. देवदत्त निकम घटनास्थळी दाखल

  थोरांदळे (ता. आंबेगाव) येथे आज (दि.११) पहाटे 2 २ च्या सुमारास मेंढपाळांच्या वाड्यावर बिबट्याने हल्ला केला. त्या हल्ल्यामध्ये बिबट्याने ७ महिन्यांच्या देवा करगळ या बालकाला लक्ष्य केले होते. आला होतास बाळाच्या आईने बिबट्याला प्रतिकार करत अर्धा ओरडा केला. आईचा आरडाओरडा ऐकून इतर मेंढपाळ जमले. या सर्वांनी आरडाओरडा केल्यामुळे बिबट्याने तिथून पोबारा केला. या हल्ल्यात सुदैवाने बालक बचावले असले तरी, आई आणि बाळ दोघेही जखमी झाले आहेत. या घटनेच्या संदर्भात मंचर कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी सभापती, विद्यमान संचालक देवदत्त निकम यांनी तातडीने घटनास्थळी भेट देऊन संबंधित घटनेची दखल घेत डॉक्टरांशी आणि वनविभागाशी उपाययोजना करण्याच्या सूचना केल्या. या दोघांवर मंचर येथील उपजिल्हा रुग्णालयात उपचार सुरू आहेत. नुकतेच जुन्नर तालुक्यात एका चार वर्षाच्या चिमुकल्यावर बिबट्याने हल्ला करत त्याला गंभीर जखमी केले होते. त्यात त्या चिमुकल्याचा दुर्दैवी अंत झाला होता. त्यानंतर आज झालेला हल्ला पाहून बिबट्याने पुन्हा माणसाला आपले लक्ष्य केले असल्याची भीती वर्तविण्यात येत आहे.

शिवसेनेचा ढाण्या वाघ काळाच्या पडद्याआड

समर्थ भारत वृत्तसेवा मंचर, ता. ८ : शिवसेनेचे माजी पुणे जिल्हा प्रमुख आणि संपर्कप्रमुख ॲड. अविनाश राहणे यांचे आज सकाळी (दि. ८) अल्पशा आजाराने निधन झाले. त्यांच्या अकाली निधनाच्या वृत्ताने आंबेगाव तालुक्यात शोककळा पसरली आहे. आज संध्याकाळी ४ वाजता त्यांच्या पार्थिवावर मंचर येथील तपनेश्वर स्मशानभूमीत अंत्यसंस्कार होणार आहेत. ॲड. अविनाश राहणे हे तब्बल चार दशके राजकारणात सक्रिय राहिले. त्यांचे शिवसेनाप्रमुख स्व. बाळासाहेब ठाकरे, पक्षप्रमुख उध्दव ठाकरे तसेच शिवसेनेच्या अनेक बड्या नेत्यांशी आपुलकीचे संबंध होते. पुणे जिल्ह्यासह आंबेगाव तालुक्यात ते सर्वसामान्य शिवसैनिकांना आणि सर्वसामान्य नागरिकांना निरपेक्ष भावनेने मदत करत असत. मंचर येथे त्यांनी शिवकल्याण पतसंस्था सुरू करून हजारो शेतकरी, तरुण आणि सर्वसामान्य जनतेला सहकार्य केले. आंबेगाव तालुक्यासह पुणे जिल्ह्यात सर्वसामान्य जनतेशी असणारे त्यांचे ऋणानुबंध सर्वश्रुत आहे. सर्वपक्षीय नेत्यांशी देखील त्यांचे सलोख्याचे संबंध होते. त्यांच्या जाण्याने एका झंझावाती युगाचा अंत झाल्याची भावना शिवसैनिक आणि सर्वसामान्य जनतेमध्ये आहे.

लाखनगाव येथे वन्यजीव सुरक्षा सप्ताह संपन्न

लाखनगाव प्रतिनिधी: शुक्रवार दिनांक ६ ऑक्टोबर २०२३ रोजी लाखनगाव (ता. आंबेगाव) येथे वनविभाग,  न्यू इंग्लिश स्कूल व जि प प्राथमीक शाळा यांच्या संयुक्त विद्यमाने सर्व विद्यार्थी, ग्रामस्थ, पदाधिकारीं या सर्वांसाठी वन्यजीव सुरक्षा सप्ताहचे आयोजन करण्यात आले होते.  याप्रसंगी वन्यजीवांचे  अभ्यासक, रेस्क्यू टीम, जुन्नर वणविभागाच्या सदस्या व इको रेस्क्यू टीम दौंड च्या मेंबर शारदा दत्तात्रय राजगुरू यांनी वन्यजीव आपले वैरी नसून शेजारी आहेत, वन्यजीव बिबट्या हा आपल्या आजूबाजूला वावरणारा, राहणारा प्राणी आहे, त्याच्यापासून आपण आपली स्वतःची कशी काळजी घ्यावी? बिबट्याची काळजी कशी घ्यावी? बिबट्या पासून आपल्याला कोणते धोके होऊ शकतात?  बिबट्या माणसांवर हल्ला करतो का? बिबट्या प्राण्यांची शिकार कधी करतो? साधारण आपल्या परिसरात बिबट्यांची संख्या किती आहे? कोणत्या प्रवर्गातील बिबटे आहेत? साधारण बिबट्या माणसांची शिकार करतो का बिबट्या कोणत्या वेळेला शिकार करतो? अशी सखोल माहिती दिली. यावेळी  बिबट्यांच्या संदर्भातल्या व्हिडिओ क्लिपच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना चित्रफिती दाखवण्यात आल्या...

संजय फलके यांना गुणवंत शिक्षक पुरस्कार

घोडेगाव प्रतिनिधी: पुणे जिल्हा माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळा मुख्याध्यापक संघाच्या वतीने आमोंडी येथील लालबहादूर शास्त्री विद्यालयाचे शिक्षक  संजय बबन फलके यांना जिल्हास्तरीय गुणवंत शिक्षक पुरस्कार देऊन गौरविण्यात आले. स्वारगेट (पुणे) येथील गणेश कला क्रीडा मंच येथे बुधवारी (ता.४)  हा पुरस्कार सोहळा संपन्न झाला. कार्यक्रमाचे अध्यक्ष लेखक शरद तांदळे, शिक्षक आमदार जयंत तासगावकर, ज्ञानेश्वर म्हात्रे, जे.के. पाटील, शिक्षणाधिकारी सुनंदा वाखारे, पुणे जिल्हा मुख्याध्यापक संघाचे अध्यक्ष नंदकुमार सागर, सचिव प्रसाद गायकवाड व इतर पदाधिकाऱ्यांच्या हस्ते गुणवंतांना सन्मानित करण्यात आले. या कार्यक्रमास संस्थेचे अध्यक्ष, सचिव व सर्व पदाधिकारी, ग्रामस्थ, पालक, शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते अशी माहिती विद्यालयाचे मुख्याध्यापक एल.एन. काळे यांनी दिली.

ग्रामविकास अधिकारी यांच्या खुर्चीला पुष्पहार घालून निषेध केला व्यक्त

अवसरी प्रतिनिधी: अवसरी खुर्द येथील ग्राम विकास अधिकारी जे बी शिदोरे हे कधीही ग्रामपंचायत मध्ये वेळेत हजर नसतात अनेक वेळा ग्रामपंचायत मध्ये अनुपस्थित असतात लोकांची काम वेळेत करत नाहीत नागरिकांच्या बरोबर आर्यभिने वागतात लोकांचे फोन उचलत नाही त्यांच्या कामाची चौकशी व्हावी,  ग्रामपंचायत च्या माध्यमातून केलेल्या बांधकामांचे चौकशी व्हावी कामांमध्ये बेकायदेशीरपणा आणि अनियमितपणा आहे अशा अनेक नागरिकांच्या तक्रारी आहेत त्यांच्या कामकाजाची कार्यालयीन चौकशी व्हावी आणि त्यांच्यावर कारवाई करावी अशी मागणी मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद पुणे यांच्याकडे आज शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्यावतीने सकाळी केलेली आहे.  शिदोरे यांच्या रिकाम्या खुर्चीला आणि त्यांच्या नामफलकाला पुष्पहार घालून शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष व ग्रामस्थांनी निषेध व्यक्त केला आहे. यावेळी जिल्हाप्रमुख सुरेश पवार, शहर प्रमुख प्रवीण टेमकर, शहर संघटक राजेश टेमकर, सामाजिक कार्यकर्ते विवेक टेमकर, दीपक शिंदे, जालिंदर इंदोरे, गुलाबराव शिंदे, गोविंद इंदोरे, अधिक कार्यकर्ते उपस्थित होते.

सहकारमंत्री दिलीप वळसे पाटील यांच्यावर नवीन जबाबदारी

मंचर ता. ४ : सहकारमंत्री दिलीप वळसे पाटील यांच्यावर बुलढाणा जिल्ह्याच्या पालकमंत्री पदाची जबाबदारी देण्यात आली आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये फूट पडल्यानंतर अजित पवार यांच्यासह महायुती मध्ये सहभागी झालेल्या दिलीप वळसे पाटील यांच्याकडे सहकार खात्याची जबाबदारी देण्यात आली होती. आता या नवीन जबाबदारीमुळे वळसे पाटील यांच्या कार्यकर्त्यांमध्ये उत्साह संचारला आहे. राज्यात १२ जिल्ह्यांच्या पालकमंत्र्यांची नवीन यादी सचिवालयातून प्रकाशित करण्यात आली असून, पुणे जिल्ह्याच्या पालकमंत्रीपदी उपमुख्यमंत्री अजित पवार यांची वर्णी लागली असून चंद्रकांत पाटील यांच्या जागी आता उपमुख्यमंत्री अजित पवार पुण्याचा कारभार पाहणार आहेत. चंद्रकांत पाटील यांच्यावर सोलापूर आणि अमरावती जिल्ह्यांची जबाबदारी असणार आहे. राज्यातील १२ जिल्ह्यांच्या पालकमंत्र्यांची सुधारीत यादी  पुणे : अजित पवार अकोला :राधाकृष्ण विखे पाटील सोलापूर : चंद्रकांत पाटील अमरावती : चंद्रकांत पाटील भंडारा : विजयकुमार गावित बुलढाणा : दिलीप वळसे-पाटील कोल्हापूर : हसन मुश्रीफ गोंदिया : धर्मरावबाबा आत्राम बीड : धनंजय मुंडे परभणी : संजय बनसोडे ...

स्वाभिमानीचे जिल्हाध्यक्ष प्रभाकर बांगर यांच्यावर जीवघेणा हल्ला

मंचर ता. २ : स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे पुणे जिल्हाध्यक्ष प्रभाकर बांगर यांच्यावर १० ते १२ अज्ञात तरुणांनी हल्ला केला असून हा हल्ल्यात प्रभाकर बांगर गंभीर जखमी झाल्याची प्राथमिक माहिती समोर येत आहे. जुन्नर तालुक्यातील विघ्नहर सहकारी साखर कारखान्याच्या बैठकीसाठी जात असताना, कळंब च्या हद्दीत दहा ते बारा अज्ञात तरुणांनी पाठलाग करून प्रभाकर बांगर यांच्यावर हल्ला केला. या तरुणांनी प्रभाकर बांगर यांना जबर मारहाण करून त्यांच्या डोक्यात दगड घालून त्यांना जीवे मारण्याचा प्रयत्न केल्याची माहिती समोर येते आहे. प्रभाकर बांगर यांच्यासोबत त्यांचे सहकारी वनाजी बांगर हे देखील होते.  प्रभाकर बांगर यांच्यावर मंचर येथील उपजिल्हा रुग्णालयात उपचार सुरू असून, त्यांच्याशी संपर्क होऊ शकला नाही. त्यांचे सहकारी वणाजी बांगर यांनी संबंधित हल्लेखोर हे राष्ट्रवादीचे कार्यकर्ते असून त्यांनी प्रभाकर बांगर यांना आमच्या साहेबांविषयी बोलतो का असे म्हणत तब्बल अर्धा तास मारहाण केल्याची माहिती दिली.

राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार आज मंचरमध्ये

समर्थ भारत वृत्तसेवा मंचर ता. १ : राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार आज (दि.१) संध्याकाळी 5.30 वाजता मंचर कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये भेट देऊन राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांशी संवाद साधणार असल्याची माहिती राष्ट्रवादी काँग्रेसचे पुणे जिल्हा कार्याध्यक्ष देवदत्त निकम यांनी दिली. जुन्नर येथे बिरसा ब्रिगेडच्या वतीने आयोजित काळा चबुतरा अभिवादन दिनाच्या कार्यक्रमाला शरद पवार यांनी हजेरी लावली असून आदिवासी बांधवांच्या मेळाव्याला संबोधित केल्यानंतर ते पुण्याला जात असताना मंचर येथील कृषी उत्पन्न बाजार समितीमधे राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांशी संवाद साधणार आहेत. देवदत्त निकम यांच्या विनंती वरून होत असलेल्या शरद पवारांच्या या भेटीमुळे सहकार मंत्री दिलीप वळसे पाटील यांच्या गोटात मात्र अस्वस्थता पसरली असल्याची माहिती समोर येत आहे.

शिरदाळे गावतळ्यात मुबलक पाणी साठा

वळती प्रतिनिधी गेल्या काही दिवस सुरू असलेल्या पावसामुळे शिरदाळे येथील गावतळे ७०% पेक्षा जास्त भरले असून परतीच्या पावसाने भविष्यातील पाण्याचा प्रश्न मिटला आहे. शिरदाळे गाव तसे डोंगरावर वसलेले कोरडवाहू शेती असलेलं गाव. डोंगराळ भाग असल्याने फक्त पावसावर अवलंबून असणारी शेती या ठिकाणी केली जाते. त्यात शाश्वत उत्पन्न नाही. बटाटा आणि ज्वारी ही येथील मुख्य पिके परंतु पावसाचे कमी जास्त प्रमाण यामुळे त्यांची शास्वती नसते. यावर्षी संपूर्ण पावसाळा कोरडा चालला होता तरी देखील बटाटा पीक यात टिकून होते परंतु गेल्या आठ दिवसात झालेल्या अतिपावसामुळे बटाटा पीक हातात आलेले गेले आहे. तर तलावात चांगला पाणी साठा जमा झाला आहे. त्यामुळे निसर्ग हा कशी कृपा करेल सांगता येत नाही. या पावसाने तलाव भरल्यामुळे गावातील पाण्याचा प्रश्न मिटला आहे. तसेच यामुळे नळपाणीपुरवठा करताना उन्हाळ्यात अडचण येणार नाही आणि सर्वांना मुबलक पाणी देता येईल असे सरपंच जयश्री तांबे,उपसरपंच बिपीन चौधरी यांनी सांगितले. तर या पावसामुळे बटाटा पिकाचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले असून पंचनामे करून त्वरित नुकसानभरपाई मिळावी अशी मागणी मा.सरपंच मनोज ...