भागडी प्रतिनिधी:
आर्यन हा शारीरिक अपंग असून तो अभ्यासात हुशार तसेच खेळ संगणक व दैनंदिन जीवनातील सर्व कामे लीलया करतो त्याच्या व्यक्तिमत्व विकासात कुठेही हा विकलांगतेचा अडसर वाटत नाही.
शिक्षक बाळासाहेब गिलबिले यांनी आर्यन मधील शिकण्याची जिद्द पाहून त्याच्याविषयी पर्यावरण संवर्धन समिती environment conservation association संस्थेच्या अध्यक्षा विनिता दाते यांच्याशी संपर्क करून त्याच्या शैक्षणिक विकासाला गती देण्यासाठी मदतीचे आवाहन केले त्याला प्रतिसाद म्हणून अध्यक्षांनी उत्तम दर्जाचा लॅपटॉप आर्यनला बक्षीस म्हणून दिला त्याच्या शैक्षणिक प्रगतीसाठी बालपणापासूनच संगणक व तंत्रज्ञानाची ओळख होऊन त्यांनी भविष्यात स्वयंपूर्ण होताना प्रगतीच्या अतिउच्च शिखरावर असावे यासाठी ही छोटीशी मदत आहे असे त्या म्हणाल्या तसेच ECA च्या माध्यमातून ई वेस्ट रिसायकल साहित्याचा उपयोग जिल्हा परिषदेतील शाळा व ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना ते सातत्याने मदत करत असतात .दुर्गम भागातील अनेक शाळांना अभ्यासासाठी व शाळेसाठी स्वतंत्र सोलर किट बसविण्यात आलेले आहे.
आदर्श गाव भागडीचे शाळा व्यवस्थापन समितीचे माजी अध्यक्ष नितीन आगळे, मोतीराम उंडे, ग्रामपंचायत सदस्य संदिप शिंदे, गणेश भालेराव, दत्ता बराटे, नूतन अध्यक्ष विष्णू उंडे, रविंद्र आगळे, हनुमंत जाधव, विकास बराटे, आकाश आगळे, अश्विनी उंडे, काशिनाथ उंडे, संभाजी गवारी, प्रकाश आगळे, योगीता आगळे, मंदा आदक, शाळा व्यवस्थापन समितीचे आजी-माजी सदस्य तसेच ग्रामस्थ शिक्षक लॅपटॉप प्रदान प्रसंगी उपस्थित होते .
आर्यनला उपस्थित ग्रामस्थांनी शुभेच्छा दिल्या पर्यावरण संवर्धन समिती चे सामाजिक योगदानाबद्दल आभार मानले .
कार्यक्रमाचे नियोजन स्वाती शिंदे लालन गायकवाड आशा वाळके यांनी केले.