लाखणगाव प्रतिनिधी:
लाखणगाव कडून पाबळ च्या दिशेने जाणाऱ्या अल्टो खाली दुचाकी येऊन झालेल्या अपघातात दुचाकीवरील रसिक रंगनाथ दौंड मयत झाल्याची घटना आज सकाळी ९ वा. दरम्यान लाखणगाव या ठिकाणी घडली...
लाखणगाव वरून लोणी च्या दिशेने जात असताना अल्टो गाडी नं.एम.एच. 10 के.एस.8087 बेल्हा जेजुरी रोडने चालवित घेवुन जात असताना रहदारीचे नियमाकडे दुर्लक्ष करून बेदारकारपणे,भरधाव वेगात चालवुन समोर चाललेल्या मोटार सायकल नं.एमच. 14 सी.क्यु.9831 धडक दिली त्यामध्ये रसिक याच्या हाता पायाला किरकोळ जखम आणी डोक्याला गंभीर दुखापत झाल्याने रसिक रंगनाथ दौंड वय १९ वर्ष राहणार लाखणगाव दौंड वस्ती याचा अपघातात मृत्यू झाला आहे. लाखणगाव आणी परिसरात सर्व ग्रामस्थानी हळहळ व्यक्त केली असून रसिक हा आई वडिलांना एकुलता एक मुलगा होता.
सागर भिमाजी साळवे रा. साकुर मांडवे या अल्टो वाहनचालकाविरुद्द पारगाव का. पोलीस स्टेशन येथे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास सहायक पोलीस निरीक्षक लहू थाटे, यांच्या मार्गदर्शनाखाली पो. ना. सांगडे करत आहेत.