मंचर प्रतिनिधी:
आदर्श गाव भागडी येथील प्राथमिक शाळेतील विद्यार्थ्यांनी
आजी-आजोबांचे पाद्यपूजन करून त्यांच्याप्रती प्रेम, कृतज्ञता व आदर
व्यक्त केला. या वेळी आजी- आजोबांनी विविध स्पर्धांमध्ये उत्साहाने सहभाग घेतला.
शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष विष्णू उंडे उपाध्यक्ष मंदाताई आदक व व्यवस्थापन
सदस्यांनी आजी-आजोबांना सन्मानित केले. या
प्रसंगी त्याच्यासाठी गायन, नृत्य, वादन, संगीत
खुर्ची, आदी स्पर्धांचे आयोजन केले होते.
दरम्यान, त्यांनी अभंग, ओव्या, लोकगीते, लग्नाची गाणी, कविता, उखाणे आदी सादर केले. त्याचप्रमाणे आपल्या शालेय जीवनातील आठवणी विद्यार्थ्यांना सांगितल्या. मुख्याध्यापक बाळासाहेब गिलबिले यांनी आजी-आजोबा दिनाचे महत्त्व व आपल्या जीवनातील त्यांचे स्थान याविषयी माहिती दिली. व आजी-आजोबांचे नातवांशी असलेले घट्ट नाते पाल्यांच्या सर्वांगीण विकासासाठी गरजेचे व प्रेरणादायी असल्याने हा कार्यक्रम आयोजित आहे असे सांगीतले.
या कार्यक्रमास पोपट आवडा गवारी (अध्यक्ष जे. ना-संघ),रामचंद्र शंकर आगळे, रामभाऊ भालेराव, केरू मारुती लोंढे (का पो-पाटील), नामदेव उंडे (मा .सरपंच), पाटीलबुवा उंडे, भाऊ कृष्णा उंडे, देवराम थिटे, म्हातारबा थिटे ,बाबाजी थिटे शिवराम महादु उंडे, शंकर गवारी बाबाजी उंडे, केरभाऊ उंडे,बबन सदाशिव उंडे रामदास उंडे बबन आगळे,रामदास गवारी, रोहिदास, गवारी बाबूराव उंडे, मनोहर आगळे, धोंडीभाऊ , रामभाऊ , विश्वनाथ आगळे, पोपट थिटे (संचालक भि. स. सा. का), नामदेव गुंड, दत्तू बारेकर, गोरक्ष उंडे, पंढरीनाथ गवारी, वैभव उंडे, विष्णू उंडे, तसेच विजया पोपटराव थिटे, जनाबाई रामचंद्र आगळे, रत्नाबाई पाटीलबुवा उंडे, रोहिनी विठ्ठल जाधव, आश्विनी राहुल उंड़े, झुंदरबाई बाबाजी उंडे, पुजा सुभाष मोहिते, लक्ष्मी विश्वनाथ आगळे, चंद्रभागा बबन आगळे, रखमाबाई जयसिंग उंडे,रेऊबाई प्रभाकर उंडे, सरुबाई थिटे, सुमन रामभाऊ भालेराव, कविता दादाभाऊ उंडे, मंदा संदिप आदक या
कार्यक्रमासाठी आजी अजोबा पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते . तसेच
आजी अजोबा व नातवंडाचे स्नेह भोजनाने कार्यक्रमाचा समारोप झाला . सिद्धी रावळ यांनी
कार्यक्रमाचे सुत्रसंचलन केले व नियोजन आशा वाळके व स्वाती शिंदे यांनी केले तर
लालन गायकवाड यांनी आभार मानले.