यशवंतराव चव्हाण माध्यमिक विद्यालय आंबेगाव वसाहत येथे इनरव्हील क्लब ऑफ मंचर यांच्या वतीने विद्यार्थिनींची हिमोग्लोबिन तपासणी शिबीर संपन्न.
घोडेगाव प्रतिनिधी:
यशवंतराव चव्हाण माध्यमिक विद्यालय आंबेगाव वसाहत येथे इनरव्हील क्लब
ऑफ मंचर यांच्या वतीने दिनांक 4 सप्टेंबर 2023 रोजी
मुलींची हिमोग्लोबिन व सिरम कॅल्शियमचे
तपासणी शिबिर पार पडले.
विद्यालयातील इयत्ता पाचवी ते दहावीच्या 130 विद्यार्थीनींच्या हिमोग्लोबीन तपासणी अंतर्गत लाल रक्तपेशी, पांढऱ्या रक्तपेशी, प्लेटलेट,न्यूट्रोफिल्स, बेसोफील्स, ईओसिनोफिल्स यांची संपूर्ण रक्त तपासणी करण्यात आली .
इनरव्हील क्लबच्या चेअरमन डॉक्टर मेधा गाडे यांच्या हस्ते सर्व
विद्यार्थिनींना रक्त तपासणी रिपोर्टचे वाटप करण्यात आले याप्रसंगी
विद्यार्थिनींना लोहयुक्त व कॅल्शियम युक्त आहार
व संतुलित आहार याबाबतचे मार्गदर्शन त्यांनी केले . रक्त घटकांचे प्रमाण
कमी असणाऱ्या विद्यार्थिनींच्या योग्य औषध उपचाराचे व पुन्हा तीन महिन्यानंतर
त्यांचे रक्त तपासणी करण्याची जबाबदारी इनरव्हील क्लब घेत असल्याची माहिती त्यांनी
दिली.
डॉ .सुवर्णा काळे यांनी सर्व मुलींचे रक्त तपासणी केली. विद्यालयातील शिक्षिका माणिक हुले, वैशाली काळे, वंदना मंडलिक, राधिका शेटे, नीलम लोहकरे, गौरी विसावे यांनी रक्त तपासणी शिबिराचे नियोजन उत्कृष्टरित्या केले.