लाखानगाव प्रतिनिधी:
जिल्हा परिषद प्राथमिक शाळा काठापूर बुद्रुक येथे ५ सप्टेंबर २०२३ रोजी शिक्षक दिन साजरा करण्यात आला. सकाळी शाळेचे मुख्याध्यापक यांच्या हस्ते डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन यांच्या प्रतिमेस हार अर्पण करण्यात आला व कार्यक्रमाची सुरुवात झाली.
सकाळी शाळेची घंटा पासून ते शिक्षक असा प्रवास मुलांनी अगदी हसत पार केला परंतु शिक्षकाची जबाबदारी काय असते हे ह्या मुलांनी आज अनुभवलं अनेक विद्यार्थी व विद्यार्थिनी आज एक दिवसीय शिक्षक होऊन वर्गामध्ये वेगवेगळे विषय शिकवले. विद्यार्थ्यांचा उत्साह पाहून सर्वांनाच आनंद वाटत होता.
शाळांमध्ये तर हा दिवस म्हणजे खास सेलिब्रेशनच असते. विद्यार्थी शिक्षक होतात आणि प्रत्यक्ष वर्गात शिकवतातही. मग यादरम्यान झालेल्या गमतीजमती आपल्याला आयुष्यभर आठवत राहतात.
शिक्षक दिनाची सांगता म्हणून एक कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. सर्व विद्यार्थ्यांनी आपापले अनुभव सर्वांसमोर प्रस्तुत केले व मुख्याध्यापक नंदकुमार चासकर, शिक्षिका निलिमा वळसे, सुरेश भागवत , उत्तम वाव्हळ व दिनेश तुळे शिक्षकांचे आभार मानले. शिक्षकांचे महत्त्व हे विद्यार्थी जीवनात किती महत्त्वाचे असते हे अनेक विद्यार्थ्यांनी आपल्या अनुभवातून स्पष्ट केले. अशाप्रकारे शिक्षक दिन जिल्हा परिषद शाळेत अतिशय उत्साहाने साजरा झाला.