काठापूर प्रतिनिधी:
काठापुरमध्ये ढगफुटी सदृश्य मुसळधार पाऊस होऊन शेती पिकांचे मोठे नुकसान झाले आहे. गुरुवारी (दि. २१) दुपारी तिन ते सायंकाळी साडे सहा या दरम्यान मोठ्या स्वरूपाचा मुसळदार पाऊस झाला. या पावसाचा फटका शेती पिकांना बसला आहे यामध्ये बाजरी, मका, कडवळ, जनावरांचा चारा सोयाबीन, पालेभाज्या आणि मोठ्या प्रमाणावर उसाचे नुकसान झाले आहे. शासनाच्या वतीने कृषी विभाग प्रथम दर्शनी अहवाल तहसीलदार यांना देणार आहे.
त्यानंतर या ठिकाणी पंचनामे सुरू होतील परंतु ताबडतोब या ठिकाणी पंचनामे सुरू होऊन शेतकऱ्यांना नुकसान भरपाई द्यावी ज्या शेतकऱ्यांचे विमा आहेत त्यांना विमा भरपाई मिळेल. परंतु ज्यांच्याकडे विमा नाही त्यांनाही नुकसान भरपाई दिली पहिले अशी मागणी उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेचे जिल्हाप्रमुख सुरेश भोर यांनी केली आहे. काढणीला आलेली बाजरी सपाट झाली आहे.तसेच काढणी केलेली बाजरी ही पाण्यात तरंगत होती. त्यामुळे नुकसान मोठे झाले आहे. एकंदरीतच हा पाऊस काठापुर बुद्रुक या ठिकाणी मोठ्या प्रमाणावर झाला. पावसाचे प्रमाण दीडशे मिलिमीटर होते.
६५ मिलिमीटर च्या पुढील पावसाला अतिवृष्टी म्हणून घोषित
केले जाते. त्यामुळे अतिशय मोठ्या प्रमाणात
पाऊस या ठिकाणी झाला आहे. जनावरांची चारा पिके व सपाट झाल्याने
आधीच जनावरांचा चाऱ्याचा प्रश्न निर्माण झाला होता. त्यात अजूनच चाऱ्याचा
प्रश्न उद्भवणार आहे. त्यामुळे दूध उत्पादक
शेतकरी ही अडचणीत सापडला आहे. एकंदरीत परिस्थिती पाहता
शेती पिकाचे नुकसान भरपाई द्यावी अशी मागणी
यावेळी संदीप करंडे, बजरंग करंडे, अमोल करंडे, किशोर
करंडे, रघुनाथ करंडे, माजी उपसरपंच विशाल करंडे
यांनी केली आहे.