आळेफाटा प्रतिनिधी:
दिव्यांग विद्यार्थांसाठी थेरीपी शिबिराचे आयोजन दि २१ सप्टेंबर २०२३रोजी जि.प. प्राथमिक शाळा आळे नं ३ येथे समग्र शिक्षा अंतर्गत पंचायत समिती जुन्नर शिक्षण विभाग यांच्या वतीने गटशिक्षणाधिकारी अनिता शिंदे आणि गटसमन्वयक संचिता अभंग यांच्या मार्गदर्शनाखाली दिव्यांग विद्यार्थांसाठी आरोग्य शिबिराचे आयोजन आयोजन करण्यात आले होते. सदर शिबिरास विविध दिव्यांग प्रवर्ग असणाऱ्या विद्यार्थांना ॲक्युपंक्चर थेरपी, फिजीओथेरपी त्याचबरोबर स्पीच थेरपी देण्यात आली.
यासाठी थेरेपीस्ट केंगले यांनी विद्यार्थांना
थेरपी देण्याचे काम केले. यावेळी पालकांना मार्गदर्शन देखील करण्यात आले. या शिबिरास
चांगला प्रतिसाद मिळाला. केंद्राअंतर्गत एकूण १५ विद्याथी सहभागी झाले होते. शाळा
व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष मुकुंद भंडलकर, या विभागाचे विभाग प्रमुख भुजबळ, तोडकरी,
मोरे व पिंगट यांनी या शिबिराचे नियोजन केले. जि.प.प्राथमिक शाळा आळे चे मुख्याध्यापक आवटे
व सर्व शिक्षक यांनी शिबिरास सहकार्य केले.