मंचर प्रतिनिधी:
भारतीय जनता पार्टी महिला मोर्चा मंचर यांच्या वतीने रक्षाबंधन स्नेह यात्रा हा कार्यक्रम राबवण्यात आला, मंचर येथील महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाचे कर्मचारी तसेच रिक्षा, टॅक्सी,चालक यांना राखी बांधून शुभेच्छा देण्यात आल्या.
राष्ट्रीयध्यक्ष वानथीआक्का श्रीनिवासन यांच्या मार्गदर्शनाखाली तसेच महाराष्ट्र महिला मोर्चा प्रदेशाध्यक्ष चित्राताई वाघ यांच्या अध्यक्षतेखाली रक्षाबंधनाचा "स्नेह यात्रा" हा कार्यक्रम दिनांक 29 ते 31 ऑगस्ट 2023 पर्यंत महाराष्ट्रात साजरा करण्यात येणार आहे.
आपण दरवर्षी रक्षाबंधनाचा सण हा उत्साह मध्ये साजरा करत असतो परंतु यावर्षी आपली सेवा करणाऱ्या रिक्षा, टॅक्सी, बस चालक, सेवाभावी संस्था यांना भारतीय जनता पार्टी महिला मोर्चा तर्फे राखी बांधून आपल्या सोबत बंधुत्वाच्या नात्यात जोडायचे आहे. असे महिला मोर्चा प्रदेशाध्यक्ष चित्राताई वाघ यांनी सांगितले.
त्यानुसार मंचर शहरामध्ये विविध ठिकाणी सेवा करणाऱ्या बंधूंना भाजपा महिला मोर्चा भाजपा कायदा आघाडी सचिव पुणे जिल्हा ऍड. स्वप्ना खामकर/ पिंगळे, महिला मोर्चा मंचर अध्यक्ष जागृती महाजन, मंचर शहर सरचिटणीस छाया थोरात यांनी महिला मोर्चाच्या वतीने कार्यक्रम राबवून राखी बांधली.