कवठे येमाई, ता. १५ :
टोमॅटोचे दरात जबरदस्त घसरण झाल्यामुळे शेतकऱ्यांना टोमॅटो रस्त्यावर फेकून देण्याची वेळ आली आहे. शासन मात्र सणासुदीच्या तोंडावर महागाई कमी झाल्याच्या अविर्भावात स्वतःची पाठ थोपटून घेण्यात मशगुल आहे, परंतु सणासुदीला शेतकऱ्यांच्या चेहऱ्यावरचा आनंद मात्र हिरावत आहे. पंधरा दिवसापूर्वी टोमॅटोला चांगला भाव मिळत होता. परंतु तो आता शेतकऱ्यांना कवडीमोल दराने विकावा लागत आहे,
त्यात त्याचा उत्पादन खर्च सुद्धा भागत नाही. यामुळे टोमॅटो उत्पादक शेतकऱ्यांमध्ये प्रचंड संतापाचे वातावरण आहे. मागील काही दिवसात टोमॅटोची आवक कमी असल्यामुळे टोमॅटोचे भाव गगनाला भिडले होते. परंतु जशी आवक वाढत चालली तसे टोमॅटोचे बाजारभाव कोसळत चालले आहेत. काही दिवसापूर्वी सत्तर रुपये किलो दराने विकले जाणारे टोमॅटो सत्तर रुपये कॅरेट पर्यंत खाली आले आहेत. शेतकऱ्यांनी जगावे का मरावे हा प्रश्न शेतकऱ्यांमधून उपस्थित होत आहे.
त्यामुळेच शेतकरी आत्महत्या का करणार नाहीत असा प्रश्न विचारला जात आहे. टोमॅटो उत्पादक शेतकरी नारायण पळसकर यांनी दिलेल्या माहितीनुसार तीन हजार रोपे लावण्यासाठी उत्पादन खर्चामध्ये तार, बांबु, मशागत, लागवड,
खते, खुरपणी, तोडणी, औषधे हा सर्व खर्च ८० हजार ते १ लाखापर्यंत खर्च जातो. हा सर्व खर्च कुठून तरी कर्ज घेऊनच करावा लागतो. हा उत्पादन खर्च सुद्धा निघत नसल्याने पदरात काहीच पडत नाही. मी टोमॅटोची शेती करत आहे, सद्या माझी तोडणी चालू आहे, माझे टोमॅटो मी नारायणगाव मार्केटला पाठवतो. परंतु सध्या मला फक्त सत्तर रुपये कॅ रेटला बाजार मिळत आहे.
एका कॅ रेटला वाहतूक खर्च चौतीस रुपये येतो, मिळणारी उर्वरित रक्कम तोडणी मजदर यांच् ु यावरच खर्च के ली जाते, त्यामुळे पदरात काहीच मिळत नाही. या पडत्या काळात शेतकऱ्यांना शासनाने मदत करावी.
- पवन जाधव,
टोमॅटो उत्पादक शेतकरी